निफाड तालुक्यात जे दोन डेल्टा व्हेरीअंटचे रुग्ण आढळून आले होते ते दोन्ही रुग्ण आता बरे झाले असल्याची तालुका कोव्हिडं सेंटरचे संपर्क प्रमुख डॉ चेतन काळे यांनी दिलीसदर रुग्ण हे मागील महिन्याच्या ३ ते ५ जुलै दरम्यान कोरोना बाधित झाले होते. एक रुग्ण कसबे सुकेणे तर दुसरा महाजनपूर येथील असून दोन्ही रुग्णावर उपचार होऊन ते सध्या व्यवस्थित आहेत. सध्या सदर रुग्ण त्यांचे नातेवाईक तसेच आजूबाजूच्या परिसरातील लोक यांना कसल्याही प्रकारचा त्रास नसून ते सुस्थितीत आहेत.निफाड तालुक्यात आजपर्यत एकूण रुग्ण १८८०० कोरोनाबाधीत रुग्ण आढळले होते त्यापैकी १८०५७ रुग्ण कोरोनामुक्त झाले असून ६८२ रुग्णाचा मृत्यू झाला असून सध्या या तालुक्यात ६१ कोरोनाबाधीत रुग्णावर उपचार चालू असल्याचे डॉ. काळे यांनी सांगितले.
निफाड तालुक्यातील डेल्टा व्हेरीअंटचे दोन्ही रुग्ण आता बरे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 8, 2021 19:38 IST
निफाड तालुक्यात जे दोन डेल्टा व्हेरीअंटचे रुग्ण आढळून आले होते ते दोन्ही रुग्ण आता बरे झाले असल्याची तालुका कोव्हिडं सेंटरचे संपर्क प्रमुख डॉ चेतन काळे यांनी दिली.
निफाड तालुक्यातील डेल्टा व्हेरीअंटचे दोन्ही रुग्ण आता बरे
ठळक मुद्देसदर रुग्ण हे मागील महिन्याच्या ३ ते ५ जुलै दरम्यान कोरोना बाधित झाले होते.