नाशिक : वेळ दुपारी साडेचार वाजेची...उंटवाडी येथील सिटीसेंटर मॉल नेहमीप्रमाणे गजबजलेले... पहिल्या मजल्यावर एका दालनालगत बॉम्बसदृश वस्तू आढळते... तळमजल्यासह अखेरच्या मजल्यावर आग लागते...इमारतीमध्ये काही लोक अडकल्याचे समजताच...अवघ्या पुढील पाच मिनिटांत अग्निशामक दला, बॉम्ब शोधक-नाशक पथक लवाजम्यासह तत्परतेने दाखल...आपत्कालीन स्थितीत बचावकार्याला वेग येतो अन् अवघ्या अर्ध्या तासात आगीवर नियंत्रण मिळविले जाते आणि बॉम्बसदृश वस्तूचा धोकाही टळतो.अग्निशामक दलाच्या वतीने अग्निशामक सेवा सप्ताहाला मंगळवारपासून (दि.१०) प्रारंभ करण्यात आला. सेवा सप्ताहच्या पहिल्याच दिवशी अग्निशामक दल व बॉम्ब शोधक-नाशक पथकाच्या वतीने आपत्कालीन स्थितीत तत्परतेने दाखल होत नागरिकांना मदत पोहचविण्याची रंगीत तालीमचा प्रयोग मॉलमध्ये करण्यात आला. दुपारच्या सुमारास अग्निशामक दलाचा दूरध्वनी खणखणतो. सिटी सेंटर मॉलमध्ये आग लागली असून, काही लोक इमारतीच्या गच्चीवर अडकल्याची माहिती मिळते. शिंगाडा तलाव येथील अग्निशामक मुख्यालयातून अति जलद वाहन ‘देवदूत’, हायड्रोलिक शिडी बंब, हॅजमेट रेस्क्यू वाहन, रुग्णवाहिका मॉलच्या दिशेने सायरन वाजवित जवानांसह रवाना होतात. पुढील तीन ते चार मिनिटांत ही सर्व वाहने मॉलच्या परिसरात पोहचतात. सब आॅफिसर दीपक गायकवाड, लिडिंग फायरमन इकबाल शेख, श्याम राऊत, वाहनचालक दत्तात्रय इंगळे, संजय राऊन, जगन्नाथ पोटिंदे, फायरमन तानाजी, घनश्याम इंफाळ, व्ही. पी. शिंदे, अनिल गांगुर्डे, भीमाशंकर खोडे, इसहाक शेख आदींकडून मदतकार्य सुरू केले जाते. हायड्रोलिक शिडीद्वारे जवान बहुमजली मॉलच्या गच्चीवर पोहचतात. गच्चीवरील चौघा नागरिकांना सुखरूपपणे शिडीद्वारे रेस्क्यू करून ट्रॉलीमधून खाली उतरविले जाते. तत्काळ आगीवर नियंत्रण जवानांकडून मिळविले जाते आणि उपस्थित नाशिककर सुटकेचा नि:श्वास सोडतात.
बॉम्बसदृश वस्तू; आगीने धावपळ मॉकड्रिल : अग्निशामक दल, बॉम्बशोधक-नाशक पथकाची तत्परता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2018 00:20 IST
नाशिक : वेळ दुपारी साडेचार वाजेची...उंटवाडी येथील सिटीसेंटर मॉल नेहमीप्रमाणे गजबजलेले... पहिल्या मजल्यावर एका दालनालगत बॉम्बसदृश वस्तू आढळते...
बॉम्बसदृश वस्तू; आगीने धावपळ मॉकड्रिल : अग्निशामक दल, बॉम्बशोधक-नाशक पथकाची तत्परता
ठळक मुद्देअन् अवघ्या अर्ध्या तासात आगीवर नियंत्रण मिळविले जाते रंगीत तालीमचा प्रयोग मॉलमध्ये करण्यात आला