शहरं
Join us  
Trending Stories
1
राष्ट्रवादीने पत्ते उघडले; शिक्षक मतदारसंघासाठी सुनिल तटकरेंनी केली उमेदवाराच्या नावाची घोषणा
2
रवींद्र धंगेकर यांचा भाजपवर आणखी एक गंभीर आरोप; ९९६ कोटींचा निधी घेतला आणि...
3
उत्तर कोरियाच्या हेरगिरी उपग्रहाचं प्रक्षेपण अपयशी, उड्डाण करताच काही सेकंदात उडाल्या रॉकेटच्या ठिकऱ्या
4
‘’हवे तेवढे पैसे घ्या, पण मला मारू नका’’, अपघातानंतर ‘बाळा’ने दाखवला पैशांचा माज, प्रत्यक्षदर्शीचा दावा  
5
राजकोट अग्नितांडव! गेम झोनच्या मालकाचाही जळून मृत्यू, आईच्या DNA मुळे पटली ओळख...
6
माजी IAS अधिकाऱ्याच्या पत्नीच्या हत्येचे गूढ उकलले; जवळच्याच लोकांकडून दगाफटका, ३ आरोपींना अटक!
7
"युवासेनेच्या पदाधिकाऱ्याला कोस्टल रोडचे काम"; आदित्य ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर भाजपचे प्रत्युत्तर
8
आणखी एका फॅक्टरीमध्ये बॉयलरचा स्फोट, ४० कामगार होरपळले, ८ जणांची प्रकृती गंभीर
9
 प्रचारसभेवेळी राहुल गांधी झाले उकाड्याने त्रस्त, भरसभेत डोक्यावर ओतलं पाणी   
10
'कान्स'मधलं वातावरण भारावून टाकणारं होतं - छाया कदम
11
शालिमार-मुंबई एलटीटी एक्स्प्रेसमधील बंद एसीवरून प्रवाशांचा संताप
12
राज्यातील दुष्काळाच्या मुद्द्यावर काँग्रेस आक्रमक, परिस्थितीच्या पाहणीसाठी विभागवार समित्यांची स्थापना
13
कोस्टल रोडच्या टनेलला गळती, व्हिडिओ समोर येताच CM शिंदे 'इन अॅक्शन'; कायमस्वरुपीच्या दुरुस्तीचे आदेश!
14
WhatsApp युजर्सना खुशखबर! आता मोठे Voice मेसेज पाठवता येणार, जाणून घ्या कसे?
15
घरातून एकत्रच पळाल्या ३ मुली; पत्र वाचून कुणीही शोधण्याची हिंमत केली नाही, अखेर...
16
AAP नेत्या आतिशी यांच्याविरोधात कोर्टाने बजावले समन्स, केजरीवालही आहेत आरोपी, जाणून घ्या प्रकरण
17
ट्रेनमध्ये सीट बुक केली, तरीही उभे राहून करावा लागला प्रवास; रेल्वेला ठोठावला १३ हजारांचा दंड!
18
"यामिनी जाधवांकडून सापळेंवर कमिशनचे आरोप"; चौकशीचा ड्रामा कशासाठी म्हणत ठाकरे गटाची टीका
19
अमेरिकेतील संकट बनलं भारतासाठी संधी?; औषध उत्पादक कंपन्यांना मोठा फायदा
20
अमेरिकेत कारच्या धडकेत भारतीय विद्यार्थिनीचा मृत्यू; शिक्षण पूर्ण करुन नोकरीच्या होती शोधात

बारी घाटात आढळला महिलेचा मृतदेह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2018 1:37 AM

नाशिक-अहमदनगर जिल्ह्याच्या हद्दीवरील बारी घाटात निर्जनस्थळी एका महिलेचा सडलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला असून, या महिलेचा अपघात, की घातपात याबाबत पोलीस शोध घेत आहेत. सदर महिलेची ओळख पटविण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे.

घोटी : नाशिक-अहमदनगर जिल्ह्याच्या हद्दीवरील बारी घाटात निर्जनस्थळी एका महिलेचा सडलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला असून, या महिलेचा अपघात, की घातपात याबाबत पोलीस शोध घेत आहेत. सदर महिलेची ओळख पटविण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे.  पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बारी घाटात निर्जनस्थळी एक मृतदेह पडला असून, या मृतदेहाची परिसरात दुर्गंधी पसरली असल्याची माहिती वासाळीचे सरपंच काशीनाथ कोरडे यांनी घोटी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज भालेराव यांना दूरध्वनीवरून कळविली. या बाबीची खातरजमा करण्यासाठी सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज भालेराव यांच्यासह कर्मचारी शीतल गायकवाड, संतोष दोंदे, प्रकाश कासार, धुमसे आदींच्या पथकाने तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली असता, एका पस्तीसवर्षीय महिलेचा सडलेल्या अवस्थेत मृतदेह एका कपारीलगत पडलेला आढळला. या मृतदेहाशेजारी जेवणाचा रिकामा डब्बा, ओढणी आणि प्लॅस्टिकचे कापड व तपकीर आदी साहित्य पोलिसांना मिळून आले.  याबाबत घोटी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून, ३५ वर्षीय सदर महिलेच्या डाव्या हातावर तुळशीचे चित्र गोंदलेले  असून, या महिलेबाबत माहीत असल्यास घोटी पोलिसांशी संपर्क करावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.  पोलिसांनी घोटी ग्रामीण  रु ग्णालयाच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांना घटनास्थळी बोलावून जागेवरच शवविच्छेदन केले. दरम्यान, सदर महिला डोंगरावरून घसरून पडली,  की हत्या करून तिचा मृतदेह निर्जनस्थळी टाकण्यात आला. याबाबत पोलीस तपास करत आहेत.

टॅग्स :Deathमृत्यूPoliceपोलिस