नाशिक : जिल्ह्याच्या निफाड तालुक्यातील कुंदेवाडी आणि दिंडोरी तालुक्यामध्ये कादवा नदीच्या पुरात अडकलेल्या अकरा जणांपैकी नऊ जणांची सुटका करण्यात यश आले असले तरी दोघे जण अद्याप पुरात अडकलेले असून त्यांना बाहेर काढण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. पालखेड धरणातून २५ हजार क्युसेस पाणी सोडल्यानंतर कादवा नादितील पाण्याचा विसर्ग वाढल्याने कुंदेवाडी येथील कादवा नादिच्या पुरात अडकलेल्या ७ जणापैकी ४ जणांना वाचवण्यात यश आले असले तरी उर्वरीत तिघांचा रात्री उशिरापर्यंत शोध सुरु होता. पालखेड धरणात पाणी सोडल्याने कादवा नादित पुर सदृश परिस्थिति निर्माण झाली. मंगळवारी दुपारी ४ वाजेच्या च्या सुमारास नादिपात्रात कुंदेवाडी येथील केदू पवार ,मांगीलाल माळी,पिंटू सूर्यवंशी हे पालखेड धरणातून सोडलेल्या पाण्याच्या वेढ्यात अडकले. त्यांनी स्वत:ला वाचवण्यासाठी जवळच असलेल्या पक्या मातीच्या भरावाचा आधार घेतला. पाण्याची पातळी वाढल्याची माहिती निफाड तहसीलला देण्यात आली. प्रशासनाचे आपतकालीन पथकाला पाचारण करत तिघांना वाचवण्यासाठी रात्रि उशिरापर्यंत प्रयत्न सुरू होते. याबाबतचे वृत्त असे कि दिंडोरी तालुक्यात शनिवारी सायंकाळ पासून जोरदार पाऊस सुरु असून रविवारी रात्रीच पालखेड धरणातून पाण्याचा विसर्ग करण्यात आला होता . सोमवारी पावसाने काहीशी विश्रांती घेतल्याने पाण्याचा प्रवाह कमी करण्यात आला होता परंतु मंगळवारी पहाटेपासून सर्वच धरणांचे पाणलोट क्षेत्रात मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने कादवा कोळवण धामण उनंदा आदि प्रमुख सर्व नद्यांसह छोट्या मोठ्या नाल्यांना मोठा पूर आला होता . दरम्यान सकाळी दहाच्या सुमारास धरणाच्या खाली असलेल्या कादवा नदीत एक बेट असून तेथे पुंडलिक कोकाटे रा. पालखेड बंधारा हे बेटावर असलेल्या म्हसोबा देवस्थान येथे गेले होते तर रोहिदास शिंगाडे रामदास महाले सोमनाथ गुंबडे उमेश महाले माधव भिलारे हे पाच जण खडकसुकेने येथील एका शेतकर्यांचे शेतमजूर पाऊस असल्याने सुट्टी होती म्हणून मासेमारी साठी गेले होते. या भागात जास्त पाऊस नव्हता त्यामुळे पाणी सोडले जाईल याचा कोणताही अंदाज त्यांना आला नाही मात्र दुपारी एक च्या सुमारास मोठ्या प्रमाणात पाणी सोडल्याने या पाण्याने बेटाला क्षणात विळखा घातल्याने त्यांना पळता आले नाही व ते तिघेही तेथे अडकले यातील पुंडलिक कोकाटे यांनी आपले नातेवाईक यांना भ्रमणध्वनीवरून कळविल्यावर हा प्रकार लक्षात येताच त्यांचे नातेवाईकांनी घटनास्थळी धाव घेत त्यांना धीर देत हि बाब प्रशासनाला कळविली . प्रांताधिकारी मुकेश भोगे,तहसीलदार बाबासाहेब गाढवे यांनी तातडीने पालखेड धरणावर धाव घेत तत्काळ आपत्ती प्रशासनाला हि बाब कळवत मदत मागविली तसेच अडकलेल्यांना धीर दिला . आमदार नरहरी झरिवाळ यांनीही प्रशासनाला कळवत मदतकार्य राबविण्याच्या सूचना दिल्या .चार वाजेच्या नाशिक अिग्नशमन दलाचे पथक दाखल झाले परंतु सदरही ठिकाणी जाने व पाण्याचा प्रवाह मोठा होता मात्र स्थानिक नागरिक दिलीप गायकवाड,नामदेव कदम यांनी पिक अप वाहन उपलब्ध करून देत बोटी तेथे नेण्यास मदत केली अखेर यानाशिक मनपा अिग्नशमन दलाचे सहाय्यक अधिकारी दीपक गायकवाड,देविदास इंगळे,शिवाजी फुगट,बाळू लहानगे,शिवाजी खुलगे ,आदिनाथ सोनवणे,हेमंत वेद्गावकर सहा वाजेच्या दरम्यान बोटीने बेटापर्यंत जात सहाही जनांना बोटी बसवून सुखरूपपणे किनार्यावर आणले यावेळी त्यांना किनार्यावर आणताच जय बजरंग बलीच्या जयघोषात त्यांना वाचवण्याचा आनंद साजरा केला .यावेळी प्रांताधिकारी मुकेश भोगे,तहसीलदाबाबासाहेब गाढवे पोलीस ऊपनिरीक्षक शेख जिप सदस्य प्रवीण जाधव आदि उपस्थित होते ग्रामस्थांनी मोठ्या प्रमाणात सहकार्य केले यावेळी बघ्यांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती .तर वाचली असती दुर्घटनापालखेड धरणातून कादवा नदीत पाणी सोडण्यापूर्वी भोंगा वाजविला जाता मात्र येथील हि यंत्रणा नादुरु स्त असल्याने पाणी सुटणार हे कुणालाही कळाले नही व मासेमारीसाठी गेलेले सहा जण बेटावर अडकले यापूर्वी हि आठ वर्षापूर्वी याचा बेटावर दोन जण अडकले होते तेव्हा त्यांना हेलीकॉप्टर च्या मदतीने वाचिवण्यात आले होते जर भोंगा चालू असता तर वेळीच हि लोक सावध होत ते बाहेर पडले असते असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे .
कुंदेवाडीला दोघे पुरात अडकले
By admin | Updated: July 12, 2016 23:26 IST