शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

घंटागाडी कामगारांचा रास्ता रोको

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2021 02:02 IST

नाशिकरोड येथील घंटागाडी कामगाराच्या मृत्यूप्रकरणी ठेकेदार आणि सुपरवायझरसह अन्य व्यक्तींवर कारवाई व्हावी या मागणीसाठी शुक्रवारी (दि.२६) घंटागाडी कामगारांनी जिल्हा शासकीय रुग्णालयासमेारच रास्ता रोकाे केले. शवविच्छेदनाची कार्यवाही पूर्ण झाल्यानंतर त्याची रीतसर चौकशी करण्यात येईल असे अश्वासन पेालीसांनी दिल्यानंतर संबंधीतांनी शव ताब्यात घेतले.

ठळक मुद्देजिल्हा रुग्णालय : मानसिक छळामुळे मृत्यू झाल्याचा आरोप

नाशिक : नाशिकरोड येथील घंटागाडी कामगाराच्या मृत्यूप्रकरणी ठेकेदार आणि सुपरवायझरसह अन्य व्यक्तींवर कारवाई व्हावी या मागणीसाठी शुक्रवारी (दि.२६) घंटागाडी कामगारांनी जिल्हा शासकीय रुग्णालयासमेारच रास्ता रोकाे केले. शवविच्छेदनाची कार्यवाही पूर्ण झाल्यानंतर त्याची रीतसर चौकशी करण्यात येईल असे अश्वासन पेालीसांनी दिल्यानंतर संबंधीतांनी शव ताब्यात घेतले. महापालिकेच्या घंटागाडी कामगार आणि नाशिकरोड येथील ठेकेदार यांच्यात गेल्या वर्षभरापासून विविध कारणांवरून संघर्ष सुरू आहे. त्यातच नाशिकरोड येथील कामगार केशव आत्माराम कांबळे हे आजारी पडले आणि नंतर त्यांचे उपचार सुरू असताना निधन झाले. मानसिक छळामुळे ते आजारी पडले आणि त्यामुळेच त्यांचा मृत्यू झाला असा त्यांच्या कुटुंबीय आणि श्रमिक सेवा संघाचा आरोप होता. 

गुरूवारी (दि.२५) या कामगाराचे निधन झाल्यानंतर संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी नाशिकरोड पोलीस ठाण्यात त्यांनी धाव घेतली परंतु उपयोग झाला नाही. शुक्रवारी (दि.२६) त्या मृत कामगाराचे शवविच्छेदनासाठी जिल्हा शासकीय रूग्णालयात आणण्यात आल्यानंतर कामगारांनी आधी गुन्हा दाखल करावा मगच शव ताब्यात घेण्यात येईल अशी भूमिका घेतली. महादेव खुडे यांच्या नेतृत्वाखाली कामगार आक्रमक झाल्यानंतर अन्य विभागातील घंटागाडी कामगार देखील घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर कामगारांनी जिल्हा शासकीय रूग्णालयासमोरच रास्ता राेको केले. यावेळी नाशिकरोड पेालीस ठाण्याचे निरीक्षक सोमवंशी यांनी मध्यस्थी केली आणि शवविच्छेदनाची प्रक्रीया पार पडल्यानंतर याेग्य ती कारवाई करण्यात येईल असे अश्वासन दिल्यानंतर शव ताब्यात घेतल्याचे खुडे यांनी सांगितले. संबंधीत कामगरावर साक्री येथे अत्यंसंस्कार करण्यात येणार आहे. ठेकेदार आणि सुपरवायझरच्या छळामुळे या कामगाराची प्रकृती बिघडली आणि रूग्णालयात दाखल करण्यात आले त्याचवेळी या कामगाराच्या पत्नीने पेालीसांत तक्रार अर्ज दिला होता. त्यानंतर २२ फेब्रुवारीस त्या कामगाराने देखील चार जणांची नावे पेालीसांना सांगितली होती. त्यानंतरही पोलीसांनी कारवाई न केल्याने अखेरीस आंदोलन करण्याची वेळ आल्याचे खुडे यांनी सांगितले.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाagitationआंदोलन