शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

भाजपाचे आता निष्ठावानांना गाजर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2019 00:15 IST

आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाने दुरावलेल्या आणि पक्षापासून दूर केलेल्या कार्यकर्त्यांना चुचकारणे सुरू केले असून, त्यांना विविध स्थानिक स्तरावरील समित्यांवर काम करण्यासाठी विचारणा करणे सुरू झाले आहे. पक्षाच्या वरिष्ठ पातळीवरूनच अशाप्रकारचे आदेश देण्यात आले असून, त्यामुळे ही कार्यवाही सुरू झाली असली होऊ घातलेल्या निवडणुकांची आचारसंहिता बघता ही पदे कुचकामी ठरण्याची शक्यता आहे.

ठळक मुद्देपदे देण्यासाठी विचारणा : मात्र औटघटकेची ठरणार पदे

नाशिक : आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाने दुरावलेल्या आणि पक्षापासून दूर केलेल्या कार्यकर्त्यांना चुचकारणे सुरू केले असून, त्यांना विविध स्थानिक स्तरावरील समित्यांवर काम करण्यासाठी विचारणा करणे सुरू झाले आहे. पक्षाच्या वरिष्ठ पातळीवरूनच अशाप्रकारचे आदेश देण्यात आले असून, त्यामुळे ही कार्यवाही सुरू झाली असली होऊ घातलेल्या निवडणुकांची आचारसंहिता बघता ही पदे कुचकामी ठरण्याची शक्यता आहे.राज्यातील सत्ताधारी भाजपा केवळ गाजर दाखवतात, अशाप्रकारची टीका विरोधक करीत असताना आता भाजपाने आपल्या कार्यकर्त्यांनादेखील पदांचे गाजर दाखविण्यास सुरुवात केल्याची टीका अंतस्थ भाजपातच सुरू झाली आहे.लोकसभा निवडणुकीत भाजपाचा पाच वर्षांपूर्वी विजय झाल्यानंतर अनुकूल वातावरण लक्षात घेतल्यानंतर पक्षात आयारामांची रीघ लागली. परपक्षातून येणारे नेते आणि त्यांचे कार्यकर्ते यामुळे पक्षातील नेत्यांनी मूळ निष्ठावांना बाजूला सारण्यास सुरुवात केली. पक्ष मोठा करायचा असेल तर बाहेरून येणाऱ्यांना संधी दिली पाहिजे, असे धडे दिल्यानंतर जुन्या कार्यकर्त्यांना जात, पैसा आणि अन्य कारणांवरून मागे हटविण्यास सुरुवात झाली. इतकेच नव्हे तर महापालिकेच्या निवडणुकीतदेखील डावलण्यात आले. त्यामुळे पक्षाशी निष्ठावान परंतु सध्याचे राजकीय वातावरण न मानवलेल्या कार्यकर्त्यांनी नाशिकमध्ये दूर राहणेच पसंत केले. संघ प्रतिष्ठान नामक संस्थादेखील अशा निष्ठावान कार्यकर्त्यांनी स्थापन केली असून, त्या माध्यमातून ते पक्षाला पूरक कामे करीत असतात. तथापि, पाच राज्यांत भाजपाला फटका बसल्यानंतर आता पक्षाला पुन्हा जुने कार्यकर्ते आठवले असून, त्यांना पदे देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यापार्श्वभूमीवर आमदारांकडून आणि नेत्यांकडून जुन्या आणि दूर गेलेल्या कार्यकर्त्यांना निमंत्रित करून त्यांना विविध शासकीय समित्यांपैकी कशावर काम करायला आवडेल, अशा प्रकारची विचारणा केली जात आहे. कोणत्याही समितीवर सदस्य म्हणून नियुक्ती झाली तरी एक ते दोन महिन्यांत लोकसभा निवडणुकीसाठी आदर्श आचारसंहिता लागू होणार असून, ही निवडणूक संपल्यानंतर काही दिवसांतच विधासभा निवडणुकांची आचारसंहिता जाहीर होईल. त्यामुळे समित्यांच्या बैठकाही होणार नाही. त्यामुळे पदे मिळवून लेटरपॅड आणि व्हिजिंटिंग कार्डशिवाय त्याला महत्त्व उरणार नाही, असे भाजपाच्या कार्यकर्त्यांचेच म्हणणे आहे.इतक्या वर्षांतपदे का दिली नाही?राज्यात सत्ता येऊन आता पाच वर्षे होत आहेत, जुन्या कार्यकर्त्यांना न्याय द्यायचाच होता तर या कालावधीत आठवण का झाली नाही? असा प्रश्न कार्यकर्त्यांकडून केला जात आहे..

टॅग्स :NashikनाशिकBJPभाजपा