नाशिक : पश्चिम वनपरिक्षेत्र अंतर्गत शिवाजीनगर सातपूर भागातील देवराई राखीव वनक्षेत्राजवळ सोमवारी सकाळी एका बिबट्याचा (मादी) मृतदेह आढळून आला.देवराई राखीव वनक्षेत्र या हद्दीत मागील काही दिवसांपूर्वी बिबट्याचा संचार या भागातील रहिवाशांना दिसून आला होता. सोमवारी सकाळी शिवाजीनगर शिवारातील जलशुद्धीकरण केंद्राच्या परिसरात रानगवतामध्ये मृतावस्थेत बिबट्या काही नागरिकांना दिसला. त्यांनी तत्काळ वनविभागाला कळविले. माहिती मिळताच नाशिक पश्चिम विभागाचे पथक घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी बिबट्याचा मृतदेह पंचनामा करून ताब्यात घेतला. अशोकस्तंभ येथील शासकीय दवाखान्यात पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांकडून शवविच्छेदन करण्यात आले. दरम्यान या बिबट्याचा मृत्यू फुप्फुसाचा जंतुसंसर्ग न्युमोनियासदृश आजाराने झाल्याचे निदान डॉक्टरांकडून करण्यात आले. शवविच्छेदनानंतर मृतदेह वनक्षेत्रपाल विवेक भदाणे यांनी ताब्यात घेतला. रोपवाटिकेत बिबट्याच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले.हा मृतदेह अंदाजे ३ वर्षे वयाच्या प्रौढ मादीचा असल्याचे भदाणे यांनी सांगितले.
शिवाजीनगरला आढळला बिबट्याचा मृतदेह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2020 00:54 IST
नाशिक : पश्चिम वनपरिक्षेत्र अंतर्गत शिवाजीनगर सातपूर भागातील देवराई राखीव वनक्षेत्राजवळ सोमवारी सकाळी एका बिबट्याचा (मादी) मृतदेह आढळून आला.
शिवाजीनगरला आढळला बिबट्याचा मृतदेह
ठळक मुद्देअशोकस्तंभ येथील शासकीय दवाखान्यात पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांकडून शवविच्छेदन करण्यात आले.