शहरं
Join us  
Trending Stories
1
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
2
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
3
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
4
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
5
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
6
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
7
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
8
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
9
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
10
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
11
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
12
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
13
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
14
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
15
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
16
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
17
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
18
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
19
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
20
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

ग्रीन फिल्ड लॉन्स संरक्षक भिंतप्रकरणी पाच जणांवर ठपका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2018 00:51 IST

उच्च न्यायालयाची स्थगिती असतानाही ग्रीन फिल्ड लॉन्सची संरक्षक भिंत तोडल्यानंतर महापालिकेवर आलेल्या नामुष्कीच्या अनुषंगाने पाच अधिकारी सकृतदर्शनी संशयाच्या घेऱ्यात असून, त्यांना कारणे दाखवा नोटिसा देण्याचे आदेश आयुक्त तुकाराम मुंढे यांनी प्रशासनाला सोमवारी (दि.१३) दिले आहेत.

नाशिक : उच्च न्यायालयाची स्थगिती असतानाही ग्रीन फिल्ड लॉन्सची संरक्षक भिंत तोडल्यानंतर महापालिकेवर आलेल्या नामुष्कीच्या अनुषंगाने पाच अधिकारी सकृतदर्शनी संशयाच्या घेऱ्यात असून, त्यांना कारणे दाखवा नोटिसा देण्याचे आदेश आयुक्त तुकाराम मुंढे यांनी प्रशासनाला सोमवारी (दि.१३) दिले आहेत. यात अतिरिक्त आयुक्त किशोर बोर्डे, अतिक्रमण उपआयुक्त रोहिदास बहिरम, नगररचना विभागाचे तत्कालीन सहायक संचालक आकाश बागुल, कार्यकारी अभियंता पी. बी. चव्हाण आणि उपअभियंता रवि पाटील यांचा समावेश आहे.  नाशिक महापालिकेच्या वतीने पूररेषेतील बांधकामे हटविण्याची कार्यवाही गेल्या मे महिन्यात करण्यात आली. यावेळी माजी महापौर प्रकाश मते यांच्या ग्रीन फिल्ड लॉन्सचे बेकायदेशीर बांधकाम हटवित असतानाच उच्च न्यायालयाने ही कारवाई स्थगित करण्याचे आदेश दिले. सदरचे आदेश मते यांच्या वकिलांनी महापालिकेच्या वेगवेगळ्या खात्यांना दुपारपासून बजावण्यास सुरुवात केली. मात्र, कोणत्याही अधिकाºयाने त्यावर ठोस भूमिका घेतली नाही. परिणामी ग्रीन फिल्ड लॉन्सची संरक्षक भिंत पाडल्यानंतर दुसºयाच दिवशी आयुक्तांना न्यायालयाच्या बेअदबी प्रकरणी आयुक्तांनी न्यायालयात हजर राहण्याचे आदेश दिले आणि त्यानुसार आयुक्त तुकाराम मुंढे यांना माफी तर मागावी लागली. आयुक्त तुकाराम मुंढे यांना महापालिकेची नामुष्की जिव्हारी लागल्याने त्यांनी यासाठी चौकशी अधिकारीच नेमले. विशेष म्हणजे न्यायालयात दुपारी चार वाजेनंतर मिळालेल्या पत्राचा संदर्भ नगररचना विभागाने दिलेल्या पत्रात होता. तत्पूर्वी दुपारी मिळालेल्या पत्राचा उल्लेख नव्हता. त्यामुळे त्याचीदेखील आयुक्त मुंढे यांनी शोध घेतला होता.बागुल यांच्यावर सुरुवातीपासूनच संशयनगररचना विभागाचे सहसंचालक आकाश बागुल यांच्यावर आयुक्तांना सुरुवातीपासूनच संशय होता. त्याचप्रमाणे बागुल यांच्या अंगाशी हे प्रकरण आल्यानंतर त्यांनी तातडीने बदली तर करून घेतली. शिवाय आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या अनुपस्थितीत सुरेश निकुंभे यांना रुजू करून घेतले होते. बागुल यांना निलंबित करण्याची शिफारस अगोदरच आयुक्तांनी केली होती. मात्र आता त्यात या प्रकरणाची भर पडणार आहे.ग्रीन फिल्ड प्रकरणानंतरच नगरररचना विभागाचे अभियंता रवि पाटील बेपत्ता झाले होते. ग्रीन फिल्ड प्रकरणात त्यांच्यावर ठपका ठेवला जाण्याची शक्यता असल्याने ते अधिक तणावाखाली होते, असे सांगण्यात आले. प्रशासनाच्या चौकशीत पाटीलदेखील सकृतदर्शनी दोषी असल्याचे दिसत आहे.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाtukaram mundheतुकाराम मुंढे