देवळाली कॅम्प : येथील वॉर्ड क्र. ८ मधील ओम साईराम सेवाभावी मंडळाच्या वतीने महापालिकेच्या बिटको रुग्णालयाच्या सहकार्याने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सुमारे ४१ पिशव्या रक्त संकलन करण्यात आले.ओम साईराम सेवाभावी मंडळाचे अध्यक्ष तानाजी भोर यांनी या उपक्र माचे आयोजन केले. यावेळी आरोग्य विभागाच्या वतीने देण्यात आलेल्या सूचनांचे पालन करत डॉ. जितेंद्र धनेश्वर, डॉ. शैला पळसपगार, योगेश शिंदे, संदीप चव्हाण, अनिता डांगळे, सीमा काळकर, सुधाकर हांडोरे, सुनील चव्हाणके आदी आरोग्य कर्मचाऱ्यांनी शिबिरात रक्तसंकलन केले. या उपक्र माच्या प्रारंभीच परिसरात कर्तव्यावर असलेल्या पोलीस बांधवांनीदेखील सामाजिक जाणीव म्हणून रक्तदान केले. शिबिर यशस्वीतेसाठी तानाजी भोर, उषा भोर, दिनेश गोविल, प्रशांत वराडे, नामदेव सूर्यवंशी, पवन गायकर, राहुल कासार, मंगेश परदेशी, सोमनाथ अहिरे, मनोज कनोजिया आदींनी प्रयत्न केले.
ओम साईराम मंडळाकडून ४१ पिशव्या रक्त संकलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2020 22:37 IST
देवळाली कॅम्प : येथील वॉर्ड क्र. ८ मधील ओम साईराम सेवाभावी मंडळाच्या वतीने महापालिकेच्या बिटको रुग्णालयाच्या सहकार्याने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सुमारे ४१ पिशव्या रक्त संकलन करण्यात आले.
ओम साईराम मंडळाकडून ४१ पिशव्या रक्त संकलन
ठळक मुद्देमहापालिकेच्या बिटको रुग्णालयाच्या सहकार्याने