शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

‘ब्रह्मगिरी’ला टपाल पाकिटावर स्थान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 15, 2018 00:13 IST

गोदावरी नदीचे उगमस्थान व धार्मिक महत्त्व प्राप्त असलेल्या नाशिकच्या वैभवापैकी एक त्र्यंबकेश्वरमधील ब्रह्मगिरी पर्वताला प्रथमच टपालाच्या पाकिटावर स्थान मिळाले आहे. ‘ब्रह्मगिरी’चे छायाचित्र असलेले विशेष डिझाइन केलेल्या टपाल पाकिटाचे अनावरण येत्या ‘नापेक्स-२०१८’ टपाल तिकिटांच्या प्रदर्शनात केले जाणार आहे.

ठळक मुद्देतिकिटांचा खजिना : ‘नापेक्स-२०१८’मध्ये होणार अनावरण

नाशिक : गोदावरी नदीचे उगमस्थान व धार्मिक महत्त्व प्राप्त असलेल्या नाशिकच्या वैभवापैकी एक त्र्यंबकेश्वरमधील ब्रह्मगिरी पर्वताला प्रथमच टपालाच्या पाकिटावर स्थान मिळाले आहे. ‘ब्रह्मगिरी’चे छायाचित्र असलेले विशेष डिझाइन केलेल्या टपाल पाकिटाचे अनावरण येत्या ‘नापेक्स-२०१८’ टपाल तिकिटांच्या प्रदर्शनात केले जाणार आहे.टपाल विभागाकडून जिल्हास्तरीय टपाल तिकिटांचे प्रदर्शन ‘नापेक्स-२०१८’चे आयोजन करण्यात आल्याची माहिती प्रवर डाक अधीक्षक पी. जे. काखंडकी यांनी पत्रकार परिषदेत दिली. या प्रदर्शनात दोन विशेष टपाल पाकिटांचे अनावरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात येणार आहे. यामध्ये ब्रह्मगिरी पर्वत व समाधी सम्राट श्री १०८ सुधर्मसागर महाराज यांचा समावेश आहे. येत्या शनिवारपासून (दि.२०) शहरात दोनदिवसीय टपाल तिकिटांच्या प्रदर्शनाला सुरुवात होणार आहे. हे प्रदर्शन सर्व वयोगटांसाठी विनामूल्य असल्याचे काखंडकी यांनी यावेळी सांगितले. नाशिककरांना यावर्षी देश-विदेशातील विविध टपाल तिकिटांचा संग्रह पाहता येणार आहे. थोर व्यक्ती, जागतिक भूगोल, विविध देशांचा इतिहास, संस्कृती, नैसर्गिक साधनसंपत्ती, जैवविविधतेची माहिती प्रदर्शनातून होणार आहे. यावेळी वरिष्ठ डाकपाल मोहन अहिरराव, सर्कल स्टॅम्प डेपोचे अधीक्षक संजय फडके, सहायक अधीक्षक पंकज कुलकर्णी आदी उपस्थित होते.‘छंदांचा राजा’ व ‘राजांचा छंद’टपाल तिकीट संग्रह हा जगातील सर्वात लोकप्रिय छंद म्हणून ओळखला जातो. या छंदास ‘छंदांचा राजा’ व ‘राजांचा छंद’ असे म्हटले जाते. हा एकमेव छंद असा आहे की, तो जोपासताना होणारा खर्च वाया जात नाही तर त्याचे मूल्य वाढत असते. हा छंद आबालवृद्ध जोपसतात. नाशिक जिल्ह्यातून सुमारे ४०हून अधिक तिकीट संग्रह करणारे छंदवेडे या प्रदर्शनात सहभागी होणार आहेत. हे प्रदर्शन स्पर्धात्मक असून विजेत्यांना सुवर्ण, रौप्य, कांस्य पदकांनी सन्मानित करण्यात येणार आहे.

टॅग्स :Post Officeपोस्ट ऑफिसNashikनाशिक