शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत अग्नितांडव; कफ परेड आगीत एका मुलाचा मृत्यू, तीन जण रुग्णालयात; एकाची प्रकृती चिंताजनक
2
कतरने मोठी चूक केली...! तालिबानने युद्धविरामातील एका शब्दावर तीव्र आक्षेप घेतला, निवेदन बदलण्याची वेळ आली...
3
विकली जाणार देशातील 'ही' दिग्गज खासगी बँक; ₹२६,८५० कोटींची डील, UAE च्या या कंपनीच्या हाती येणार सूत्रं
4
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्र्म्प आणि युक्रेनच्या झेलेन्स्कींचे पुन्हा जोरदार भांडण; नकाशा बाजुला फेकला... 
5
हाँगकाँगमध्ये UAE चे कार्गो प्लेन रनवेवरून समुद्रात घसरले; विमानातील कर्मचारी वाचले, पण दोन ग्राउंड स्टाफचा मृत्यू
6
दिवाळी सुरु नाही झाली तोच दिल्लीची हवा अतिविषारी बनली; आनंद विहारमध्ये गुणवत्ता ४१७ वर...
7
'त्या' तरूणाचा प्रायव्हेट पार्ट कुणी कापला? अखेर उलगडा झाला! समोर आलं धक्कादायक सत्य
8
ट्रम्पविरोधात अमेरिकन पेटून उठले, ‘नो किंग्ज’ म्हणत रस्त्यावर उतरले! सरकारी हुकुमशाहीचा विरोध
9
आजचे राशीभविष्य : सोमवार २० ऑक्टोबर २०२५; आजचा दिवस व्यापार-व्यवसायासाठी लाभदायी, जुनी येणी, प्रवास, अर्थ प्राप्तीसाठीही अनुकूल
10
महाराष्ट्राला केंद्राकडून १,५६६ कोटी मदत; अमित शाह यांची घोषणा, CM फडणवीसांनी मानले आभार
11
परकीयांनी आधी विध्वंस करून लुटले, तर नंतर आलेल्यांनी बुद्धीला लुटले: सरसंघचालक मोहन भागवत
12
राज्यात ९६ लाख खोटे मतदार; राज ठाकरेंचा आरोप, निवडणुका शांततेत हव्या तर मतदार याद्या स्वच्छ करा
13
नितीशकुमारच एनडीएचे सर्वसहमतीचे नेते असतील; अमित शाह यांच्या वक्तव्यानंतर जदयूचा दावा
14
काय सांगता! १८६ कार खरेदी, तब्बल २१ कोटींचा डिस्काऊंट दिला; ऑडी, BMW, मर्सिडिज घेतल्या
15
झामुमोने दिला ‘एकला चलो’चा नारा; महाआघाडी आता फुटीच्या उंबरठ्यावर, जागावाटपावरून मतभेद
16
बिहार निवडणूक २०२५: निवडणूक आयोगाची ‘आर्थिक गुप्तचर समिती’ ६ वर्षांनी पुन्हा सक्रिय
17
आरोपीच्या वकिलाने ५०० पानी अर्ज केला, न्यायालयाने जामीन फेटाळला; नेमके प्रकरण काय?
18
चांदी स्थिरावणार, सोने भाव खाणार; चांदीचा प्रीमियम उतरला २५ हजारांवरून शून्यावर
19
पॅरिसच्या लूव्र म्युझियममध्ये ४ मिनिटांत नेपोलियन तिसरा याच्या ९ मौल्यवान वस्तू लांबवल्या
20
पाकिस्तान-अफगाण शस्त्रसंधीसाठी राजी; संघर्ष थांबणार, दोहा येथे वाटाघाटी

बोरखिंड, कोनांबे ओव्हरफ्लो; सिन्नरच्या पश्चिम पट्ट्यात जोर‘धार’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2020 00:22 IST

सिन्नर : तालुक्यातील पश्चिम पट्ट्यात झालेल्या जोरदार पावसामुळे बोरखिंड व कोनांबे ही दोन्ही धरणे गुरुवारी तुडुंब भरून वाहू लागली आहेत. बोरखिंड व कोनांबे धरणांच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या जोरदार पावसाने पाणीसाठ्यात कमालीची वाढ झाल्याने ते ओव्हरफ्लो झाले. धरणातील वाढत्या पाणीसाठ्याने या परिसरातील बळीराजाला दिलासा मिळाला आहे.

सिन्नर : तालुक्यातील पश्चिम पट्ट्यात झालेल्या जोरदार पावसामुळे बोरखिंड व कोनांबे ही दोन्ही धरणे गुरुवारी तुडुंब भरून वाहू लागली आहेत. बोरखिंड व कोनांबे धरणांच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या जोरदार पावसाने पाणीसाठ्यात कमालीची वाढ झाल्याने ते ओव्हरफ्लो झाले. धरणातील वाढत्या पाणीसाठ्याने या परिसरातील बळीराजाला दिलासा मिळाला आहे. याशिवाय स्थानिक पाणीपुरवठा योजनांना संजीवनी मिळाली आहे. म्हाळुंगी आणि देवनदीच्या उगमस्थानी गेल्या तीन-चार दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे कोनांबे धरणात पाण्याची आवक वाढली. कोनांबे धरणाची एकूण साठवण क्षमता ५४.५० दलघफू तर बोरखिंडची क्षमता ५५.६५ दलघफू एवढी आहे. सध्या देवनदीसह ठाणगावजवळच्या म्हाळुंगीला पूर आहे. कोनांबे धरणातून राबविण्यात आलेल्या भाटवाडीसह आठ गावे तसेच उंबरदरी धरणातून ठाणगावसह पाच गाव पाणी योजनेला संजीवनी मिळणार आहे. धरणांच्या लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांनाही दिलासा मिळाला आहे. म्हाळुंगी नदीच्या उगमक्षेत्रात झालेल्या पावसाने ही नदी प्रवाही होऊन पाणी थेट भोजापूर धरणात पोहोचले आहे. भोजापूर धरणावर मनेगावसह १६ गावे आणि कनकोरीसह पाच गावे पाणीपुरवठा योजना अवलंबून आहे. त्यामुळे या गावातील पाणीटंचाई मिटण्यासाठी भोजापूर धरणात पाण्याची मोठ्या प्रमाणात आवक वाढणे अपेक्षित आहे. भोजापूर धरणात जवळपास ५७ टक्के पाणीसाठा झाला आहे.

टॅग्स :DamधरणRainपाऊस