कळवण : राष्ट्रीय दृष्टिहीन संघ, नाशिक विभाग व येथील समाजसेवक मधुकर मालपुरे यांच्या वतीने १५० दृष्टिहीन बांधवांचा स्रेह मेळावा संपन्न झाला. या प्रसंगी पुणे विद्यापीठाच्या नाशिक उपकेंद्राचे समन्वयक प्राचार्य डॉ. रावसाहेब शिंदे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.यावेळी नाशिक, धुळे, जळगाव येथून आलेल्या दृष्टिहीन कलाकारांनी वक्तृत्व, काव्यवाचन व गाणी सादर करून उपस्थितांचे मनोरंजन केले. यावेळी मालपुरे परिवारातर्फे दृष्टिहीन व्यक्तींना मदत करण्यात आली. पोलीस उपविभागीय अधिकारी सचिन गुंजाळ, कळवण एज्युकेशनसोसायटीचे अध्यक्ष अॅड. शशिकांत पवार, पोलीस निरीक्षक मधुकर गावित, केदू बापू वाणी, मधुकर मालपुरे, लाडशाखीय वाणी समाज महिला पतसंस्थेच्या अध्यक्ष शकुंतला मालपुरे, के. के. शिंदे, कारभारी पगार, कौतिक पगार, संजय मालपुरे, अजय मालपुरे हे उपस्थित होते. प्रास्ताविक संजय मालपुरे यांनी, तर सूत्रसंचालन केले. आभार आर. एस. अमृतकर यांनी मानले. (वा.प्र)चांदवड अभियांत्रिकी महाविद्यालयात कार्यशाळा चांदवड : येथील एसएनजेबी संचलित कांताबाई भवरलाल जैन महाविद्यालयात कॉम्प्युटर नेटवर्किंग या विषयावर कार्यशाळा संपन्न झाली. गुडगाव येथील ट्रेनिंग सेंटरतर्फे प्रशांतकुमार व वैभवकुमार मार्गदर्शन केले. यावेळी घेण्यात आलेल्या. स्पर्धेत शुभम जैन, कमलेश जैन या विद्यार्थ्यांची दिल्ली येथे होणाऱ्या आयबीएनसीसाठी निवड झाली. आयोजन नेहा संचेती, अदित्य जैन, हर्षल जाधव, प्रदीप अहेर, राहुल चव्हाण व रोशन देवरे यांनी केले. (वा.प्र)
दृष्टिहीन नागरिकांचा स्रेह मेळावा उत्साहात
By admin | Updated: September 14, 2015 22:36 IST