शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

भाजपामुळे वाढणार चुरस

By admin | Updated: February 1, 2017 22:27 IST

महिलांसाठी राखीव : गणाकडे तालुक्याचे लक्ष !

अशोक देशमुख ओतूरकळवण तालुक्यातील अभोणा गटातील नरूळ गण यंदा सर्वसाधारण महिला राखीव झाल्याने मातब्बर पुढाऱ्यांचा हिरमोड झाला असून, अनेक नेते सौभाग्यवतींना उभे करण्याच्या प्रयत्नात आहेत. यंदा प्रथमच या गणात भाजपा पूर्ण ताकदीने उतरणार असल्याने जोरदार चुरस वाढणार आहे.सन १९९२ ते १९९७ या काळात या गणातील अपक्ष उमेदवार मावंजी गायकवाड यांनी कळवण पंचायत समितीचे उपसभापतिपद भूषविले आहे. १९९७ साली मोहनदरी गण होता. त्यानंतर १९९२, २००२, २००७, २०१२ या पंचवार्षिकमध्ये नरूळ गण अस्तित्वात आला. प्रत्येक वेळी अभोणा गटाचे यशवंत गवळी हे या गणाचे केंद्रबिंदू ठरले. या पाच पंचवार्षिकमध्ये चार वेळा काँग्रेसचे उमेदवार, तर एकवेळा अपक्ष उमेदवार विजयी झाले आहेत. नरूळ गणातून मावजी गायकवाड, बेबीताई चव्हाण (१९९७), संपत भोये (२००२), बळीराम देवरे (२००७), बेबीबाई गावित (२०१२) यांनी प्रतिनिधित्व केले आहे.कळवण तालुक्यातील चारही गटात अनेक राजकीय मतप्रवाह बदललेत तरी अभोणा गटाचे प्रतिनिधित्व आजपर्यंत काँग्रेसनेच केले आहे. त्यातील नरूळ गणातील पाचपैकी चार वेळा काँग्रेसचे उमेदवार विजयी झाले आहेत. फक्त एक वेळा १९९२ मध्ये जनरल पुरुष जागेवर अनु.जमातीचे अपक्ष उमेदवार मावजी गायकवाड विजयी झाले होते व ते कळवण उपसभापतीही झाले होते. तसेच २००२ मध्ये या गणातून निवडून आलेले संपत भोये यांनाही उपसभापतिपदाचा मान मिळाला होता. गेल्या २०१२च्या निवडणुकीत काँग्रेसतर्फे बेबीताई गावित निवडून आल्या असून, त्या विद्यमान सदस्य आहेत. तालुक्यात राष्ट्रवादीची सत्ता असल्याने फारशी परिणामकारक कामगिरी त्यांना करता आली नाही. या गणात भाजपाचेही पदाधिकारी काही वर्षांपासून सक्रिय झाले असून, खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी ओतूर धरणाच्या कामाला चालना दिल्यामुळे भाजपाचा मतप्रवाह वाढला आहे. तर राष्ट्रवादीचा मतप्रवाह कमी झाला आहे. तसेच आमदार जे.पी. गावित यांनी प्रत्यक्षपणे ओतूर धरणाचा पाणी गळतीच्या बांधकामाचा प्रलंबित प्रश्न मार्गी लावून काम सुरू केल्याने माकपाचे प्राबल्य वाढले आहे.