शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
3
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
4
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
5
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
6
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
7
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
8
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
9
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
10
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
11
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
12
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान
13
"कपडे काढून बस अन्...", साजिद खानने अभिनेत्रीकडे केली होती विचित्र मागणी; म्हणाली...
14
"....नाहीतर मी मेलो असतो"; केदार शिंदेंच्या आयुष्यात स्वामी समर्थ कसे आले?
15
Astro Tips: अचूक उत्तर मिळण्यासाठी ज्योतिषांकडे एखादा प्रश्न घेऊन कधी जायला हवे? जाणून घ्या!
16
सुनील मित्तल यांच्यानंतर मुकेश अंबानीही पुढे आले; चीनच्या 'या' कंपनीच्या मागे का पडलेत हे दिग्गज?
17
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
18
इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांना आता ४० नाही तर फक्त ५ दिवसात मिळणार अनुदान; कसा करायचा अर्ज?
19
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
20
"माझा विनयभंग झाला असता", अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रसंग; धोनीला अवॉर्ड दिल्यानंतर...

मनपा आयुक्तांच्या मोटारीच्या नावाने मिळाले बोगस पीयूसी !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2019 01:35 IST

पीयूसी म्हणजेच मोटारीसाठी मिळणारे प्रदूषण नियंत्रण मंडळाचे प्रमाणपत्र अगदी सहजगत्या मिळू शकतेच, पन्नास रुपये हातावर टेकवले तर मोटारीचा क्रमांक मग तो जिल्हाधिकाऱ्यांचा असो किंवा महापालिका आयुक्तांचा...सहज प्रमाणपत्र हातात मिळते

नाशिक : पीयूसी म्हणजेच मोटारीसाठी मिळणारे प्रदूषण नियंत्रण मंडळाचे प्रमाणपत्र अगदी सहजगत्या मिळू शकतेच, पन्नास रुपये हातावर टेकवले तर मोटारीचा क्रमांक मग तो जिल्हाधिकाऱ्यांचा असो किंवा महापालिका आयुक्तांचा...सहज प्रमाणपत्र हातात मिळते! धंदा होतोय ना, मग प्रदूषण-पर्यावरणाची काय तमा... असाच प्रकार काही सामाजिक कार्यकर्त्यांनी उघड केला असून, त्यांनी महापालिका आयुक्तांच्या मोटारीच्या नावाचे प्रमाणपत्र पाथर्डीरोडवरील एका पेट्रोलपंपावरून सहजगत्या मिळवले. विशेष म्हणजे राज्यात प्रदूषित हवेबाबत नाशिकचा क्रमांक सहावा तर देशात पन्नासावा आहे. अशा स्थितीत हा प्रकार आढळल्याने पर्यावरणप्रेमींना धक्का बसला आहे.प्रदूषणाची पातळी दिवसेंदिवस वाढत असून त्याचा मानवी आरोग्यावर प्रतिकूल परिणाम होत असतो. त्यामुळे पर्यावरण राखण्यासाठी काही तरी करावे यासाठी पर्यावरणप्रेमी प्रयत्न करीत असतात. मोटारी किंवा दुचाकीतून होणारे कार्बन उत्सर्जन हे प्रदूषकारी असल्याने त्याची मानके ठरवून दिली आहे. प्रमाणापेक्षा अधिक कार्बन उत्सर्जन होणार नाही हे तपासून त्याला पीयूसी प्रमाणपत्र देण्यासाठी विविध खासगी एजन्सींना काम देण्यात आले आहेत. मात्र अशाप्रकारचे पीयूसी म्हणजे एक कागद ठरला आहे. कोणत्याही एजन्सीच्या कर्मचाऱ्याच्या हातावर पन्नास रुपये टेकवले तर कोणत्याही गाडीचा नंबर सांगा पीयूसी तत्काळ दिले जाते. त्यासाठी प्रदूषणाची कोणतीच तपासणी केली जात नाही.मानव उत्थान मंच या एनजीओच्या माध्यमातून कामे करणाºया संस्थेने रविवारी (दि. १०) सायंकाळी पाथर्डीरोडवरील एका पेट्रोल पंप चालकाला चक्कमहापालिका आयुक्त राधाकृष्ण गमे यांच्या मोटारीचा क्रमांक दिला आणि त्याने झटक्यात प्रमाणपत्र तयारदेखील करून दिले. त्यामुळे प्रदूषणाच्या नावाखाली गांभीर्य हरपून कसा धंदा मांडला गेला तेच दिसून आले.प्रदूषित म्हणजेच विषारी हवा शहरवासीयांचे जीवन उद््ध्वस्त करीत असताना आरटीओ गंभीर नाही. गेल्यावेळी जिल्हाधिकाऱ्यांच्या मोटारीचे प्रमाणपत्र सादर केल्यानंतर यापुढे असे होणार नाही असे एका सहायक प्रादेशिक परिवहन अधिकाºयाने सांगितले होते. परंतु हा धंदा अजूनही सुरूच आहे. नागरिकांच्या जिवाला धोका पोहोचवणाºयांच्या विरोधात केवळ कारवाईचा फार्स नको तर फौजदारी कारवाईचा फास आवळला पाहिजे, अशी आमची मागणी आहे.  - जसबिर सिंग, मानव उत्थान मंचयाच संस्थेने जानेवारी महिन्यात जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांच्या मोटारीचेदेखील असेच बनावट पीयूसी मिळवून दाखवले होते. आरटीओ अधिकाºयांनी त्याबाबत पियूसी केंद्रांना तंबी दिली होती. मात्र त्या पाठोपाठ अशाप्रकारचे पुन्हा सर्टिफिकेट मिळू लागले आहे.

टॅग्स :Nashikनाशिकpollutionप्रदूषणfraudधोकेबाजी