शहरं
Join us  
Trending Stories
1
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'
2
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
3
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
4
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
5
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
6
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
7
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
8
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
9
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
10
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
11
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
12
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
13
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
14
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
15
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
16
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
17
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
18
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
19
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका

मुलाच्या पित्याने मुख्याध्यापकाला घेतला चावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2021 00:20 IST

नाशिकरोड : मुलाचा शाळा सोडल्याचा दाखला मागितला असता नकार मिळाल्याने संतप्त झालेल्या पित्याने महापालिका शाळा क्रमांक ५०च्या मुख्याध्यापकाला चावा घेतल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

ठळक मुद्देनाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

नाशिकरोड : मुलाचा शाळा सोडल्याचा दाखला मागितला असता नकार मिळाल्याने संतप्त झालेल्या पित्याने महापालिका शाळा क्रमांक ५०च्या मुख्याध्यापकाला चावा घेतल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी संशयित पिता चरणजीत ग्रायविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.मुख्याध्यापक संतोष वाळुंज यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, गोरेवाडी येथे असलेल्या महापालिका शाळा क्रमांक ५० मध्ये चरणजीत आणि त्याचा मुलगा दोन ते अडीच वर्षापूर्वी शाळेत नाव दाखल करण्यासाठी आले होते. यावेळी ग्राय याचा मुलगा हा शाळेत केवळ दहा ते पंधरा दिवस हजर राहिला होता. मात्र तोपर्यंत त्याचा दाखला शाळेला अगोदरच्या शाळेकडून प्राप्त झालेला नव्हता.

त्यानंतर चरणजीत हा त्याच्या मुलाला शाळेतून घेऊन गेला. त्यानंतर संबंधित इसम हा वारंवार शाळेत येऊन मुलाचा शाळा सोडल्याचा दाखला देण्याचा आग्रह करू लागला. परंतु मुलाचा दाखला शाळेत उपलब्ध नसल्यामुळे तो नियमानुसार देता येणार नाही, असे वाळुंज हे त्याला सतत समाजावत होते.

मात्र चरणजीत याने संतप्त होत दाखला देत नसल्याचा राग मनात धरून शुक्रवारी दुपारी वाळुंज यांच्या डोक्यात हातातील स्टीलचा मारून डाव्या हाताच्या अंगठ्याला जोरदार चावा घेत जखमी केले. याप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

टॅग्स :SchoolशाळाCrime Newsगुन्हेगारी