भाजपच्या वतीने शहराच्या विविध भागात निदर्शने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 6, 2021 04:16 AM2021-05-06T04:16:27+5:302021-05-06T04:16:27+5:30

भाजप गटनेता जगदीश पाटील यांनी संपर्क कार्यालयात हातात निषेध फलक घेऊन घोषणाबाजी केली. भाजप नाशिक शहर सचिव अमित घुगे ...

BJP protests in various parts of the city | भाजपच्या वतीने शहराच्या विविध भागात निदर्शने

भाजपच्या वतीने शहराच्या विविध भागात निदर्शने

Next

भाजप गटनेता जगदीश पाटील यांनी संपर्क कार्यालयात हातात निषेध फलक घेऊन घोषणाबाजी केली. भाजप नाशिक शहर सचिव अमित घुगे यांनी त्यांच्या परिसरात तसेच पेठरोड येथेही आंदोलन करण्यात आले.

सिडको विभागात भारतीय जनता पक्ष युवा मोर्चा सिडको मंडलच्या वतीने अभियंतानगर,कामठवाडे परिसरात निषेध करण्यात आला.

यावेळी अनिकेत कदम, किरण गाडे देशमुख, ललित कोठावदे, अजय मालपुरे, शुभम कदम, उपस्थित होते. सिडकोत अन्य भागातदेखील कार्यकर्त्यांनी निदर्शने करून तृणमूल काँग्रेसचा निषेध केला. या आंदोलनांमध्ये मंडल अध्यक्ष अविनाश पाटील, बाळासाहेब पाटील, नगरसेवक प्रतिभाताई पवार, अलका आहिरे, भाग्यश्री ढोमसे, प्रदीप पेशकार, कैलास आहिरे आदी सहभागी झाले होते.

सातपूर विभागातही भाजपने आंदोलन केले. माजी सभागृहनेता दिनकर पाटील तसेच

अमोल पाटील आदींनी आंदोलन केले.

Web Title: BJP protests in various parts of the city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.