शहरं
Join us  
Trending Stories
1
पालघर: मासेमारी करताना चुकून पाकिस्तानी हद्दीत प्रवेश केलेले नामदेव मेहेर पाकच्या ताब्यात!
2
आजचे राशीभविष्य, ०८ नोव्हेंबर २०२५: काळजी मिटेल, आनंदाची बातमी मिळेल, धनलाभ शक्य
3
नवी मुंबईत मनसेने भरवले मतदार यादीतील बाेगस नावांचे प्रदर्शन; अमित ठाकरेंच्या हस्ते उद्घाटन
4
पार्थ पवारांच्या कंपनीचा आणखी एक गैरव्यवहार; आधी जमीन घाेटाळा, मग व्यवहार रद्द
5
माझे नाव दोन मतदार याद्यांत असणे ही निवडणूक आयोगाची चूक- आमदार अस्लम शेख
6
धनंजय मुंडेंनी दिली मारण्याची सुपारी; मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप; पोलिसांकडे तक्रार
7
वर्ल्ड चॅम्पियन्सचा गौरव! स्मृती, जेमिमा, राधा यादव यांना प्रत्येकी सव्वादोन कोटींचे बक्षीस
8
जिल्हा परिषद निवडणुकांची दोन आठवड्यांत घोषणा; ३० दिवसांच्या कालावधीतच पार पाडणार निवडणुका
9
नरेंद्र माेदी माझे मित्र आहेत; पुढील वर्षी मी नक्की भारतात येईन: डोनाल्ड ट्रम्प
10
मनोज जरांगे यांच्या आरोपांची सीबीआय चौकशी व्हायलाच हवी; धनंजय मुंडेंचे आरोपांना प्रत्युत्तर
11
प्रभागरचना, आरक्षणावरील निकालांच्या अधीन असेल स्थानिक संस्था निवडणूक- उच्च न्यायालय
12
धक्कादायक! ऑनलाइन क्रीम खरेदी केली, महिलेच्या शरीरावर सापासारखे व्रण; १० वर्षांत १२ लाख रुपये खर्च
13
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
14
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
15
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
16
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
17
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
18
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
19
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
20
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान

मनपा रुग्णालयांत होणार रक्ताच्या चाचण्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2018 01:11 IST

महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये पॅथॉलॉजी लॅबमध्ये पॅथॉलॉजिस्ट उपलब्ध नसल्याने रुग्णांच्या रक्ताच्या चाचण्या बाहेरील खासगी लॅबमधून करून घ्यावा लागतात. त्यामुळे गोरगरीब रुग्णांना आर्थिक झळ सोसावी लागते. आता, महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये रक्ताच्या सर्व प्रकारच्या चाचण्या करण्याची सुविधा उपलब्ध होणार असून, पीपीपी तत्त्वावर प्रयोगशाळा उभारून मनपाने चाचण्यांसाठी ठरवून दिलेले दर आकारले जाणार आहेत.

नाशिक : महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये पॅथॉलॉजी लॅबमध्ये पॅथॉलॉजिस्ट उपलब्ध नसल्याने रुग्णांच्या रक्ताच्या चाचण्या बाहेरील खासगी लॅबमधून करून घ्यावा लागतात. त्यामुळे गोरगरीब रुग्णांना आर्थिक झळ सोसावी लागते. आता, महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये रक्ताच्या सर्व प्रकारच्या चाचण्या करण्याची सुविधा उपलब्ध होणार असून, पीपीपी तत्त्वावर प्रयोगशाळा उभारून मनपाने चाचण्यांसाठी ठरवून दिलेले दर आकारले जाणार आहेत. महापालिकेच्या कथडा येथील डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयात ७५० स्क्वे. फूट जागेत सुसज्ज लॅब उभारण्याच्या प्रस्तावास स्थायी समितीने सोमवारी (दि.२२) मंजुरी दिली. महापालिकेच्या नाशिकरोड येथील बिटको रुग्णालय, पंचवटीतील इंदिरा गांधी रुग्णालय, कथड्यातील डॉ. झाकीर हुसेन रुग्णालय आणि सिडकोतील श्री स्वामी समर्थ रुग्णालयात कार्यरत पॅथॉलॉजी लॅबमध्ये पॅथॉलॉजिस्ट उपलब्ध नसल्याने रुग्णांना रक्ताच्या अनेक चाचण्या बाहेरील खासगी लॅबमधून करून घ्याव्या लागतात. त्यामुळे रुग्णांची गैरसोय होते. त्यासाठी वैद्यकीय विभागाने मनपाच्या रुग्णालयातील प्रयोगशाळांमध्ये दैनंदिन होणाºया रक्ताच्या चाचण्या वगळून इतर आवश्यक त्या रक्ताच्या सर्व प्रकारच्या चाचण्या पीपीपी तत्त्वावर करून घेण्यासंदर्भातील प्रस्ताव महासभेवर ठेवला होता. या प्रस्तावानुसार, महापालिकेने संबंधित एजन्सीस प्रयोगशाळेसाठी आवश्यक तेवढी जागा दवाखान्यात उपलब्ध करून द्यावी आणि अन्य दवाखान्यांमध्ये रक्ताचे नमुने घेण्यासाठी टेबल उपलब्ध करून द्यावे. सदर जागेत एजन्सीने प्रयोगशाळा उभारून ज्या चाचण्या मनपा रुग्णालयात होत नाहीत त्या मनपाच्या वैद्यकीय विभागाने निश्चित करून दिलेल्या दरामध्ये करून द्याव्यात आणि एजन्सीने मनपाला जागेचे भाडे अदा करावे. त्यानुसार, महापालिकेने निविदाप्रक्रिया राबविली आणि त्यासंबंधीचा प्रस्ताव सोमवारी (दि.२२) स्थायी समितीच्या मंजुरीसाठी ठेवला होता. स्थायीने प्रस्तावाला मंजुरी दिल्याने आता मनपाच्या डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयात प्रयोगशाळा उभारली जाणार असून, रक्ताच्या सर्व प्रकारच्या ३२१ चाचण्या करणे सुलभ होणार आहे. त्यासाठी बाहेरील खासगी लॅबमध्ये जाण्याची गरज भासणार नाही.मनपा रुग्णालयांतील रुग्णांचे रक्तनमुने घेऊन याठिकाणी चाचण्या केल्या जाणार आहेत व तसा अहवाल त्या-त्या रुग्णालयांमध्ये पाठविला जाणार आहे. मनपाला मिळणार उत्पन्न महापालिकेकडून सदर काम हे मिलेनियम स्पेशल लॅब प्रा. लिमिटेड या संस्थेला देण्यात आले असून, त्यांना प्रयोगशाळेसाठी डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयात ७५० स्क्वे. फूट जागा दहा वर्षांसाठी उपलब्ध करून दिली जाणार आहे. सदर जागेपोटी महापालिकेला दरवर्षी जीएसटीसह १९ लाख ९७ हजार ६२२ रुपये भाडे मिळणार आहे. याचबरोबर, रक्ताच्या चाचण्यांचे दर वैद्यकीय विभाग निश्चित करून देणार असून, या दरामध्ये दर दोन वर्षांनी १० टक्के वाढ केली जाणार आहे.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाhospitalहॉस्पिटल