शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

राष्टवादीला मतदान करण्यासाठी युतीच्या नावाने बोगस मेसेज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2019 00:57 IST

लोकसभा निवडणुकीत जाहीर प्रचार संपताच छुपा प्रचार सुरू होत असल्याने रात्र वैऱ्याची मानली जाते. नाशिकमध्ये याच धर्तीवर प्रकार सुरू झाल्याची तक्रार युतीने केली असून, राष्टवादीच्या उमेदवाराला मते देण्यासाठी चक्क आमदार राजाभाऊ वाजे, सीमा हिरे, देवयानी फरांदे, जिल्हाप्रमुख विजय करंजकर, विरोधी पक्षनेता अजय बोरस्ते यांच्यासह अन्य मान्यवरांच्या नावाने बल्क मेसेज मतदारांच्या मोबाइलमध्ये धडकले आहेत.

नाशिक : लोकसभा निवडणुकीत जाहीर प्रचार संपताच छुपा प्रचार सुरू होत असल्याने रात्र वैऱ्याची मानली जाते. नाशिकमध्ये याच धर्तीवर प्रकार सुरू झाल्याची तक्रार युतीने केली असून, राष्टवादीच्या उमेदवाराला मते देण्यासाठी चक्क आमदार राजाभाऊ वाजे, सीमा हिरे, देवयानी फरांदे, जिल्हाप्रमुख विजय करंजकर, विरोधी पक्षनेता अजय बोरस्ते यांच्यासह अन्य मान्यवरांच्या नावाने बल्क मेसेज मतदारांच्या मोबाइलमध्ये धडकले आहेत. यासंदर्भात आमदार वाजे यांनी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे, तर अजय बोरस्ते यांच्यासह शहरातील अन्य नेत्यांनी सायबर क्राइम पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.लोकसभा निवडणुकीसाठी सोमवारी (दि.२९) मतदान होणार आहे. त्यासाठी जाहीर प्रचाराची सांगता शनिवारी (दि.२७) सायंकाळी झाली. तोपर्यंत नागरिकांना युती आणि आघाडीच्या उमेदवारांना विजयी करण्याचे मेसेज येतच होते; परंतु रात्री मात्र भलताच प्रकार घडला. सिन्नर तालुक्यात नागरिकांना आघाडीच्या उमेदवाराला मतदान करा, असे मेसेज पाठविण्यात आले. त्या खाली शिवसेनेचे आमदार राजाभाऊ वाजे आणि उदय सांगळे यांची नावे होती. नाशिक शहरात अशाच प्रकारे आघाडीच्या उमेदवाराला मतदान करण्यासाठी भाजप आमदार सीमा हिरे तसेच शिवसेना नगरसेवक सुधाकर बडगुजर त्याचप्रमाणे जिल्हाप्रमुख विजय करंजकर आणि महापालिकेतील विरोधी पक्षनेता अजय बोरस्ते यांच्या नावाने तर रात्री आमदार देवयानी फरांदे व माजी आमदार वसंत गिते यांच्या नावाने असे मेसेज मोबाइलवर पाठविण्यात आले. याप्रकाराने खळबळ उडाली. संबंधितांना हा प्रकार कळाल्यानंतर त्यांनी याची चौकशी करून कारवाई सुरू केली.यासंदर्भात, आमदार राजाभाऊ वाजे यांनी निवडणूक निर्णय अधिकाºयांना पत्र दिले असून, त्यात आपण राष्टÑवादीच्या उमेदवाराला विजयी करण्याचे कोणतेही आवाहन केले नसतानाही निवडणूक काळात अफवा पसरविण्याचे काम विरोधक करीत आहेत. हा प्रकार गंभीर असून, आदर्श आचारसंहितेचा भंग आहे. तरी या प्रकरणात अफवांवर आळा घालण्यासाठी संबंधितांवर फौजदारी कारवाई करावी, असे पत्रात म्हटले आहे. बोरस्ते आणि अन्य नेत्यांनी नाशिक शहरातील सायबर क्राइम पोलीस ठाण्यात धाव घेतली असून, गुन्हा दाखल करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकnashik-pcनाशिकMobileमोबाइलShiv SenaशिवसेनाSameer Bhujbalसमीर भुजबळ