शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

बोरसे यांचा ‘आमदार आपल्या गावी’ उपक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2019 00:35 IST

सरकार कोणतेही असो लोकप्रतिनिधीने प्रतिनिधित्व करत असताना सकारात्मक दृष्टिकोन ठेवल्यास लोककल्याणकारी योजना राबविणे अशक्य नाही. हाच मंत्र घेऊन आगामी काळात राजकीय जोडे बाजूला काढून बागलाणचा कायापालट करण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करणार असल्याचे प्रतिपादन बागलाणचे आमदार दिलीप बोरसे यांनी केले.

ठळक मुद्देशेतकऱ्यांनी मांडली पाण्याअभावी हाल होत असल्याची कैफियत

सटाणा : सरकार कोणतेही असो लोकप्रतिनिधीने प्रतिनिधित्व करत असताना सकारात्मक दृष्टिकोन ठेवल्यास लोककल्याणकारी योजना राबविणे अशक्य नाही. हाच मंत्र घेऊन आगामी काळात राजकीय जोडे बाजूला काढून बागलाणचा कायापालट करण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करणार असल्याचे प्रतिपादन बागलाणचे आमदार दिलीप बोरसे यांनी केले.गेल्या आठवड्यात शपथविधी व सरकार स्थापन झाल्यानंतर आमदार बोरसे यांनी प्रत्येक गावाच्या समस्या जाणून घेण्यासाठी ‘आमदार आपल्या गावी’ उपक्र म हाती घेतला आहे. याचा प्रारंभ बुधवारी (दि.४ ) जायखेडा जिल्हा परिषद गटातील करंजाड गावापासून करण्यात आला. याउपक्र मादरम्यान रब्बी हंगामात शेतीच्या विजेची मोठ्या प्रमाणात समस्या असल्याचे आमदार बोरसे यांच्या निर्दशनास आले.बहुतांश ठिकाणी रात्रीच्या सुमारास वीजपुरवठा केला जातो त्यामुळे कांदा लागवड रखडली आहे. काही ठिकाणी दोन-दोन महिने कृषिपंपावरील ट्रान्सफार्मर बसविले जात नसल्यामुळे जनावरांचे पाण्याअभावी हाल होत असल्याची कैफियत शेतकऱ्यांनी मांडली. आमदार बोरसे यांनी तत्काळ वीज महावितरण कंपनीचे कार्यकारी अभियंता सुनील बोंडे यांच्याशी संपर्क साधून प्रतीक्षेत असलेल्या कृषिपंपाचे ट्रान्सफार्मर बसविण्याच्या सूचना दिल्या. तसेच आवश्यक ठिकाणी विजेची मागणी होत असेल त्या ठिकाणी जास्त क्षमतेचे ट्रान्सफार्मर बसवावेत असेही सांगितले. दरम्यान शेती सिंचनाच्या व रस्त्यांच्या कामाचा अनुशेष भरून काढण्यासाठी आगामी काळात आपला कालबद्ध कार्यक्र म राहणार आहे. असे आमदार बोरसे यांनी स्पष्ट केले.या उपक्रमदरम्यान करंजाड, भुयाणे, निताणे, बिजोटे, कोटबेल, गोराणे, आसखेडा, वाघळे, राजपूरपांडे, उत्राणे, एकलहरे, वाडीपिसोळ, जायखेडा आदी गावांना भेटी देऊन आमदार बोरसे यांनी सरपंच, सदस्य व ग्रामस्थांशी प्रत्यक्ष संवाद साधला. याप्रसंगी करंजाडच्या सरपंच उज्ज्वला देवरे, राकेश देवरे, उपसरपंच रामदास देवरे, अरु ण देवरे, दगडू बोरसे, वसंत देवरे, प्रवीण देवरे, दिलीप शेवाळे, खंडू शेवाळे, शांताराम शेवाळे, भरत शेवाळे, निताणे येथील सरपंच रेखा देवरे, अशोक देवरे आदी उपस्थित होते. रावसाहेब देवरे, संजय देवरे, बाळू पवार, बिजोटे येथील बळीराम जाधव, पोपट जाधव, खंडू जाधव, गोपाल जाधव, कोटबेलचे बाजार समितीचे संचालक भाऊसाहेब कांदळकर ,एकलहरे येथील किरण पाटील, जायखेडा येथील सरपंच शांताराम अहिरे, उपसरपंच संदेश मोरे, शिवा महाराज, बापू खुडानकर आदी उपस्थित होते.

टॅग्स :MLAआमदार