कळवण : गिरणा नदी पात्रालगत खेळण्यासाठी गेलेल्या व त्यानंतर बेपत्ता झालेल्या कळवण येथील कृष्णा अमोल पगार या १२ वर्षीय मुलाचा मृतदेह बुधवारी (दि. २) सकाळी बगडू शिवारातील नदीपात्रात आढळून आला. नदीच्या पाण्यात बुडून या चिमुकल्याचा दुर्दैवी अंत झाला आहे.कळवण येथील कृष्णा अमोल पगार हा बारार्षीय मुलगा रविवारी सायंकाळी खेळण्यासाठी गिरणा नदीपात्राकडे गेला होता. मात्र तो घरी न परतल्याने कुटुंबीयांनी त्याचा शोध सुरू केला होता. रविवारी रात्रीपासून गिरणा नदी पात्रात व परिसरात शेकडो नागरिक शोधकार्य करत होते. मात्र कृष्णा सापडत नव्हता. बुधवारी सकाळी कळवण तालुक्यातील बगडू शिवारात गिरणा नदीपात्रात काही नागरिकांना मृतदेह आढळल्याने पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा करत ओळख पटवली असता मृतदेह कृष्णाचाच असल्याचे स्पष्ट झाले. कृष्णा हा कळवण एज्युकेशन सोसायटीचे विश्वस्त रमेश पगार यांचा नातू तर राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष अमोल पगार यांचा मुलगा होय. कळवण येथील गिरणा नदी संगमावर शोकाकुल वातावरणात त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
खेळण्यासाठी गेलेल्या मुलाचा बुडून मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2020 01:46 IST
कळवण : गिरणा नदी पात्रालगत खेळण्यासाठी गेलेल्या व त्यानंतर बेपत्ता झालेल्या कळवण येथील कृष्णा अमोल पगार या १२ वर्षीय मुलाचा मृतदेह बुधवारी (दि. २) सकाळी बगडू शिवारातील नदीपात्रात आढळून आला. नदीच्या पाण्यात बुडून या चिमुकल्याचा दुर्दैवी अंत झाला आहे.
खेळण्यासाठी गेलेल्या मुलाचा बुडून मृत्यू
ठळक मुद्दे नदीच्या पाण्यात बुडून या चिमुकल्याचा दुर्दैवी अंत