फळविक्रेते कामळस्कर हे आपल्या आल्टो वाहनातून फळांची सकाळी साडेनऊ वाजेदरम्यान विक्री करीत होते. यावेळी सहायक पोलीस निरीक्षक गणेश मस्के यांनी कामळसकर यांना मारहाण केली. अभोणा पोलीस स्टेशन हद्दीत नियमित चालणाऱ्या अवैध धंद्यांबाबत कामळस्कर यांनी आवाज उठविल्यानेच त्याचा राग मनात ठेवून श्री कामळस्कर यांना मारहाण केली असल्याचे निवेदनात नमूद केले आहे. निवेदनावर भाजपचे तालुकाध्यक्ष दीपक खैरनार, जिल्हा सरचिटणीस नंदकुमार खैरनार, माजी जिल्हाध्यक्ष विकास देशमुख, तालुका महामंत्री डॉ. अनिल महाजन, जिल्हा कार्यकारिणी सदस्य सचिन सोनवणे, गोविंद कोठावदे, चंद्रशेखर जोशी, बाबा वाघ, योगेश पवार यांच्या स्वाक्षऱ्या आहेत. याबाबत अभोणा पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक गणेश म्हस्के यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.
भाजप पदाधिकाऱ्याला पोलीस निरीक्षकाकडून मारहाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2021 04:14 IST