शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
"बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून... "; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

भाडेवाढी विरोधात नाशिकला व्यापाऱ्यांचा लिलावावर बहिष्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2018 19:09 IST

नाशिक उत्पन्न बाजारसमितीत काही वर्षांपूर्वी तत्कालीन संचालक मंडळाने सुमारे दीडशेहून अधिक तात्पुरते गाळे व्यापारी वर्गाला भाड्याने दिले असून, जागा समान असली तरी भाडेवाढ वार्षिक चार ते साठ हजार रुपये घेतले जाते. मात्र सदर भाडे हे कमी असल्याचे बाजार समितीच्या लक्षात आल्याने त्यात वाढ करण्याचा निर्णय संचालक मंडळाने घेवून

ठळक मुद्देबैठक निष्फळ : बाजारभाव कोसळल्याने शेतकरी संतप्त १०० चौरस फुटाला प्रति दिन ५० रुपये या प्रमाणे व्यापा-यांना भाडे आकारणी

नाशिक : नाशिक कृषी उत्पन्न बाजारसमितीने व्यापारी गाळ्यांचे भाडेवाढ करण्याचा निर्णय घेतल्याने संतप्त झालेल्या व्यापा-यांनी बुधवारी अचानक लिलावावर बहिष्कार टाकल्याने सकाळी तीन तास फळभाज्यांचे लिलाव ठप्प झाले. व्यापा-यांच्या या पावित्र्याने दुपारी बाजारसमितीत संचालक व व्यापा-यांची संयुक्त बैठक घेण्यात आली परंतु ती निष्फळ ठरल्याने उशीराने लिलाव सुरू झाल्यामुळे जिल्हाभरातून बाजारसमितीत शेतमाल विक्रीसाठी आणलेल्या शेतक-यांचे हाल होवून बाजारभाव कोसळल्याने त्यांनी तीव्र संताप व्यक्त केला.नाशिक उत्पन्न बाजारसमितीत काही वर्षांपूर्वी तत्कालीन संचालक मंडळाने सुमारे दीडशेहून अधिक तात्पुरते गाळे व्यापारी वर्गाला भाड्याने दिले असून, जागा समान असली तरी भाडेवाढ वार्षिक चार ते साठ हजार रुपये घेतले जाते. मात्र सदर भाडे हे कमी असल्याचे बाजार समितीच्या लक्षात आल्याने त्यात वाढ करण्याचा निर्णय संचालक मंडळाने घेवून १०० चौरस फुटाला प्रति दिन ५० रुपये या प्रमाणे व्यापा-यांना भाडे आकारणी करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाला काही व्यापा-यांनी विरोध दर्शविल्याने व्यापारी व बाजारसमिती यांच्यात वाद झाला होता. त्यातूनच दरम्यान बुधवारी व्यापा-यांनी लिलावावर बहिष्कार टाकल्याने सकाळी सुमारे तीन तास लिलाव प्रक्रिया ठप्प झाली. त्यामुळे बाजार समितीत शेतमाल लिलावासाठी घेवून आलेल्या शेतक-यांमध्ये संताप व्यक्त केला जात असताना त्यावर तोडगा काढण्यासाठी बाजार समितीचे सभापती शिवाजी चुंभळे, संचालक जगदीश अपसुंदे, संदीप पाटील, प्रवीण नागरे यांनी व्यापाºयांची संयुक्त बैठक घेण्यात आलीा. त्यात बाजार समितीने गाळे भाडेवाढीवर ठाम राहण्याचा निर्णय घेतला तर व्यापा-यांनी त्यास विरोध दर्शविल्याने बैठकीतून काहीही तोडगा निघू शकला नाही. त्यामुळे लिलावाविषयी अनिश्चितता निर्माण झाली. अशातच काही व्यापा-यांनी दुपारी तीन वाजता लिलाव सुरू केले. मात्र सकाळपासून जिल्ह्यातील ग्रामीण भागातून शेकडो शेतकरी आपला माल विक्रीसाठी घेवून आले, परंतु वेळेत लिलाव न झाल्याने त्यांना मोठे नुकसान सोसावे लागले.

टॅग्स :APMCपुणे कृषी उत्पन्न बाजार समितीNashikनाशिक