शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

भाजपाच्या जाहिरातीतून दोघा आमदारांचा पत्ता कट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 19, 2018 00:11 IST

काही सत्ताधारी आमदारांची रिपोर्ट कार्ड खराब असल्याच्या चर्चेत नाशिक जिल्ह्यातील दोघा आमदारांच्या नावांचा समावेश असल्याचे बोलले जात असताना नाशिक दौऱ्यावर मराठा वसतिगृह उद्घाटनाच्या निमित्ताने आलेल्या महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या स्वागताप्रीत्यर्थ भारतीय जनता पक्षाने प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीतून शहरातील दोघा आमदारांचे छायाचित्र व नावे जाणीवपूर्वक टाळण्यात आल्याने या संदर्भातील चर्चा अधिकच गडदपणे होऊ लागली आहे.

ठळक मुद्देपक्ष कार्यकर्ते संभ्रमात : प्रदेशच्या नेत्यांचा आशीर्वाद

नाशिक : काही सत्ताधारी आमदारांची रिपोर्ट कार्ड खराब असल्याच्या चर्चेत नाशिक जिल्ह्यातील दोघा आमदारांच्या नावांचा समावेश असल्याचे बोलले जात असताना नाशिक दौऱ्यावर मराठा वसतिगृह उद्घाटनाच्या निमित्ताने आलेल्या महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या स्वागताप्रीत्यर्थ भारतीय जनता पक्षाने प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीतून शहरातील दोघा आमदारांचे छायाचित्र व नावे जाणीवपूर्वक टाळण्यात आल्याने या संदर्भातील चर्चा अधिकच गडदपणे होऊ लागली आहे. पक्ष श्रेष्ठींच्या आशीर्वादानेच विद्यमान आमदारांना जाहिरातीतून दूर ठेवण्यात आल्याचा अंदाज काढला जात आहे.आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू झाली असून, सत्ताधारी पक्षाबरोबरच विरोधीपक्षही कामाला लागला आहे. अशा परिस्थितीत राज्यातील सत्ताधारी भारतीय जनता पक्षाने एका खासगी संस्थेमार्फत राज्यातील आमदारांच्या कामाबाबत कानोसा घेण्यात आला असता, त्यात नाशिक जिल्ह्यातील भाजपातील दोघा आमदारांचाही समावेश असल्याचे सांगितले जाते. या अहवालात आमदारांची नावे असली तरी, ती पक्षाने उघड केलेली नाहीत, मात्र त्याचा आधार घेऊन प्रत्येक आमदाराच्या कामकाजाकडेच संशयाने पाहिले जात आहे.जिल्ह्यात भाजपाचे चार आमदार असून, त्यातील राहुल अहेर हे ग्रामीण भागातून निवडून आले आहेत. शहरात तीन आमदार असल्याने त्यातील दोन कोण? असा प्रश्न कार्यकर्ते पक्षांतर्गत विचारू लागले आहेत. शहरातील महापालिकेतील पदाधिकारी व पक्षाचे प्रदेश पदाधिकाºयांचे छायाचित्रासह नावे प्रसिद्ध केलेली असताना हिरे, फरांदे यांना त्यातून वगळण्याची बाब अनेक कार्यकर्त्यांना खटकली आहे. त्यामुळे त्यातून अनेक अर्थ काढले जात असून, ज्या दोन आमदारांच्या कामकाजा बाबत असमाधान व्यक्त केले जात आहे, त्यातील तर हे दोघे नसावेत? असा प्रश्न विचारला जात आहे. भाजपा हा शिस्तप्रिय पक्ष असल्यामुळे शहरातील दोघा आमदारांना जाहिरातीतून डावलण्याची कृती पक्षाच्या नेतृत्वाला विश्वासात घेतल्याशिवाय होऊ शकत नसल्याची कार्यकर्त्यांना खात्री आहे. त्यामुळे या साºया प्रकाराला वरिष्ठांचा आशीर्वाद मानला जात आहे.खुद्द तिघा आमदारांकडूनही याबाबतची चाचपणी केली जात असताना त्या पार्श्वभूमीवर नाशिक दौºयावर आलेले महसूलमंत्री चंद्रकांत पाटील व पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या स्वागताच्या जाहिरातीवरून आमदारांच्या कामकाजाबाबतची चर्चा अधिक ठळकपणे करण्यात आली आहे. भारतीय जनता पक्षाच्या सर्व पदाधिकारी व लोकप्रतिनिधींच्या नावाने प्रसिद्ध झालेल्या एका जाहिरातीतून पश्चिमच्या आमदार सीमा हिरे व मध्यच्या देवयानी फरांदे यांना जाणीवपूर्वक टाळण्यात आल्याचे अधोरेखित झाले.

टॅग्स :PoliticsराजकारणBJPभाजपाMLAआमदार