घोटी : इगतपुरी तालुक्यातील धारगाव येथील ४ महिन्यांपूर्वी झालेल्या चोरी प्रकरणी घोटी पोलिसांनी दोघा संशयतांना ताब्यात घेतले आहे. ह्या प्रकरणी लाखो रु पयांचा मुद्धेमाल आणि सोन्याची चोरी झाली होती. तलवारीचा धाक दाखवत हातपाय बांधून सराईत गुन्हेगारांनी धाडसी चोरी केली होती. इगतपुरी न्यायालयाने दोघा संशयित आरोपींना चार दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे.वैतरणा धरणाच्या पायथ्याजवळ असणाऱ्या हॉटेल ओम साईचे मालक गणेश नव्हाटे, पत्नी आणि दोन मुलांसह गाढ झोपेत असतांना बदलापूर येथील चौघा चोरट्यांनी ४ महिन्यापूर्वी पहाटेच्या सुमारास शटर तोडून घरात प्रवेश केला. तलवारीचा धाक दाखवित लाथाबुक्क्यांनी मारहाण करून त्यांचे हातपाय बांधले. यावेळी रोख रक्कम १ लाख २० हजार रु पयांसह मोबाईल, सोन्याचे दागिने घेवून पोबारा केला होता.घोटीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज भालेराव यांनी याप्रकरणी तपास करीतहोते. ठाणे येथे दुचाकी चोरतांना विजय आर्या अय्यर उर्फ गोट्या (२५) रा. खरवई, सिद्धीसिटी रूम. नंबर १०१ बदलापूर, गणेश रमेश झेंडे (२८) रा.रूम नंबर १ उपनवेल बदलापूर यांना स्थानिक पोलिसांनी ताब्यात घेतले असता त्यांनी धारगाव येथील गुन्ह्याची कबुली दिली.याबाबत घोटीचे एक पथक ठाण्यास रवाना करण्यात येवून संशयित आरोपींना घोटी पोलीसांनी ताप्यात घेतले. पोलीसीखाक्या दाखवताच चोरट्यांनी इतर दोन साथीदारांसह आपण चोरी केल्याचे कबुल केले. यातील दोन आरोपी फरार असून वैतरणा परिसरात पार्टी करण्याकरीता आल्याचे त्यांनी कबुल केले. घटनेतील मोबाईल आरोपींकडून ताब्यात घेण्यात आला आहे.
चोरी प्रकरणी दोघांना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2019 00:01 IST
घोटी : इगतपुरी तालुक्यातील धारगाव येथील ४ महिन्यांपूर्वी झालेल्या चोरी प्रकरणी घोटी पोलिसांनी दोघा संशयतांना ताब्यात घेतले आहे. ह्या ...
चोरी प्रकरणी दोघांना अटक
ठळक मुद्देघोटी : धारगाव येथील घटना ; चार दिवसांची पोलीस कोठडी