नाशिक : देशातील जनतेचा ट्रेंड बदलला आहे, त्याची सुरुवात गुजरात राज्यातील निवडणुकीपासून झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे होमपीच असलेल्या गुजरातमध्ये सत्तेवर असलेल्या भाजपाला ९९ जागांवरच समाधान मानावे लागले, तर कॉँग्रेस कुठून कोठपर्यंत पोहोचून गेली. २०१४च्या लोकसभा निवडणुकीच्या निकालाचा विचार केला तर भाजपाला गुजरातमध्ये १६५ जागा मिळणे अपेक्षित होते. परंतु नरेंद्र मोदींसह अख्खा भाजपा या निवडणुकीत विजयासाठी लढूनही त्यांचा तसा पराभवच झाला, दुसरीकडे एकटे राहुल गांधी कॉँग्रेससाठी लढत होते. या सर्व गोष्टींचा विचार करता, आज जर लोकसभेची निवडणूक झाली तर भाजपाच्या ७० ते ८० जागा कमी होतील. येणाºया निवडणुकीत भाजपाला २०० जागाही मिळणार नाही असे भाकीत महाराष्टÑ नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी व्यक्त केले.धुळ्याहून नाशिकमार्गे मुंबईकडे परतणाºया ठाकरे यांनी सोमवारी शासकीय विश्रामगृहावर पत्रकारांशी अनौपचारिक संवाद साधला, ते पुढे म्हणाले, देशासमोर भाजपाशिवाय पर्याय नाही, असे भ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. तसे असते तर इंद्रकुमार गुजराल, देवेगौडा, चंद्रशेखर हे पंतप्रधान कधी झाले असते काय? महात्मा गांधी यांनी नेहरूंचे पंतप्रधानपदासाठी नाव पुढे केले म्हणून ते झाले, त्यानंतर इंदिरा गांधी, राजीव गांधी पंतप्रधान झाले, तेव्हा कोणीच आजन्म कोणत्याच पदासाठी कायम नसतो. निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर आपोआपच पंतप्रधानपदाचा उमेदवार समोर येतो. आपल्या लोकशाहीत अगोदर खासदार निवडून यावा लागतो व नंतर पंतप्रधानपदाचा उमेदवार ठरतो हे लक्षात घेतले पाहिजे. असे सांगून राज ठाकरे यांनी दुसरे महायुद्ध जिंकून आलेल्या विल्यम चर्चिलचे उदाहरण दिले. युद्धानंतर झालेल्या निवडणुकीत चर्चिलचा तेथील जनतेने पराभव केला, कारण चर्चिल युद्ध जिंकण्यासाठी योग्य होता, देश चालविण्यासाठी नव्हे, त्यामुळे जनता नुसतीच सुशिक्षित असून, चालत नाही, ती सुज्ञ असणेही गरजेचे असल्याचे सांगितले.
निवडणुका झाल्यास भाजपाला दोनशे जागाही मिळणार नाहीत
By श्याम बागुल | Updated: September 3, 2018 15:45 IST
देशासमोर भाजपाशिवाय पर्याय नाही, असे भ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. तसे असते तर इंद्रकुमार गुजराल, देवेगौडा, चंद्रशेखर हे पंतप्रधान कधी झाले असते काय? महात्मा गांधी यांनी नेहरूंचे पंतप्रधानपदासाठी नाव पुढे केले म्हणून ते झाले, त्यानंतर इंदिरा गांधी, राजीव गांधी पंतप्रधान झाले, तेव्हा कोणीच आजन्म कोणत्याच पदासाठी कायम नसतो. निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर आपोआपच पंतप्रधानपदाचा उमेदवार समोर
निवडणुका झाल्यास भाजपाला दोनशे जागाही मिळणार नाहीत
ठळक मुद्देराज ठाकरे : सत्ताधाऱ्यांचे मूल्यमापन जनताच करेलकोणीच आजन्म कोणत्याच पदासाठी कायम नसतो.