शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

ड्रायपोर्टमुळे जिल्हा बॅँकेला ‘बूस्ट’; निसाकाकडील वसुली होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 18, 2017 01:22 IST

केंद्रीय भृपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी नाशिक व सांगली येथे निर्यातीसाठी ड्रायपोर्ट उभारण्याची घोषणा केल्याने आर्थिक अडचणीत असलेल्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेला अप्रत्यक्ष का होईना बूस्ट मिळाले आहे. निफाड साखर कारखान्याच्या शंभरहून अधिक हेक्टर जागेवर नियोजित ड्रायपोर्टमुळे केंद्र सरकार आता ही जागा खरेदी करणार आहे.

नाशिक : केंद्रीय भृपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी नाशिक व सांगली येथे निर्यातीसाठी ड्रायपोर्ट उभारण्याची घोषणा केल्याने आर्थिक अडचणीत असलेल्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेला अप्रत्यक्ष का होईना बूस्ट मिळाले आहे. निफाड साखर कारखान्याच्या शंभरहून अधिक हेक्टर जागेवर नियोजित ड्रायपोर्टमुळे केंद्र सरकार आता ही जागा खरेदी करणार आहे. त्या बदल्यात जिल्हा बॅँकेची शेकडो कोटींची थकबाकी मात्र अनासायास केंद्र सरकारकडून जागेच्या मोबदल्यात वसूल होण्याची चिन्हे आहेत.  दरम्यान, यापूर्वीच जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेने निफाड व नाशिक सहकारी कारखान्याकडून सुमारे सव्वादोनशे कोटींहून अधिकच्या थकबाकी वसुलीसाठी दोन वेळा वर्तमानपत्रातून कारखाने विक्रीसाठी व भाडेतत्त्वावर देण्यासाठी निविदा मागविल्या आहेत. त्यातच आता नाशिकच्या ड्रायपोर्टचा मुद्दा उपस्थित झाल्याने जिल्हा बॅँकेला काहीसे हायसे वाटले आहे. निफाड साखर कारखान्याकडील सुमारे १३५ कोटींच्या थकबाकीसाठी कारखान्याच्या ताब्यातील जमीन विक्रीसाठी जिल्हा बॅँकेने काढली आहे. केंद्र सरकारकडून ड्रायपोर्टसाठी निसाकाची जागा खरेदी करताना पन्नास एकरहून अधिक जागेत असलेल्या निफाड साखर कारखान्याच्या वस्तूला धक्का लावण्यात येणार नाही. इतकेच नव्हे तर निसाका सुरू करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मदत करण्याचे आश्वासन दिलेले असल्याने निसाकाही सुरू होण्यास मदत होणार आहे.ड्रायपोर्टसाठी निसाकाची जमीन घेतली जाणार आहे. त्या बदल्यात येणारी रक्कम जिल्हा बॅँकेच्या थकबाकी वसुलीत जमा होणार आहे. अद्याप यासंदर्भात कागदोपत्री काही माहिती प्राप्त झालेली नाही किंवा कोणताही आदेश प्राप्त झालेला नाही. मात्र असे झाल्यास जिल्हा बॅँकेच्या दृष्टीने तो एक चांगला निर्णय राहील. जिल्हा बॅँकेची थकबाकी वसूल होण्यास त्यामुळे मदतच होणार आहे. -  राजेंद्र बकाल, कार्यकारी संचालक, नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँक ड्रायपोर्टसाठी लागणारी  शंभर हेक्टर जागा केंद्र सरकार निफाड साखर कारखान्याकडून पर्यायाने जिल्हा बॅँकेकडून विकत घेण्याची शक्यता आहे. त्या बदल्यात जी रक्कम मिळेल, ती जिल्हा बॅँक निसाकाच्या थकबाकी वसुलीपोेटी जमा करणार आहे. त्यामुळे जिल्हा बॅँकेच्या वर्षानुवर्षे निसाकाकडील थकीत कोट्यवधींच्या वसुलीसाठी एकप्रकारे मदतच होणार आहे.

टॅग्स :Sugar factoryसाखर कारखानेnifadनिफाड