जलवाहिनीचे काम करताना सुरक्षिततेच्यादृष्टीने कुठल्याही प्रकारची खबरदारी संबंधित ठेकेदाराकडून घेतली गेलेली नाही. या ठिकाणी वाहनचालकांना सावधानतेचा इशारा देणारा फलकदेखील जागोजागी लावण्यात आलेले नाही. रात्रीच्यावेळी रिफ्लेक्टरचीही येथे व्यवस्था नसल्यामुळे हा अपघात घडला. या निष्काळजीपणामुळे सहा वर्षीय बालकाला आपला जीव गमवावा लागल्याचे सांगत संतप्त जमावाने अपघातस्थळी येत रस्त्यावर ठिय्या दिला. जलवाहिनी टाकण्याचे काम घेणाऱ्या ठेकेदाराच्या निष्काळजीपणामुळे अपघाताला निमंत्रण मिळाल्याचा आरोप यावेळी आंदोलकांनी केला.
रास्ता रोकोची माहिती मिळताच सहायक पोलीस आयुक्त अशोक नखाते, सातपूरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर मोरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत नागरे, उपनिरीक्षक सतीश पाटील, प्रभाग सभापती रवींद्र धिवरे, नगरसेवक मधुकर जाधव, अरुण काळे आदींनी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी संतप्त आंदोलनकर्त्यांची पोलिसांसह लोकप्रतिनिधींनी समजूत काढून कारवाईचे तसेच नुकसानभरपाईसाठी पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिल्यानंतर ठिय्या आंदोलन मागे घेण्यात आले. यावेळी रस्त्यावरील वाहतूक खोळंबली होती.
या अपघाताप्रकरणी टेम्पोचा (एम.एच१५ ईजी ४१०५) चालक दत्तात्रय भोसले (रा.चुंचाळे) यास अटक करण्यात आली आहे. अपघातग्रस्त टेम्पोही जप्त करण्यात आला आहे. टेम्पो भरधाव वेगाने आणि चुकीच्या (विरुद्ध दिशेने) मार्गाने येऊन दुचाकीला धडकला. यामुळे अपघातात सहा वर्षाचा बालक मृत्युमुखी पडला. त्यामुळे चालकाविरुध्द सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याचे निर्देश सातपूर पोलिसांना देण्यात आले आहेत.
---
फोटो आर वर ११सातपुर नावाने सेव्ह आहे. ११ प्रणय नावाने फोटो सेव्ह
===Photopath===
110321\11nsk_23_11032021_13.jpg
===Caption===
रास्ता रोको