शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
2
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
3
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
4
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
5
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
6
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
7
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
8
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
9
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं
10
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
11
अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटला व्लादिमीर पुतीन यांचा डुप्लिकेट? त्या गोष्टीमुळे केला जातोय असा दावा
12
कोणत्याही खेळाडूवर येणार नाही पंतसारखी वेळ! जाणून घ्या BCCI चा नवा नियम
13
Jyoti Chandekar Death: 'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
14
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
15
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले
16
गेल्याच वर्षी मृत्यूच्या दाढेतून परत आलेल्या पूर्णा आजी, 'ठरलं तर मग'च्या सेटवरच बेशुद्ध होऊन पडल्या आणि मग...
17
मॅक्सवेलची जिगरबाज खेळी! उलटा फटका मारत हातून निसटलेल्या मॅचसह ऑस्ट्रेलियाला जिंकून दिली मालिका
18
"राजकारणाकडे करिअर म्हणून बघा...", सुप्रिया सुळेंची मल्हार फेस्टमध्ये हजेरी; विद्यार्थ्यांना केलं मार्गदर्शन
19
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
20
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?

नाईक शिक्षणसंस्था सभेत सभासदांमध्ये धक्काबुक्की

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2019 01:36 IST

क्रांतिवीर वसंतराव नारायणराव नाईक शिक्षण प्रसारक संस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा गोंधळ, हमरीतुमरी आणि धक्काबुक्कीने गाजली. वसंत मार्केटच्या टेरेसची जागा आणि नवीन मतदार नोंदणीच्या विषयांवरून वार्षिक सर्वसाधारण सभांमध्ये गोंधळ झाल्यानंतर यावर्षी संस्थेच्या २६ कोटी ११ लाख रुपयांच्या जमीन विक्री प्रकरणात घोटाळ्याच्या आरोपांमुळे सभेत आजी-माजी पदाधिकाऱ्यांच्या समर्थक सभासदांमध्ये धक्काबुक्की झाल्याचा प्रकार घडला.

ठळक मुद्देपदाधिकाऱ्यांमध्ये वाद : जमीन विक्री प्रकरणात घोटाळ्याच्या आरोपांनी गोंधळ

नाशिक : क्रांतिवीर वसंतराव नारायणराव नाईक शिक्षण प्रसारक संस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा गोंधळ, हमरीतुमरी आणि धक्काबुक्कीने गाजली. वसंत मार्केटच्या टेरेसची जागा आणि नवीन मतदार नोंदणीच्या विषयांवरून वार्षिक सर्वसाधारण सभांमध्ये गोंधळ झाल्यानंतर यावर्षी संस्थेच्या २६ कोटी ११ लाख रुपयांच्या जमीन विक्री प्रकरणात घोटाळ्याच्या आरोपांमुळे सभेत आजी-माजी पदाधिकाऱ्यांच्या समर्थक सभासदांमध्ये धक्काबुक्की झाल्याचा प्रकार घडला.के. व्ही. एन. नाईक महाविद्यालयाच्या आवारात रविवारी (दि.२२) क्रांतिवीर वसंराव नाईक शिक्षण प्रसारक संस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा संस्थेचे अध्यक्ष पंढरीनाथ थोरे यांच्या अध्यक्षतेत झाली. व्यासपीठावर उपाध्यक्ष पी. आर. गिते, सरचिटणीस हेमंत धात्रक, सहचिटणीस तथा माजी नगरसेवक अ‍ॅड. तानाजी जायभावे, विश्वस्त दिगंबर गिते, दामोदर मानकर, सुभाष कराड, भास्करराव सोनवणे आदी उपस्थित होते. संस्थेचे उपाध्यक्ष अ‍ॅड. पी. आर. गिते यांनी सभेच्या कामकाजाला सुरुवात करतानाच काही सभासदांनी त्यांना विरोध करीत सर्वसाधारण सभेच्या परंपरेप्रमाणे सरचिटणीस यांनीच कामकाज चालविण्याची मागणी केली. त्यामुळे सरचिटणीस हेमंत धात्रक यांनी सभेच्या कामकाजाची सूत्रे आपल्या हातात घेतली. मात्र सभासदांनी माजीमंत्री दिवंगत तुकाराम दिघोळे यांच्या पश्चात त्यांच्याविषयी संस्थेने बेजबाबदारपणा दाखविल्याचा आरोप करीत पदाधिकाºयांना विचारणा केली. या कारणावरून संस्थेचे स्वीकृत संचालक अभिजित दिघोळे यांच्यासह मनोज बुरकुले, विश्वस्थ अ‍ॅड. अशोक आव्हाड व बाळासाहेब वाघ यांनी व्यासपीठावर न बसता सभासदांमध्ये बसून संस्थेच्या अध्यक्षांविरोधात निषेध व्यक्त केला. संस्थेचे अध्यक्ष कार्यकारी मंडळाला विश्वासात न घेता मनमानी संस्थेचा कामकाज चालवित असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला. गत पंचवार्षिकमधील संस्थेची जमीन २६ कोटी ११ लाख रुपयांना विक्री करताना त्यात घोटाळा झाल्याचा आरोप करतानाच या प्रकरणाच्या वारंवार चौकशीची मागणी करूनही अध्यक्ष व पधाधिकारी गांभीर्याने घेत नसल्याचा आरोप संस्थेच्या उत्पन्न स्त्रोतांविषयी कार्यकारी मंडळाला माहिती दिली जात नसल्याचा आरोप अ‍ॅड. अशोक आव्हाड यांनी केला. त्यामुळे आक्रमक झालेल्या सभासदांनी अध्यक्षांना याबाबत विचारणा केल्यामुळे या प्रकरणातील खरेदीदार बांधकाम व्यावसायिक किरण फड यांना सभेत खुलासा करण्याची संधी दिल्याने काही सभासदांमध्ये बाचाबाची होऊन हमरी- तुमरी आणि धक्काबुक्कीचा प्रकार घडल्याने सभेला गालबोट लागले.दरम्यान, संस्थेचे अध्यक्ष पंढरीनाथ थोरे यांनी त्यांच्यावरील सर्व आरोपांचे खंडन करीत संस्थेचा कामकाज नियमांनुसार सुरू असून, सभासदांनी सभेत केलेल्या मागण्या आणि सूचनांविषयी कार्यकारी मंडळ नियमानुसार सकारात्मक कार्यवाही करणार असल्याचे सांगत सभासदांना आश्वस्थ केले. यावेळी कार्यकारी मंडळातील संचालक विलास आव्हाड, विष्णू नागरे, सुरेश घुगे, मंगेश नागरे, विठोबा फडे, अ‍ॅड. सुधारकर कराड, अशोक नागरे, अशोक भाबड, रामनाथ बोडके, भगवंत चकोर, तुळशीराम विंचू, विजय सानप, जयंत सानप, विजय बुरकूल, शोभा बोडके, अंजना काकड आदींसह सभासद उपस्थित होते.दिघोळे संकुल नामकरणमाजी मंत्री दिवंगत तुकाराम दिघोळे यांनी संस्था आणि समाजासाठी मोठे योगदान दिले आहे. त्यांनी संस्थेच्या शाळांची संख्या ४ वरून ६४ पर्यंत वाढवली. त्यामुळे दिघोळे यांच्या प्रति आदरभाव व्यक्त करीत संकुलास टी. एस. दिघोळे शैक्षणिक संकुल असे नाव देण्याची मागणी, माजी पदाधिकारी अशोक धात्रक यांनी केली. त्यास सर्व सभासदांनी सहमती दर्शवली. याप्रकरणी संचालक मंडळाच्या बैठकीत निर्णय घेण्याचे आश्वासन अध्यक्षांनी दिले.माजी अध्यक्ष आक्रमकजमीन विक्री प्रकरणात घोटाळ्याचा आरोप झाल्याने माजी अध्यक्ष कोंडाजीमामा आव्हाड यांनी आक्रमक भूमिका घेतली. यावेळी संबंधित खरेदीदार बांधकाम व्यावसायिक या प् व्यवहाराचा खुलासा करण्यासाठी सभेत उपलब्ध असल्याचे काही पदाधिकाºयांनी निदर्शनास आणून दिली. परंतु, सभेत सभासद वगळता कोणालाही बोलण्यास अन्य सभासदांनी विरोध केला. त्यामुळे वाद होऊन हे प्रकरण हमरी-तुमरी आणि नंतर धक्काबुक्कीपर्यंत पोहोचले. या गोंधळानंतर खरेदीदार किरण फड यांस बोलण्याची संधी मिळाली,यावेळी त्यांनी तत्कालीन कार्यकारी मंडळातील कोणीही या व्यवहारात पैशाची मागणी केली नसल्याचे स्पष्ट केले. मात्र त्यांनी कुणाच्याही नावाचा उल्लेख केला नाही. यानंतर सुरू झालेल्या गोंधळात अध्यक्षांनी विषयपत्रिकेवरील सर्व विषय पुकारले असता सभासदांनी त्यांना कोणत्याही चर्चेशिवाय मंजुरी दिली.अध्यक्षांकडून दिलगिरीसंस्थेच्या अहवाल पुस्तिकेत काही व्यक्तींची चुकीचे छायाचित्र छापल्याने त्यात दुरुस्ती करण्यात आली. यावेळी अहवाल पुस्तिकेतील उणिवांविषयी अध्यक्ष पंढरानाथ थोरे यांनी दिलगिरी व्यक्त केली, तर सभासदांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे देताना त्यांनी मैदानाचे भाडे वाढविण्याबाबत निर्णय घेण्यात येणार असून, दिवाळीच्या काळात कमी भाड्याने जागा दिल्याच्या मुद्द्यावरून संबंधित संस्थांकडून वसुलीप्रक्रिया सुरू असल्याचे सांगितले. सिन्नर येथील जागेचा विकास करण्याबाबत येत्या जानेवारीत अ‍ॅड. सुदाम सांगळे यांच्यासह प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक घेऊन सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन देतानाच नायगाव येथील शाळेची इमारत जूनपर्यंत पूर्ण करण्याच्या सूचनाही संबंधित ठेकेदारास देण्यात आल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. मृत सभासदांच्या वारसांना सदस्यत्व देण्याविषयी सकारात्मक भूमिका घेण्याचे आश्वासन त्यांनी दिले.

टॅग्स :Nashikनाशिकagitationआंदोलन