शहरं
Join us  
Trending Stories
1
तीन महिन्यांत ७६७ शेतकरी आत्महत्या; मदत व पुनर्वसन मंत्र्यांची विधान परिषदेत कबुली
2
नाना पटोले अध्यक्षांकडे धावले; राजदंडाला हात लावला, निलंबित
3
आजचे राशीभविष्य- २ जुलै २०२५: 'या' राशीतील लोकांनी अवैध कृत्यांपासून दूर राहा, वाणीवर संयम ठेवा
4
मुलींचे लैंगिक शोषण; नराधमांना सोडणार नाही; बीड कोचिंग क्लास प्रकरणात एसआयटी
5
शेतकऱ्यांना फसविले, विमा कंपन्या होणार ब्लॅक लिस्ट; कृषिमंत्री माणिकराव कोकाटेंची माहिती
6
‘ठाकरे ब्रँड’चे शनिवारी मेळाव्यानिमित्त शक्तिप्रदर्शन; राज-उद्धव वरळी डोममध्ये एकाच व्यासपीठावर
7
‘खरे सुख श्रमाच्या पोटीच जन्म घेते; विसरू नका!’
8
शालार्थ आयडी, ३ महिन्यांत होणार एसआयटी चौकशी, शिक्षणमंत्री दादा भुसेंची माहिती
9
कोण खरे बोलते आहे? आणि कोणाचे दावे झूठ आहेत?
10
विधिमंडळाची ही आचारसंहिता; पण आमदार तसे वागतात का?
11
कुंडमळा पुलाच्या बांधकामात दिरंगाई झाली; सार्वजनिक बांधकाममंत्री भोसले यांची कबुली
12
बाळासाहेब ठाकरे यांचे महापौर बंगल्यातच स्मारक; उच्च न्यायालयाने आव्हान याचिका फेटाळल्या
13
वसई-विरारमध्ये १६ ठिकाणी ईडीची धाड; अनधिकृत इमारती प्रकरणी आर्किटेक्ट, अभियंते रडारवर
14
मराठी सक्तीचीच, पण हिंदीचाही अभिमान, मराठी माणसाला मुंबईतून कोणी घालविले : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा हल्लाबोल
15
डेटिंगवरून वाद विकोपाला, मुलीने जीव गमावला; सीसीटीव्ही, साक्षीदारांमुळे तपासाला दिशा
16
टायर-ट्यूबमधून जीवघेणा प्रवास, जव्हार तालुक्यातील प्रकार : पूल तर नाहीच, पण होडीसुद्धा उपलब्ध नाही
17
जहाजाच्या पुढील प्रवासाला ना हरकत देण्यासाठी लाचखोरी ; पोर्ट विभागाच्या ३ कॅप्टनसह दोघे सीबीआयच्या जाळ्यात
18
लेडीज डब्यामध्ये प्रवाशाकडे बाळ देऊन महिला पसार; सीवूड स्थानकातील घटना; पोलिसांकडून तपास सुरू
19
‘न्यू इंडिया’ सप्टेंबरपर्यंत सारस्वतमध्ये विलीन; ठेवीदारांच्या व्यापक हितासाठी निर्णय : ठाकूर
20
"मी तेव्हा त्याच रूममध्ये होतो..."; ट्रम्प यांच्या युद्धविरामासंदर्भातील दाव्यावर एस जयशंकर यांची अमेरिकेतून पहिली प्रतिक्रिया

जनावरांची निर्दयतेने वाहतूक करणारे दोघे ताब्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2020 18:47 IST

नांदूरशिंगोटे : नाशिक-पुणे महामार्गावर नांदुरशिंगोटे येथे जिल्हा नाकाबंदी दरम्यान शुक्र वारी (दि. १०) सकाळी ११.३० वाजेच्या सुमारासद संगमनेरहून सिन्नरच्या ...

ठळक मुद्दे अठरा जनावरांची निर्दयतेने होणारी वाहतूक पोलिसांनी पकडली.

नांदूरशिंगोटे : नाशिक-पुणे महामार्गावर नांदुरशिंगोटे येथे जिल्हा नाकाबंदी दरम्यान शुक्र वारी (दि. १०) सकाळी ११.३० वाजेच्या सुमारासद संगमनेरहून सिन्नरच्या दिशेने जाणाऱ्या ट्रकमधून अठरा जनावरांची निर्दयतेने होणारी वाहतूक पोलिसांनी पकडली. या कारवाईत १४ लाख ६० हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून दोघांविरुध्द वावी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा सरहद्दीवर तपासणी नाके कार्यान्वीत करण्यात आले आहेत. पुणे महामार्गावर नांदुरशिंगोटे येथील तपासणी नाक्यावर सहाय्यक पोलीस निरीक्षक रणजित गलांडे यांच्या सूचनेवरून जनावरांची अवैध वाहतूक करणाºया वाहनाचा शोध घेण्यात येत होता. पोलीस उपनिरीक्षक अजय ढाकणे, एमआयडीसी व वावी पोलीस ठाण्यातील कर्मचारी तसेच महामार्ग सुरक्षा पथकाच्या कर्मचाऱ्यांना एमएच ०४ जेयु ७०५६ या अशोक लेलँड ट्रक मध्ये म्हैस रेडे व म्हशीच्या पिल्लांची वाहतूक करण्यात येत असल्याचे आढळून आले.संबंधित वाहन चालक साकिब अब्दुल गफुर मोमिन (२७) व जुबेर इस्माईल बादशाह शेख (२३) राहणार भिवंडी, जि. ठाणे यांच्याकडे जनावरांच्या वाहतुकीचा परवाना मागितला असता त्यांनी परवाना नसल्याचे सांगितले. यानंतर वाहन तपासणी केली असता चार म्हशी, चार रेडे, एक ते दीड वर्ष वयोगटातील म्हशीची अठरा पिल्ले निर्दयपणे ट्रकमधून वाहून नेत असल्याचे उघडकीस आले.याप्रकरणी पोलीस शिपाई विठ्ठल पवार यांनी सदर दोघांविरोधात वावी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. जिल्ह्यात संचारबंदी लागू असताना विनापरवाना, बेकायदा जनावरांची निर्दयतेने वाहतूक केल्याप्रकरणी या दोघांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

टॅग्स :Police Stationपोलीस ठाणेCrime Newsगुन्हेगारी