शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
यावेळी तीन तुकडेच करा! पीएम मोदींनी काल पाच उच्चस्तरीय बैठका घेतल्या
3
आजचे राशीभविष्य, १ मे २०२५: व्यापारात फायदा अन् नोकरीत बढतीची शक्यता
4
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
5
वाहत्या पाण्याला जेव्हा भाले फुटतात...
6
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
7
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
8
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
9
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
10
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
11
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
12
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
13
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
14
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
15
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
16
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
17
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
18
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
19
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
20
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला

भारतरत्नचा मुद्दा भाजपने पळविला

By संजय पाठक | Updated: October 18, 2019 02:02 IST

ब्रिटिशकालीन लढ्यातील अग्रणी क्रांतिकारक स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांना भारतरत्न देण्यासाठी प्रयत्न करण्याचे भाजपने जाहीरनाम्यात नमूद केले असून, त्यानिमित्ताने पुन्हा या मागणीला उजाळा मिळाला आहे. गेल्या काही वर्षांत शिवसेनेने हा मुद्दा हाती घेतला होता; मात्र विधानसभेच्या जाहीरनाम्यात तो भाजपने पळविला आहे.

ठळक मुद्देआधी होती शिवसेनेची मागणी : हिंदुत्ववाद्यांना चुचकारण्याचे प्रयत्न

नाशिक : ब्रिटिशकालीन लढ्यातील अग्रणी क्रांतिकारक स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांना भारतरत्न देण्यासाठी प्रयत्न करण्याचे भाजपने जाहीरनाम्यात नमूद केले असून, त्यानिमित्ताने पुन्हा या मागणीला उजाळा मिळाला आहे. गेल्या काही वर्षांत शिवसेनेने हा मुद्दा हाती घेतला होता; मात्र विधानसभेच्या जाहीरनाम्यात तो भाजपने पळविला आहे.भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील स्वातंत्र्यवीर सावरकरांचे योगदान अतुलनीय आहे; मात्र त्यांना सतत वादात ढकलण्याचे प्रयत्न राजकारण्यांनी केल्याची भावना सावरकरप्रेमींमध्ये आहे. अंदमानच्या जेलमधून सुटकेसाठीचा माफीनामा आणि अन्य कारणांवरून सावरकरांना वादात ठेवून त्यांच्या अन्य कार्याकडे आणि प्रतिभेकडे सतत दुर्लक्ष केले जात असल्याचीदेखील भावना व्यक्त केली जाते.सावरकर हे क्रांतिकारकच नव्हे तर ते भाषातज्ज्ञ, कवी होते. शिवाय जातिअंत चळवळीचे त्यांचे कार्यदेखील महत्त्वाचे होते, असे समर्थक मानतात; परंतु त्यानंतरदेखील त्यांचा यथोचित राष्टÑपुरुष म्हणून गौरव होत नसल्याची खंतदेखील व्यक्त केली जाते. शिवसेना आणि भाजप दोन्ही पक्षांनी हिंदुत्ववादी म्हणून त्यांना कायम मानाचे स्थान दिले असले तरी त्यांच्याकडूनदेखील सावरकरांची प्रतिमा उजागर करण्यासाठी फार प्रयत्न केले जात नसल्याची खंत बोलून दाखविली जात होती. गेल्या काही वर्षांत शिवसेनेने हा मुद्दा उचलला आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे तसेच खासदार संजय राऊत यांनी लोकसभा निवडणुकीत नाशिकच्या जवळपास सर्वच सभांमध्ये त्याचा उल्लेख करताना सावरकर यांना भारतरत्न मिळविण्यासाठी पाठपुरावा करू, असेही जाहीर केले; परंतु विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मात्र भाजपानेच हा मुद्दा पळवून आपल्या जाहीरनाम्यात घातला आहे.क्रांतिसूर्य महात्मा जोतिबा फुले आणि स्वातंत्र्यवीर सावरकर या दोघांनाही भारतरत्न देण्याचा प्रयत्न करू, असे त्यात नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे हिंदुत्ववादी सुखावले असले तरी वारंवार होणारी मागणी पूर्ण होणार काय याबाबत मात्र शंका उपस्थित केली जात आहे.नाशिकमधूनही प्रयत्नस्वातंत्र्यवीर सावरकर यांना भारतरत्न मिळावा यासाठी नाशिकच्या शिवसैनिक असलेल्या अ‍ॅड. नीलेश कुलकर्णी यांनी एक लाख नागरिकांच्या सह्या घेऊन पंतप्रधानांना निवेदन पाठविण्याचा संकल्प केला असला तरी दुर्दैवाने त्यांच्या अपघाती निधनानंतर संकल्प अर्धवट राहिला.४सावरकरांच्या भगूर येथील वाड्याचे स्मारकात रूपांतर करण्यात आले आहे. अभिनव भारत संस्थेच्या कार्यालयाचेदेखील संवर्धन केले जात आहे. शिवाजी उद्यानाचे उद्घाटनही सावरकर यांच्या हस्ते करण्यात आले होते.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019BJPभाजपा