शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

कादवा पुलाचे कठडे तोडून आयशर टेम्पो नदीपात्रात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2021 22:50 IST

निफाड : नाशिककडून निफाड बाजूकडे जाणारा आयशर टेम्पो सोमवारी (दि. १३) पहाटेच्या सुमारास निफाड येथील कादवा पुलावरून जात असताना कठडे तोडून कादवा नदीपात्रात पडल्याची घटना घडली आहे. सुदैवाने यात जीवितहानी झाली नाही.

निफाड : नाशिककडून निफाड बाजूकडे जाणारा आयशर टेम्पो सोमवारी (दि. १३) पहाटेच्या सुमारास निफाड येथील कादवा पुलावरून जात असताना कठडे तोडून कादवा नदीपात्रात पडल्याची घटना घडली आहे. सुदैवाने यात जीवितहानी झाली नाही.निफाड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आयशर टेम्पो (क्रमांक एमएच १७ बीवाय ६२५३) हा पहाटे पाचच्या सुमारास नाशिक बाजूकडून निफाड बाजूकडे जात होता. सदर आयशर टेम्पो निफाडच्या कादवा पुलावरून जात असताना पहाटेच्या अंधारात सदर टेम्पोची पुलाच्या लोखंडी कठड्यांना धडक बसून तो कादवा नदीवरील जुन्या आणि नव्या पुलाच्या मधोमध पडला.

दोन्ही पुलांच्या मधोमध पडल्याने सदर टेम्पो हळूहळू खाली गेल्याने मोठी दुर्घटना झाली नाही. सदरची घटना निफाड पोलिसांना कळविण्यात आल्यानंतर निफाड पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. या प्रकरणी अधिक तपास पोलीस नाईक सागर घोलप हे करीत आहेत. दुपारी क्रेनच्या साहाय्याने अपघातग्रस्त आयशर टेम्पो नदीपात्रातून वर काढण्यात आला. 

टॅग्स :AccidentअपघातPolice Stationपोलीस ठाणे