ताहाराबाद : जिद्द, चिकाटी व प्रबळ इच्छाशक्ती आणि ध्येय डोळ्यासमोर ठेवून ४९ वर्षीय प्राथमिक शिक्षक कैलास बच्छाव यांनी येथील लाटीपाडा धरणात पिंपळनेर ते सुकापूर हे ३२०० मीटर अंतर कुठेही न थांबता अवघ्या २ तास २० मिनिटांत पोहून पार केले. याचबरोबर त्यांच्या सोबतीने त्यांचे सुपुत्र समन्य बच्छाव याने देकील १६०० मीटर अंतर १ तास १२ मिनिटात पार केले. जलतरणात पिता-पुत्राने केलेला हा पराक्रम पंचक्रोशीत कौतुकाचा विषय बनला आहे.कैलास बच्छाव हे जिल्हा परिषद शाळा चिंचदर, ता. बागलाण येथे शिक्षक असून, ते पिंपळनेरचे भूमिपुत्र आहेत. पांझरा नदीवरील लाटीपाडा धरणात काही दिवसांपूर्वी त्यांनी पोहण्याचा सराव सुरू केलासराव करतानाच त्यांनी तब्बल ५८० मीटर अंतर ३२ मिनिटांत पार केले. याबाबत कैलास बच्छाव यांनी सांगितले, वीस वर्षांपूर्वी जेव्हा आपण पोहत होतो, त्या वेळी ६० ते ७० मीटर अंतर एका दमात पार करत असे. वीस वर्षांपासून पोहणे बंद होते. दरम्यान, कोरोनामुळे लॉकडाऊनच्या काळात सुट्या होत्या. त्याचदरम्यान बीड जिल्ह्यातील ८० वर्षांच्या दिव्यांग वृद्धाचा व्हिडिओ बघितला. त्यातून मिळालेल्या ऊर्जेतून आपल्यालाही चांगलं पोहता येतं, त्यात काहीतरी नावीन्य करावे, असा निर्णय घेतला.पोहणे उत्तम व्यायामही आहे. म्हणून रोज लाटीपाडा धरणात पोहण्याचा सराव सुरू केला. ५० ते ६० मीटर अंतर रोज पोहत होतो. एके दिवशी धरणाच्या सांडव्याचे २९० मीटर अंतर पार केले. पुन्हा जिद्द, चिकाटीने परत येताना तेवढेच अंतर पोहोण्याचे ठरवले. त्यानुसार हे ३२०० मीटर अंतर अवघ्या २ तास २० मिनिटांत पार केले. दरम्यानच्या काळात मुलाचाही पोहण्याचा सराव करून घेतल्याचे बच्छाव यांनी सांगितले. पुस्तकी शिक्षणाचे धडे गिरवण्याबरोबरच आपल्या नजरेला भुरळ घालणारी कोणतीही गोष्ट आत्मसात करायची असेल तर त्यासाठी जिद्द, चिकाटी, प्रबळ इच्छाशक्ती डोळ्यासमोर असावी लागते. त्याचे कैलास बच्छाव हे उत्तम उदाहरण समोर आले आहे.पोहायला येणे ही एक कला आहे. आत्मसात केली तर ती माणसाच्या जीवनाला तारक ठरते. खरे म्हणजे पाणी पाहिले की अनेकांच्या मनात भीती निर्माण होते मात्र अवघड काम करताना मनात विनाकारण भीती बाळगू नये. कोणतीही गोष्ट अशक्य नाही. फक्त मनात जिद्द, चिकाटी आणि परिश्रम करण्याची तयारी ठेवली पाहिजे. तरच अशक्य गोष्टी आपण शक्य करू शकतो.- कैलास बच्छाव, प्राथमिक शिक्षक
लाटीपाडा धरणात पिता-पुत्राची धाडसी कामगिरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2021 01:14 IST
ताहाराबाद : जिद्द, चिकाटी व प्रबळ इच्छाशक्ती आणि ध्येय डोळ्यासमोर ठेवून ४९ वर्षीय प्राथमिक शिक्षक कैलास बच्छाव यांनी येथील लाटीपाडा धरणात पिंपळनेर ते सुकापूर हे ३२०० मीटर अंतर कुठेही न थांबता अवघ्या २ तास २० मिनिटांत पोहून पार केले. याचबरोबर त्यांच्या सोबतीने त्यांचे सुपुत्र समन्य बच्छाव याने देकील १६०० मीटर अंतर १ तास १२ मिनिटात पार केले. जलतरणात पिता-पुत्राने केलेला हा पराक्रम पंचक्रोशीत कौतुकाचा विषय बनला आहे.
लाटीपाडा धरणात पिता-पुत्राची धाडसी कामगिरी
ठळक मुद्देजलतरणाचा पराक्रम : ३२०० मीटर अंतर २ तास २० मिनिटांत केले पार