शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

देशातील आर्थिक मंदीला भाजपाच जबाबदार : संजय राऊत

By श्याम बागुल | Updated: September 4, 2019 15:33 IST

माजी पंतप्रधान मनमोहनसिंग यांनी साडेतीन वर्षापुर्वीच देशाच्या अर्थव्यवस्थेविषयी भाकित केले होते. ते आता खरे वाटू लागले असून, अ‍ॅटोमोबाईल, टेक्सटाईल, फार्मास्युटीकल, बांधकाम अशा अनेक क्षेत्रात मंदीचे सावट निर्माण झाले असून, रोजगाराचा प्रश्न आ वासून उभा आहे.

ठळक मुद्देलोकसभा निवडणुकीपूर्वी युतीचा फार्म्युला यापुर्वीच ठरलेला शिवसेना सत्तेत असली तरी, धोरणात्मक निर्णय घ्यायचा अधिकार नाही

लोकमत न्युज नेटवर्कनाशिक : देशात आर्थिक कोंडीत सापडला असून, मंदीमुळे बेरोजगारीचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. देशाला आर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी या क्षेत्रातील तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेण्यात कोणताही कमीपणा नको. तीन वर्षापुर्वीच्या नोटाबंदी व त्यापाठोपाठच्या जीएसटी लागू करण्याला शिवसेनेचा विरोध होता. त्यामुळे आता आलेल्या आर्थिक मंदीला भाजपाच जबाबदार असल्याचे स्पष्ट मत शिवसेनेचे प्रवक्ते व खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केले. शिवसेना सत्तेत असली तरी, धोरणात्मक निर्णय घ्यायचा शिवसेनेला अधिकार नाही असा निर्वाळाही त्यांनी दिला.

खासदार संजय राऊत दोन दिवसांच्या नाशिक भेटीवर आले असून, उत्तर महाराष्ट्रातील प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी संवाद साधल्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी उपरोक्त मत व्यक्त केले. माजी पंतप्रधान मनमोहनसिंग यांनी साडेतीन वर्षापुर्वीच देशाच्या अर्थव्यवस्थेविषयी भाकित केले होते. ते आता खरे वाटू लागले असून, अ‍ॅटोमोबाईल, टेक्सटाईल, फार्मास्युटीकल, बांधकाम अशा अनेक क्षेत्रात मंदीचे सावट निर्माण झाले असून, रोजगाराचा प्रश्न आ वासून उभा आहे. त्यामुळे सरकारने परिस्थिती सावरण्यासाठी लवकर पावले उचलणे गरजेचे आहे. तसे न झाल्यास सरकारने घेतलेले ३७० कलम रद्द करण्याचा तसेच राम मंदिरासारख्या प्रश्नांवरील निर्णयांना काही अर्थ राहणार नाही. या प्रश्नांपेक्षा लोकांना पोटाचा प्रश्न महत्वाचा वाटतो अशी पृष्टीही त्यांनी जोडली. शिवसेना सत्तेत सहभागी असली तरी, आमचा एकच मंत्री आहे. देशाचे धोरणे पंतप्रधान, अर्थमंत्री, गृहमंत्री, संरक्षणमंत्री, मनुष्यबळ विकासमंत्री ठरवित असतो. त्यामुळे देशापुढे निर्माण झालेल्या आर्थिक परिस्थितीशी शिवसेनेचा संबंध नाही, त्यासाठी भाजपाच जबाबदार असल्याचे खासदार राऊत म्हणाले.आगामी विधानसभा निवडणुकीसाठी भाजप-सेनेचा फार्म्युला ठरला असून, लोकसभा निवडणुकीपूर्वी वरळीतील हॉटेलमध्ये भाजपाचे राष्टÑीय अध्यक्ष अमीत शाह, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यात युतीचा फार्म्युला एकदा ठरला आहे. जागा वाटप व सत्तेत वाटा ‘फिफ्टी-फिफ्टी’ ठरलेले असून येत्या निवडणूकीत महाराष्टÑात युतीला ऐतिहासिक यश मिळेल याची खात्री वाटल्यानेच कॉँग्रेस-राष्टÑवादीचे तंजावर नेते पक्षांतर करीत असल्याचे खासदार राऊत यांनी सांगितले. या पक्षांतरात आमच्याकडे ‘वॉशिंग’ मशीन नसल्याने आम्ही प्रत्येकाला परखून घेत आहोत, त्याच बरोबर ज्या मतदार संघात पक्षाची कमकुवत परिस्थिती आहे, अशा पर्याय नसलेल्या मतदार संघातच अन्य पक्षातील व्यक्तींना आम्ही प्रवेश देत असल्याचे सांगून राऊत यांनी, गेल्या विधानसभा निवडणुकीच्या काळात कॉँग्रेस-राष्टÑवादीच्या २८ आमदारांनी सेनेत प्रवेश करण्याची तयारी दर्शविली होती परंतु स्थानिक सैनिकांचा विरोध असल्यामुळे सेनेने त्यांना प्रवेश नाकारला. हे सर्व जण भाजपात गेले व निवडून आले. त्यामुळे भाजपाला सेनेपेक्षा जास्त जागा मिळाल्या असा गौप्यस्फोटही त्यांनी केला. यावेळी शिवसेनेचे संपर्क नेते भाऊसाहेब चौधरी, खासदार हेमंत गोडसे, जिल्हाप्रमुख विजय करंजकर, अजय बोरस्ते, डी. जी. सुर्यवंशी, सुहास कांदे आदी उपस्थित होते.चौकट====

टॅग्स :PoliticsराजकारणShiv SenaशिवसेनाBJPभाजपाNashikनाशिक