शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

दोन्ही आमदारांसाठी प्रतिष्ठेची लढत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2018 00:23 IST

महापालिकेच्या प्रभाग क्रमांक १३ साठी होत असलेल्या पोटनिवडणुकीत शिवसेना व मनसे उमेदवारामध्ये काट्याची टक्कर दिसून येत असताना, सत्ताधारी भाजपाच्या पारड्यात सदर जागा पडावी याकरिता शहराध्यक्ष असलेले आमदार बाळासाहेब सानप आणि मध्य विधानसभा मतदारसंघाच्या आमदार प्रा. देवयानी फरांदे यांच्यासाठी लढत प्रतिष्ठेची बनली आहे.

नाशिक : महापालिकेच्या प्रभाग क्रमांक १३ साठी होत असलेल्या पोटनिवडणुकीत शिवसेना व मनसे उमेदवारामध्ये काट्याची टक्कर दिसून येत असताना, सत्ताधारी भाजपाच्या पारड्यात सदर जागा पडावी याकरिता शहराध्यक्ष असलेले आमदार बाळासाहेब सानप आणि मध्य विधानसभा मतदारसंघाच्या आमदार प्रा. देवयानी फरांदे यांच्यासाठी लढत प्रतिष्ठेची बनली आहे.  प्रभाग क्रमांक १३ (क) मधील रिक्त जागेसाठी दि. ६ एप्रिलला पोटनिवडणूक होत आहे. त्या पार्श्वभूमीवर मनसे, शिवसेना आणि भाजपासह काही अपक्ष उमेदवारांनी प्रचाराला वेग दिला आहे. मनसेकडून भोसले कुटुंबीयातीलच अ‍ॅड. वैशाली मनोज भोसले निवडणूक रिंगणात आहेत तर शिवसेनेचे माजी नगरसेवक संजय चव्हाण यांच्या कन्या स्नेहल चव्हाण यांनी मनसेपुढे तगडे आव्हान उभे केले आहे. मनसे आणि शिवसेना उमेदवारांमध्ये काट्याची टक्कर दिसून येत आहे. त्यात भाजपाच्या उमेदवार विजया हरिष लोणारी यांनीही रंगत आणली आहे. पोटनिवडणूक लढविणार आणि जिंकणारही, असे सांगणारे भाजपाचे शहराध्यक्ष बाळासाहेब सानप यांनी ऐनवेळी भाजपा उमेदवाराच्या माघारीसाठी प्रयत्न चालविले होते. त्याबाबत वसंतस्मृती येथे झालेल्या बैठकीत त्याचे पडसादही उमटले होते. माजी नगरसेवक हरिष लोणारी यांनी कोणत्याही परिस्थितीत माघार न घेण्याची भूमिका कायम ठेवल्याने पक्षनेतृत्वाचा नाईलाज झाला होता. त्यामुळे विजया लोणारी यांचा अर्ज कायम राहिला. तर लोणारी यांच्यासाठी मध्य विधानसभेच्या आमदार प्रा. देवयानी फरांदे यांनी पुढाकार घेतल्याचे सांगितले जाते. आता सदर जागेवर भाजपाच्या उमेदवाराला निवडून आणण्यासाठी शहराध्यक्ष असलेले आमदार सानप आणि मध्यच्या आमदार फरांदे यांच्यासाठी लढत प्रतिष्ठेची बनली आहे. जागा गमावली तर दोन्ही आमदारांना धक्का बसणार आहे तर जागा जिंकल्यास त्याचे श्रेय दोहोंना मिळणार आहे. त्यामुळे पक्षाने लढतीत जाणीवपूर्वक लक्ष घालण्यास सुरुवात केली आहे. मंगळवारी (दि.२७) पक्ष कार्यालयात त्यासंबंधी बैठक होऊन प्रचाराचे नियोजन करण्यात आले. शिवसेनेमध्ये खांदेपालट झाल्यानंतर होत असलेल्या या पोटनिवडणुकीसाठी दोन्ही महानगरप्रमुखांसाठीही सदर लढत प्रतिष्ठेची बनली आहे.प्रचारात रंगतपोटनिवडणुकीसाठी आठ उमेदवार रिंगणात आहेत. आठ दिवसांनी पोटनिवडणुकीसाठी मतदान होणार असल्याने उमेदवारांकडून प्रभागाची पायपीट सुरू झाली आहे. प्रामुख्याने घरोघरी जाऊन मतदारांना आवाहन केले जात आहे. प्रचार पत्रकेही वाटप होत आहेत. पोटनिवडणुकीत मनसे उमेदवाराला कॉँग्रेस, राष्टÑवादी कॉँग्रेसने पाठिंबा दर्शविला असल्याने प्रभागातील अन्य तीनही नगरसेवक मनसेच्या वैशाली भोसले यांचा प्रचार करताना दिसून येत आहेत. येत्या शनिवारी-रविवारी काही चौकसभांचेही नियोजन सुरू आहे.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाElectionनिवडणूक