शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
4
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
5
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
6
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
7
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
8
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
9
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
10
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
11
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
12
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
13
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
14
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
15
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
16
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
17
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
18
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
19
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
20
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
Daily Top 2Weekly Top 5

महापालिका स्थायी समितीवर भाजपाची लढाऊ ब्रिगेड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2018 15:25 IST

भाजपाची रणनीती : प्रस्तावच येत नसल्याने संघर्ष अटळ

ठळक मुद्देस्थायी समितीवरील आठ सदस्य नियमानुसार निवृत्त भाजपाने सभागृहनेता दिनकर पाटील, उद्धव निमसे, भाग्यश्री ढोमसे आणि पुष्पा आव्हाड यांना स्थायीवर पाठविले आहे

नाशिक - महापालिका आयुक्तपदाचा कार्यभार स्वीकारलेल्या तुकाराम मुंढे यांनी ‘त्रिसूत्री’चा अवलंब करत विविध कामांना ब्रेक लावत आपल्या आगामी कारभाराचे संकेत दिल्यानंतर महापालिकेची अर्थवाहिनी समजल्या जाणा-या स्थायी समितीची आक्रमकता वाढविण्यासाठी सत्ताधारी भाजपाने रणनीती आखली आहे. त्यानुसार, स्थायी समितीच्या रिक्त झालेल्या जागांवर लढाऊ ब्रिगेडला पुढे चाल देण्याचा निर्णय घेण्यात आला असून बुधवारी (दि.२८) महासभेत घोषित करण्यात आलेल्या सदस्यांच्या नियुक्तीत त्याचा प्रत्यय आला आहे.महापालिकेच्या स्थायी समितीवरील आठ सदस्य नियमानुसार निवृत्त करण्यात आले. त्यात भाजपाचे ४, शिवसेनेचे २ आणि कॉँग्रेस व राष्टÑवादीच्या प्रत्येकी एका सदस्याचा समावेश होता. या रिक्त झालेल्या जागांवर नवीन सदस्यांची नियुक्ती करण्यासाठी महापौर रंजना भानसी यांनी बुधवारी (दि.२८) विशेष महासभा बोलाविली होती. तुकाराम मुंढे यांनी आयुक्तपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर ज्या पद्धतीने कामकाजाला सुरूवात केली आहे, त्याचा धसका सत्ताधारीसह विरोधीपक्षानेही घेतला आहे. कामांची आवश्यकता, तांत्रिक योग्यता व व्यवहार्यता या त्रिसूत्रीचा अवलंब करत त्यांनी आपल्या पहिल्याच महासभेत १५ कोटींच्या कामांचे प्रस्ताव मागे घेतले शिवाय, नगरसेवक निधीतील कामांसह २५७ कोटींच्या रस्ते विकास कामांनाही ब्रेक लावला. त्यामुळे, सत्ताधारी भाजपासह विरोधीपक्षातही अस्वस्थता आहे. त्यातच, स्थायी समितीवर गेल्या महिनाभरात कामांचे प्रस्ताव रोडावल्याने आगामी काळात स्थायीवरचे पद शोभेचे राहते काय, या भीतीपोटी अनेकांनी अगोदर शर्यतीत असूनही नंतर स्थायीवर यावर्षी सदस्य म्हणून जाण्यास नकार दर्शविला. त्यामुळे शिवसेनेसह कॉँग्रेस, राष्टवादीने बळजबरीने बोहल्यावर चढविले. मात्र, भाजपाने आयुक्तांना रोखण्यासाठी लढाऊ ब्रिगेडला पुढे चाल देण्याची रणनीती आखली असून त्याचा प्रत्यय बुधवारी स्थायीवरील नियुक्तीने दिसून आला आहे. भाजपाने सभागृहनेता दिनकर पाटील, उद्धव निमसे, भाग्यश्री ढोमसे आणि पुष्पा आव्हाड यांना स्थायीवर पाठविले आहे तर शिवसेनेने संतोष साळवे आणि संगीता जाधव यांना संधी दिली आहे. कॉँग्रेसने समीर कांबळे यांना चाल दिली आहे तर राष्टवादीकडून सुषमा पगारे यांच्या गळ्यात बळजबरीने सदस्यत्वाची माळ टाकण्यात आली आहे. दरम्यान, उर्वरित पाच सदस्यांचेही राजीनामे घेऊन त्याठिकाणी आक्रमक सदस्यांना नियुक्त केले जाण्याचे संकेत शहराध्यक्ष व आमदार बाळासाहेब सानप यांनी दिले आहेत.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाtukaram mundheतुकाराम मुंढे