मालेगाव : येथील भारतीय जनता पक्षाच्या वतीने विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडवणीस यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रम साधेपणाने पार पडले. जिल्हाध्यक्ष सुरेश निकम यांच्या मार्गदर्शनाखाली महात्मा गांधी पुतळा परिसराची स्वच्छता करण्यात आली. त्यानंतर पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून नागरिकांना मास्कचे वाटप करण्यात आले. त्याचप्रमाणे रावळगाव येथे आर्सेनिक अल्बम होमिओपॅथी गोळ्यांचे वाटप करण्यात आले.यावेळी तालुकाध्यक्ष नीलेश कचवे, लकी गिल, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष देवा पाटील, नगरसेवक संजय काळे, पोपट लोंढे, सुधीर जाधव, रविश मारू, हरिप्रसाद गुप्ता, श्रीराम सोनवणे, महावीर छाजेड,बापू वाघ, हेमंत पूरकर, पप्पू पाटील, भूषण शिंदे, राहुल कानडे, नितीन पाटील, प्रल्हाद वानखेडे, कैलास मार्केंडे आदी उपस्थित होते.(वा.प्र.)
मालेगाव तालुक्यात भाजपतर्फे कार्यक्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2020 01:09 IST