शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

भाजपचे आजवरचे बळ मर्यादितच...!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2019 01:21 IST

भाजप स्थापन झाल्यानंतर सर्वाधिक काळ युती आणि एक निवडणूक स्वतंत्र्यरीत्या लढत दिल्यानंतर भाजपचे बळ वाढले असले तरी चार आमदार हा भाजपचा सर्वाधिक मोठा आकडा राहिला आहे. सध्या भाजपचा सुवर्णकाळ असतानादेखील पक्षाचे चारच उमेदवार रिंगणात आहेत.

ठळक मुद्देसध्या चार आमदार । १९९० चीच स्थिती; आता खरी परीक्षा

नाशिक : भाजप स्थापन झाल्यानंतर सर्वाधिक काळ युती आणि एक निवडणूक स्वतंत्र्यरीत्या लढत दिल्यानंतर भाजपचे बळ वाढले असले तरी चार आमदार हा भाजपचा सर्वाधिक मोठा आकडा राहिला आहे. सध्या भाजपचा सुवर्णकाळ असतानादेखील पक्षाचे चारच उमेदवार रिंगणात आहेत.१९८० साली भाजपची स्थापना झाल्यानंतर सतत विरोधी पक्षात राहिलेल्या पक्षाने आज मोठी मजल मारली असून, देशात तसेच राज्यात सत्तेत आहे; परंतु नाशिक जिल्ह्याचा विचार केला तर सध्याच्या स्थितीत सुवर्णकाळ असताना एकूण पंधरा मतदारसंघांमध्ये चारपेक्षा अधिक भाजपचे आमदार नाहीत. पक्षाची स्थापना झाल्यानंतर १९८० मध्ये येवल्यातून पक्षाचे भानुदास कदम यांनी येवला मतदारसंघातून तर (कै.) गणपतराव काठे यांनी नाशिक मतदारसंघातून निवडणूक लढविली; मात्र त्यात दोघांचा पराभव झाला होता. पक्षाला चांगले घवघवीत यश मिळाले ते १९८५ मध्ये. यावेळी भाजपचे प्रथमच तीन उमेदवार विजयी झाले. पक्ष स्थापनेनंतर भाजपला विधानसभा निवडणुकीत मिळालेले हे पहिले मोठे यश होते; परंतु त्यापेक्षा एक जागा अधिक मिळवून पक्षाने १९९० मध्ये बाजी मारली. अर्थात, हे सर्व करतानाच शिवसेना आणि भाजपची युती होतीच. १९९५ मध्ये युतीची सत्ता राज्यात आली. त्यावेळी खरे तर भाजपला अधिक जागा मिळणे अपेक्षित होते; परंंतु अवघ्या तीन जागा मिळाल्या. १९९९ मध्ये झालेल्या निवडणुकीत डॉ. दौलतराव आहेर यांचा विजय झाला. तर २००४ मध्ये त्यांचा पराभव कॉँग्रेसच्या डॉ. शोभा बच्छाव यांनी केला. २००९ मध्ये मतदारसंघाच्या पुनर्रचनेनंतर दोन मतदारसंघ वाढले आणि मनसेचे तीन आमदार निवडून आले. देवळालीची जागा अपेक्षेप्रमाणे शिवसेनेने राखली. आता युतीबाबत चर्चा सुरू असली तरी भाजपच्या अपेक्षा उंचावल्या आहेत.२०१४ मध्ये झालेल्या मोदी लाटेत भाजपचे नशीब फळफळले आणि सेनेशी युती नसताना शहरातील चारपैकी तीन मतदारसंघांमध्ये भाजपला यश मिळाले. त्याचप्रमाणे चांदवड, देवळा या मतदारसंघात डॉ. राहुल आहेर यांना संधी मिळाली. अर्थात, भाजपचे सुसाट वारे असतानाही भाजपला चार आमदारांच्या पलीकडे उमेदवार निवडून आणता आले नाही. १९९० मध्ये हीच स्थिती होती. त्यापलीकडे भाजप प्रभावी ठरू शकलेला नाही.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019NashikनाशिकBJPभाजपा