पाटोदा : परतीच्या पावसाने बाधित झालेली द्राक्षबाग महागडी औषधे फवारणी करूनही वांझोटी निघाल्याने व बागेसाठी कर्जाचा डोंगर वाढू लागल्याने येवला तालुक्यातील शिरसगाव लौकी येथील भानुदास पुंडलिक वाकचौरे या शेतकऱ्याने बागेवर कुºहाड चालवून बाग भुईसपाट केली. भानुदास वाकचौरे यांनी शिरसगाव शिवारात गट नंबर ९० अ व ब मध्ये एक एकर सोनाका व एक एकर थॉमसन जातीच्या द्राक्ष वाणाची लागवड केलेली आहे. त्यासाठी बँक आॅफ इंडियाच्या लासलगाव शाखेचे सुमारे आठ लाख रु पये कर्ज घेतलेले आहे.गेल्या चार-पाच वर्षांपासून येवला तालुक्यातील शेतकरी दुष्काळाच्या सावटाखाली जीवन जगत आहे. दुष्काळाचा सामनाकरीत मिळेल तेथून दोन ते तीन हजार रु पये एका टँकरसाठी खर्च करून पाणी उपलब्ध करून आपल्याद्राक्ष व डाळिंबबागा जगविल्या. यावर्षी निर्यातक्षम द्राक्षबागेसाठी एकरी सुमारे अडीच लाखांच्या आसपास खर्च करून द्राक्षबाग धरली, मात्र परतीच्या पावसाने होत्याचं नव्हतं केलं.संपूर्ण द्राक्षबाग बाधित झाल्याने या शेतकºयाने द्राक्षबागेवर जड अंत:करणाने कुºहाड चालवून बाग भुईसपाट करण्याचा सपाटा लावला आहे. परतीच्या पावसाने झाडांवर असलेल्या सुमारे नव्वद ते शंभर घडांपैकी फक्त वीस पंचवीस घड शिल्लक राहिले.उर्वरित घडही डावणीच्या विळख्यात सापडून बाग पूर्णपणे वाया गेली. बागेत जास्त पाणी साचल्याने औषध फवारणीसाठी अडचणी आल्यामुळे संपूर्ण बाग फेल गेली असल्याने पुढील होणारा खर्च व कर्जाचा डोंगर कमी करण्यासाठीबाग भुईसपाट करण्याशिवाय त्यांच्यापुढे पर्याय नसल्याने त्यांनी स्वत: तसेच मजुरांकरवी बाग भुईसपाट केली आहे.
शिरसगावी द्राक्षबागेवर चालविली कुºहाड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 17, 2019 19:23 IST
परतीच्या पावसाने बाधित झालेली द्राक्षबाग महागडी औषधे फवारणी करूनही वांझोटी निघाल्याने व बागेसाठी कर्जाचा डोंगर वाढू लागल्याने येवला तालुक्यातील शिरसगाव लौकी येथील भानुदास पुंडलिक वाकचौरे या शेतकऱ्याने बागेवर कुºहाड चालवून बाग भुईसपाट केली.
शिरसगावी द्राक्षबागेवर चालविली कुºहाड
ठळक मुद्देपरतीचा पाऊस : फवारणीकरुनही फायदा नाही, शेतकरी त्रस्त