शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

धाडसी आजीची बिबट्यावर झडप; जबड्यातून वाचविले चिमुकल्या नातीला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2020 00:22 IST

अंगाचा थरकाप उडविणारी ही घटना नाशिकमधील गोदाकाठालगत असलेल्या पळसे शिवारातील अंकुश कासार यांच्या गट क्रमांक ३१७मधील ऊसशेतीत घडली.

ठळक मुद्देदैव बलवत्तर असल्यामुळे दोघीही बालंबाल बचावल्याशेकोटी बांधाजवळ पेटवून ठेवावीअंधार पडल्यानंतर घराबाहेर पडणे टाळावे

नाशिक : वेळ रात्री दहा वाजेची...ठिकाण: नाशिक जिल्ह्यातील पळसे गाव... जेवण आटोपून कासार कुटुंबातील आजीबाई आपल्या चार वर्षीय नातीसोबत बाहेर हवेशीर ओट्यावर बसलेल्या....नाती ओट्यावर खेळण्यात दंग असताना अचानकपणे समोरील ऊसशेतीतून बिबट्या चाल करत चिमुकलीवर झडप घेतो अन् तिच्या जोरजाराने रडण्याच्या आवाजाने आजीबाई तत्काळ सावध होत क्षणाचाही विलंब न करता बिबट्या ओट्यावरून खाली जाता नाही तोच त्याच्यावर झडप घेतात अन् त्याला हाताच्या बुक्क्यांनी मारत जबड्यातून आपल्या नातीची सुटका करण्यामध्ये यशस्वी होतात.अंगाचा थरकाप उडविणारी ही घटना नाशिकमधील गोदाकाठालगत असलेल्या पळसे शिवारातील अंकुश कासार यांच्या गट क्रमांक ३१७मधील ऊसशेतीत घडली. आजी व नातीचे दैव बलवत्तर असल्यामुळे दोघीही बिबट या हिंस्त्र वन्यप्राण्याच्या हल्ल्यातून बालंबाल बचावल्या. चार वर्षीय समृध्दीच्या डोक्याला काही प्रमाणात जखमा झाल्या असून तिला रुग्णालयात दाखल करून उपचार करण्यात आले आहे. समृध्दी आता सुखरूप असून डॉक्टरांनी तिला घरीदेखील सोडले असल्याची माहिती वनविभागाने दिली. घटनेची माहिती मिळताच पोलीस पाटील तसेच नाशिक पश्चिम विभागाचे वनक्षेत्रपाल विवेक भदाणे हे आपल्या पथकासह घटनास्थळी तत्काळ दाखल झाले. त्यांनी कासार कुटुंबियांची भेट घेत समृध्दीच्या जखमांची पाहणी क रून पंचनामा केला. तसेच वनरक्षकांच्या टीमने हातात टॉर्च घेत संपुर्ण शेतीचा परिसर पिंजून काढत बिबट्या जवळपास कोठे दडून बसलेला नाही, याची खात्री पटविली. बिबट हल्ला टाळण्यासाठी या भागात जनजागृतीपर ध्वनिफित वाहनाच्या भोंग्याद्वारे वाजवून लोकांना पुन्हा सावध करण्यात आले. तसेच कासार कुटुंबियांनाही सुरक्षिततेच्या दृष्टीने खबरदारीच्या उपाययोजना सुचविल्या.

रात्रीच्या वेळी आपल्या घराजवळ जास्त प्रमाणात प्रकाश राहील अशी विद्युत व्यवस्था करावी. शेकोटी बांधाजवळ पेटवून ठेवावी आणि अंधार पडल्यानंतर घराबाहेर पडणे टाळावे. ऊसशेतीचे बांध व घराचा ओटा यामध्ये अंतर असले पाहिजे. तसेच चेनलिंक फेन्सिंगचे कुंपण तरी बांधावर किमान घराच्या समोर तर के लेले असावे. एकलहरे, पळसे, हिंगणवेढे या गोदावरी, दारणा नदीच्या खोऱ्यात ऊसशेती भरपूर प्रमाणात केली जाते. यामुळे या भागात दिवसेंदिवस बिबट्यांचा वावर वाढताना दिसत असल्याचे भदाणे यांनी सांगितले. सामनगाव बीटमधील सुमारे २० ते २५ गावांमध्ये बिबट संचार असून या सर्वच गावांमध्ये वनविभागाकडून पिंजरे तैनात करण्यात आले आहेत; मात्र शेतकऱ्यांनी व शेतीवर राहणाºया शेतमजूरांनी आपली व कुटुंबियांची काळजी घेणे तितकेच गरजेचे आहे.

टॅग्स :wildlifeवन्यजीवleopardबिबट्याNashikनाशिकforest departmentवनविभाग