ओझर : लॉकडाऊन आणि सरकारी अनास्थेमुळे सध्या दुग्ध व्यवसाय व दूध उत्पादक शेतकरी अडचणीत आल्याचा आरोप करत दूध उत्पादकांच्या अडचणींकडे राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी उत्पादक शेतकऱ्यांना प्रति लिटर १० रूपये अनुदान थेट खात्यावर द्या, दूध भुकटी निर्मितीसाठी प्रति किलो ५० रूपये अनुदान द्या अशा प्रमुख मागण्यांसाठी ओझर येथे भाजप प्रदेश सरचिटणीस आमदार प्रा. देवयानी फरांदे, प्रदेश उपाध्यक्ष खासदार डॉ. भारती पवार, सोशल मीडिया प्रदेश प्रमुख प्रवीण अलई, आमदार राहुल ढिकले यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले.सुनिल बच्छाव , योगेश चौधरी, बापू पाटील तालुका अध्यक्ष भागवत बोरस्ते, नितीन जाधव, नितीन गायकर , योगेश तिडके, रवींद्र गांगोले, दिपक श्रीखंडे, प्रशांत गोसावी, रतन बांडे, श्रीराम आढाव, शंकर वाघ, संजय गाजरे, वैकुंठ पाटील, बाळासाहेब फूलदेवरे, फेरु मल फुलवाणी, सतिश मोरे, अभिजित गोसावी, समाधान माळी, सुनील वाडकर, भुषण मोरे, केशव धुळे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.दूधाशी संबंधित काही बाबी केंद्र सरकारच्या अखत्यारीत येतात, त्यामुळे केंद्र सरकारकडे विषय मांडण्यासाठी राज्य सरकारने पुढाकार घेऊन सर्वपक्षीय शिष्टमंडळ पाठवायला हवे. सरकारी अनास्थेमुळे शेतकरी जोडधंद्यापासून परावृत्त होऊ नये यांची काळजी राज्य सरकारने घ्यायलाच हवी असे देवयानी फरांदे यांनी सांगितले. यावेळी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात होता.(फोटो ०२ओझर)मुंबई आग्रा महामार्गवर दहावा मैल येथे आंदोलन करताना खासदार भारती पवार, आमदार देवयानी फरांदे, राहुल ढिकले, बापूसाहेब पाटील आदी.
मुंबई आग्रा महामार्गावर भाजपचे दुध आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2020 14:30 IST
ओझर : लॉकडाऊन आणि सरकारी अनास्थेमुळे सध्या दुग्ध व्यवसाय व दूध उत्पादक शेतकरी अडचणीत आल्याचा आरोप करत दूध उत्पादकांच्या अडचणींकडे राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी उत्पादक शेतकऱ्यांना प्रति लिटर १० रूपये अनुदान थेट खात्यावर द्या, दूध भुकटी निर्मितीसाठी प्रति किलो ५० रूपये अनुदान द्या अशा प्रमुख मागण्यांसाठी ओझर येथे भाजप प्रदेश सरचिटणीस आमदार प्रा. देवयानी फरांदे, प्रदेश उपाध्यक्ष खासदार डॉ. भारती पवार, सोशल मीडिया प्रदेश प्रमुख प्रवीण अलई, आमदार राहुल ढिकले यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले.
मुंबई आग्रा महामार्गावर भाजपचे दुध आंदोलन
ठळक मुद्देदूध उत्पादकांच्या अडचणींकडे राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी