शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

भोजापूर धरणात आढळला संगमनेरच्या तरुणाचा मृतदेह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2020 00:14 IST

सिन्नर तालुक्यातील भोजापूर धरणात ३० वर्षीय तरुणाचा मृतदेह हात बांधलेल्या स्थितीत तरंगताना आढळून आल्याची घटना शुक्रवारी (दि. २८) उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे.

ठळक मुद्देखुनाचा प्रकार : हातपाय बांधून म्हाळुंगी नदीपात्रात फेकल्याचा संशय

सिन्नर : तालुक्यातील भोजापूर धरणात ३० वर्षीय तरुणाचा मृतदेह हात बांधलेल्या स्थितीत तरंगताना आढळून आल्याची घटना शुक्रवारी (दि. २८) उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे.ज्ञानेश्वर माधव सोनवणे (३०, रा. कसारा-दुमाला, अकोलेरोड, संगमनेर) असे मृत तरुणाचे नाव आहे. याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, भोजापूर धरणाच्या पाण्यात म्हाळुंगी नदीत गुरुवारी (दि. २७) रात्री ७ वाजेच्या सुुमारास मृतदेह वाहून येत असल्याचे चापडगाव परिसरातील शेतकऱ्यांनी पाहिले. याबाबत वावी पोलिसांना माहिती देण्यात आली.तथापि रात्रीच्यावेळी या परिसरात पोहोचणे शक्य नसल्याने शुक्रवारी (दि. २८) सकाळी पोलिसांनी धरणाच्या परिसरात पोहोचले. तोपर्यंत मृतदेह धरणातील मनेगावसह १६ गावे पाणीपुरवठा योजनेच्या पंपहाऊसपर्यंत तरंगत आला होता.याप्रकरणी वावी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक रणजित गलांडे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.घातपात असल्याचा संशयपोलिसांनी सदरचा मृतदेह बाहेर काढला असता त्याचे दोन्ही हात दोरीने बांधलेले आढळून आले. त्यामुळे घातपात असल्याची प्राथमिक शक्यता पोलिसांनी व्यक्त केली. सहाय्यक पोलीस निरीक्षक रणजित गलांडे, उपनिरीक्षक अभय ढाकणे यांनी अकोले, संगमनेर व सिन्नर पोलीस ठाण्यात संपर्क साधून मिसिंग तक्रारींबद्दल विचारणा केली. मृताच्या खिशात मिळालेल्या आधार कार्डवरून तो संगमनेर येथील ज्ञानेश्वर माधव सोनवणे असल्याचे समजले.

टॅग्स :NashikनाशिकCrime Newsगुन्हेगारी