शहरं
Join us  
Trending Stories
1
एखाद्याला खासदार करायचं म्हटल्यावर करतो अन् पाडायचं म्हटलं तर पाडतोच' अजित पवारांची टोलेबाजी
2
सैन्याला मिळणार ₹50,000 कोटींचा बुस्टर डोस; ऑपरेशन सिंदूरनंतर सरकारने तिजोरी उघडली
3
भारत-पाकिस्तान युद्धविरामावर मोठी अपडेट; १८ मेपर्यंत मुदतवाढ, पुन्हा डीजीएमओ चर्चेला बसणार... 
4
आता ५९५ कोटींचा घोटाळा? Indusind Bank समोरील समस्या संपेनात; काय आहे प्रकरण?
5
म्हणे, व्हाईट हाऊसच्या प्रेस सचिवांना कतारमध्ये काश्मिरी वेटर भेटला; 'ट्रम्पना थँक्यू सांगा' म्हणाला...
6
भाजीपाल्यावरून वाद, तलवार चालवली,आगही लावली; मंदिरासमोरच दोन गटांमध्ये तुंबळ हाणामारी
7
अमेरिकेचा दुटप्पीपणा; पाकिस्तानला मदत करणाऱ्या तुर्कीला अत्याधुनिक क्षेपणास्त्रे पुरवणार...
8
गुरुवारी सायंकाळी तुर्की तर पहाटे हादरला चीन; पाकिस्ताननंतर त्याला साथ देणाऱ्या देशांना भूकंपाचे धक्के
9
पत्नी पतीच्या आत्महत्येचा लाईव्ह व्हिडीओ बनवत राहिली, मृत्यूचे धक्कादायक कारण आले समोर
10
शेअर बाजाराची घसरणीसह सुरुवात, निफ्टी २५,००० च्या लेव्हलवर; Bharti Airtel, IndusInd, Infosys टॉप लूझर्स
11
शेअर बाजारात यंदाची पहिलीच बंपर लॉटरी लागणार; या IPO ला मिळतोय दणकून GMP
12
चिदंबरम थरूर यांच्या मार्गावर! आधी युद्धविरामवर मोदी सरकारला पाठिंबा; आता इंडिया आघाडीबाबत सवाल उपस्थित
13
बिहार दौऱ्यादरम्यान आयनॉक्स मॉलमध्ये पोहचले राहुल गांधी, पाहिला 'हा' चित्रपट, म्हणाले...
14
मुंबई एअरपोर्टवरुन प्रवास करणाऱ्यांना आता अधिक खर्च करावा लागणार; 'या' शुल्कात मोठी वाढ, किती पैसे द्यावे लागणार?
15
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुती एकत्रच लढणार, काही ठिकाणी स्वबळही: CM फडणवीस
16
SBI मध्ये ₹५ लाख जमा केल्यावर मिळेल ₹२ लाखांपेक्षा अधिक व्याज; पाहा १,२,३ आणि ५ वर्षांचं कॅलक्युलेशन
17
भारतात तुर्की अन् अझरबैजानवरील बहिष्काराला वेग; ३० टक्के भारतीय पर्यटकांनी बुकिंग रद्द केले
18
आजचे राशीभविष्य १६ मे २०२५ : नोकरी - व्यवसायात लाभ प्राप्ती, कोणाच्या राशीत काय...
19
Sankashti Chaturthi 2025: 'घालीन लोटांगण' हा आरतीचा एक भाग नसून ते आहे स्वतंत्र कवन, पण कोणाचे? वाचा!
20
राष्ट्रपतींनी सर्वोच्च न्यायालयाला विचारले १४ प्रश्न; राज्यघटनेतील १४३(१) अनुच्छेदाचा वापर

भाजपाची विमानसेवा तर राष्ट्रवादीची मेट्रो ट्रेन

By admin | Updated: February 14, 2017 01:51 IST

कल्पक योजनांची स्पर्धा : भुजबळ यांच्या योजना मनपाच्या माथी

नाशिक : महापालिका निवडणुकीच्या निमित्ताने राजकीय पक्षांची कल्पक भरारी सुरू झाली आहे. भाजपाने नाशिक महापालिकेत भाजपाची सत्ता आल्यास नाशिकमधून थेट राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय विमानसेवा सुरू करण्याची दिलेली ग्वाही ताजी असतानाच आता राष्ट्रवादीने आपल्या जाहीरनाम्यात मोठी भरारी घेतली आहे. महापालिकेत सत्ता आल्यास मेट्रो ट्रेन सुरू करण्यात येणार आहे. बरे तर ही मेट्रो नाशिक शहरापुरतीत न राहाता महापालिकेची हद्द ओलांडून अन्य  तालुक्यांतही शिरणार असून, हे सर्व पालिकेच्या आवाक्यातील आहे का असा प्रश्न केला जात आहे. नाशिक महापालिकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने भाजपा पाठोपाठ राष्ट्रवादी कॉँग्रेसने जाहीरनामा प्रसिद्ध केले असून, सोमवारी सकाळी राष्ट्रवादीचे आमदार जयंत जाधव यांच्या हस्ते जाहीरनाम्याचे प्रकाशन करण्यात आले. त्यातील अनेक योजना यावेळी मांडण्यात आल्या असल्या तरी पक्षाचे नेते छगन भुजबळ यांनी पालकमंत्री असताना मांडलेल्या आणि कार्यवाहीत असलेल्या काही योजनांचा त्यात समावेश असून मेट्रो ट्रेनची योजना तर माजी खासदार समीर भुजबळ यांनी केंद्र सरकारकडे मांडली होती. मेट्रोच्या अंमलबजावणीसाठी नाशिक शहर अपूर्ण पडत असल्याचे त्यावेळी संबंधित सरकारी अधिकाऱ्यांनी म्हणणे मांडले होते. त्यामुळे नाशिक शहरापुरतीच नव्हे तर ग्रेटर म्हणजे बृहन नाशिकचा विचार करून देवळाली, भगूर, सिन्नर, घोटी, इगतपुरी, त्र्यंबकेश्वर, ओझर, निफाड या तालुक्यांना जोडणारी सेवा असावी, अशी त्यावेळी सूचना करण्यात आली होती. राष्ट्रवादीच्या जाहीरनाम्यात हाच राष्ट्रवादीचा विषय घेण्यात आला आहे, मात्र तत्कालीन खासदार समीर भुजबळ यांनी ही मागणी केंद्र सरकारकडे केली होती आणि राष्ट्रवादीच्या जाहीरनाम्यात ती महापालिकेच्या गळ्यात टाकण्यात आली आहे. विशेष म्हणजे सध्या केंद्रात आणि राज्यात राष्ट्रवादी अंशत: सत्तेवर नाही, त्यातच महापालिकेच्या आर्थिक आणि भौगोलिक मर्यादा बघता या जाहीरनाम्यातून मनोरंजन होत आहे.गंगापूर धरणाच्या वर किकवी धरण बांधण्याचा प्रस्ताव असाच जुना आहे. छगन भुजबळ पालकमंत्री असताना किकवी धरण बांधण्यावर शिक्कामोर्तब झाले असताना आता किकवी धरण बांधण्याचे जाहीरमान्यात म्हटले असून, आता शासनाने घेतलेली जबाबदारी महापालिका आपल्या गळ्यात मारून घेणार काय, असा प्रश्न आहे. उद्योजकांची मते मिळवण्यासाठी औद्योगिक क्षेत्राच्या सांडपाण्याची जबाबदारी पालिकेच्या गळ्यात घेण्याचा राष्ट्रवादीचा विचार असून, त्यामुळे जबाबदारी असलेल्या एमआयडीसी मात्र जबाबदारी मुक्त होणार आहे. कार्यक्षेत्रात आणि अधिकारात नसलेल्या अनेक योजना राष्ट्रवादीच्या जाहीरनाम्यात असून, त्यात औद्योगिक शांतता व सुरक्षितता टिकवणे हा एक भाग आहे. याशिवाय चांगले फुटपाथ, अद्ययावत रुग्णालय, वाहतनळ, झोपडपट्टी विकास, कविता राऊत स्पोटर््स अकॅडमी, एक्झीबिशन सेंटर, युवा विकास केंद्र, गोदावरी नदीचे संरक्षण असे तेच ते अनेक विषय विकासनाम्यात घेण्यात आले आहे.