शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

ऑक्सिजन सिलिंडर्सचा काळा बाजार की कृत्रिम टंचाई !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2021 04:15 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नाशिक : जिल्ह्यात ऑक्सिजनचा प्रचंड तुटवडा जाणवत असल्याच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात सर्वांत मोठ्या अर्थात ड्युरा ऑक्सिजन सिलिंडरच्या ...

लोकमत न्यूज नेटवर्क

नाशिक : जिल्ह्यात ऑक्सिजनचा प्रचंड तुटवडा जाणवत असल्याच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात सर्वांत मोठ्या अर्थात ड्युरा ऑक्सिजन सिलिंडरच्या दरात सुमारे तिप्पट वाढ झाली आहे. खासगी हॉस्पिटल्सना जे ऑक्सिजन सिलिंडर यापूर्वी १० ते ११ हजार रुपये दराने मिळत होते ते काही दिवसांपासून ३० हजार रुपयांवर मिळू लागले आहे. या दरवाढीमागे राजकीय साठमारी तसेच प्रशासनातील शह-काटशहचे राजकारण असल्याची चर्चा आहे. मात्र, या खेळात ऑक्सिजन बेडसाठी तिष्ठावे लागणाऱ्या रुग्णांना जीव गमवावा लागत असल्यानेच जिल्ह्यातील मृतांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे.

जिल्ह्यातील खासगी रुग्णालयांमध्ये ऑक्सिजनचा प्रचंड तुटवडा निर्माण झाला असून, बहुतांश रुग्णालयांमध्ये ऑक्सिजनच नाही किंवा असलाच तरी तो केवळ तिथे सध्या असलेल्या ऑक्सिजन बेडवरील रुग्णांना पुरेल इतकाच आहे. त्यामुळे जर कोणत्याही रुग्णाला ऑक्सिजन बेड हवा असेल, तर त्याला ऑक्सिजन बेड उपलब्ध आहे, पण ऑक्सिजनचा साठा नसल्याने बेड देता येऊ शकत नाही, असे सांगून दाखल करून घेण्यासदेखील अनेक रुग्णालयांकडून असमर्थता व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे रुग्णालयांना जिथून मिळत असेल तिथून तो साठा उपलब्ध करून घेण्याशिवाय पर्यायच उरलेला नाही. अशा परिस्थितीत खासगी हॉस्पिटल्स स्वत:च प्रयत्न करून जिथून मिळतील तिथून एकेक ऑक्सिजन सिलिंडर्स मिळवत आहेत. अशा वेळी अनेक हॉस्पिटल्सना गत महिन्याच्या तुलनेत तिप्पट दराने ऑक्सिजन सिलिंडर विकत घेण्यावाचून पर्याय उरलेला नाही. जिल्ह्यातील काही खासगी रुग्णालयांना ऑक्सिजनच्या सुरळीत पुरवठ्यात गत आठवड्यापासूनच मोठी समस्या निर्माण झाली होती. त्यात बुधवारी झाकीर हुसेन रुग्णालयात ऑक्सिजनची प्रचंड प्रमाणात गळती झाल्याने नाशिकला येणारा ऑक्सिजनचा सर्व साठा शासकीय रुग्णालयांकडे वळविण्यात आला. त्यामुळे खासगी रुग्णालयांना बुधवारी ऑक्सिजनचा पुरवठाच होऊ न शकल्याने अनेक रुग्णालयांमध्ये अत्यंत बिकट समस्या निर्माण झाली आहे. बहुतांश रुग्णालयांकडे ऑक्सिजन बेड उपलब्ध असूनही ऑक्सिजन लागणारे रुग्ण दाखल करून घेण्यासदेखील नकार दिला जात आहे.

इन्फो

तुटवडा पोहोचला ७० टनांवर

गत आठवड्यापासूनच ऑक्सिजनच्या पुरवठ्याची समस्या निर्माण झाल्याने ऑक्सिजनचीच . जिल्ह्यात ऑक्सिजनची मागणी गत आठवड्यात शनिवारी १३९ मेट्रिक टन इतकी होती, तर प्रत्यक्षात पुरवठा ८७ मेट्रिक टन इतकाच होता. तब्बल ५२ मेट्रिक टन ऑक्सिजनचा तुटवडा गत आठवड्यातच होता. तसेच हा तुटवडा रुग्णसंख्या वाढीनुसार वाढत जाणार असल्याचा इशारा यापूर्वीच पालकमंत्री छगन भुजबळ तसेच अन्य तज्ज्ञांनी दिला होता. त्यानुसार जिल्ह्यात सध्याच्या घडीला किमान ७० मेट्रिक टन ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झाला असल्याचा अंदाज वैद्यकीय तज्ज्ञांकडून व्यक्त होत आहे.

इन्फो

शह-काटशहमध्ये सामान्यांच्या जिवाशी खेळ

जिल्ह्यात एका ठेकेदाराकडे येत असलेला दोन टँकरचा कोटा कमी करून एकच टँकर एकाकडे आणि जिल्ह्यातील दुसऱ्या ठेकेदाराकडे दुसऱ्या टँकरचे काम देण्यात आले. एका ठेकेदाराचा कोटा दुसरीकडे हस्तांतरित करण्याच्या खेळाने वितरणात समस्या निर्माण होऊ लागली आहे. या ठेकेदारीच्या शह-काटशहमागे राजकीय पाठबळ तसेच प्रशासनातील अधिकाऱ्यांची आपापसांतील सुंदोपसुंदी कारणीभूत असल्याची चर्चादेखील दबक्या आवाजात सुरू आहे. त्यामुळे सध्या ऑक्सिजनसाठी सुरू असलेला काळा बाजार हा खऱ्या टंचाईपेक्षाही या शह-काटशहमुळे निर्माण झालेल्या कृत्रिम टंचाईमुळेच झाल्यानेच हा प्रश्न ऐरणीवर आला आहे.