शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

राहुल गांधींच्या निषेधार्थ भाजपची निदर्शने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2019 01:32 IST

स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्याबाबत केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांचा भाजपच्या वतीने जाहीर निषेध करीत सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी भाजपच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी ‘राहुल गांधी हाय हाय, राहुल गांधी माफी मांगो’ अशा घोषणा देत जिल्हाधिकारी कार्यालयाचा परिसर दणाणून सोडला होता.

नाशिक : स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्याबाबत केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांचा भाजपच्या वतीने जाहीर निषेध करीत सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी भाजपच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी ‘राहुल गांधी हाय हाय, राहुल गांधी माफी मांगो’ अशा घोषणा देत जिल्हाधिकारी कार्यालयाचा परिसर दणाणून सोडला होता.सावरकर यांच्याविषयी काढलेले अपमानास्पद विधान करून त्यांचा आणि तमाम देशभक्त बांधवांचा अपमान केल्याने त्यांनी देशाची माफी मागावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली. तसेच जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात सावरकर यांच्यासारख्या महान स्वातंत्र्यसेनानीबाबत अवमानजनक वक्तव्य केल्याबद्दल राहुल गांधी यांनी माफी मागण्याची मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली. यावेळी पोलिसांनी हस्तक्षेप करीत पुतळा हिसकावून घेतला. त्यामुळे आंदोलक आणि पोलीस यांच्यात झटापट देखील झाली. आंदोलनप्रसंगी भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष गिरीश पालवे, विजय साने, प्रा. सुहास फरांदे, लक्ष्मण सावजी, उत्तम उगले, देवदत्त जोशी, उद्धव निमसे, हिमगौरी आडके, रोहिणी नायडू, सुजाता करजगीकर, भारती बागुल, पुष्पा शर्मा, प्रशांत आव्हाड, प्रथमेश गिते, आशिष नहार, पवन भगूरकर, अरुण शेंदुर्णीकर, अजिंक्य साने, बाळासाहेब पाटील, अ‍ॅड. भानुदास शौचे, प्रफुल्ल संचेती, सुहास शुक्ल, योगेश हिरे, गोविंद बोरसे, समीर देव आदींसह अन्य पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.राष्टÑभक्ती तुझे नाव सावरकर !भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी राहुल गांधी यांचा निषेध म्हणून काळ्या फिती बांधल्या होत्या. तसेच सावरकर यांचे छायाचित्र असलेले फलक झळकवत घोषणा दिल्या. यावेळी कार्यकर्त्यांनी ‘राष्टÑभक्ती तुझे नाव सावरकर-सावरकर, देशभक्ती तुझे नाव सावरकर-सावरकर’ अशा घोषणादेखील देत परिसर दणाणून सोडला होता.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीBJPभाजपाnashik collector officeनाशिक जिल्हाधिकारी कार्यालय