शहरं
Join us  
Trending Stories
1
फ्लिपकार्ट बिग बिलिअन डेजचा मोठा स्कॅम! अनेकांनी आयफोन १६ ऑर्डर केले, कंपनीने अचानक रद्द केले...
2
“CM, DCM यांची दिल्लीत वट, अतिवृष्टीच्या नुकसानभरपाईचा प्रस्ताव केंद्राला पाठवा”: वडेट्टीवार
3
शेअर बाजार लाल निशाणीवर बंद; तरीही Axis बँकेसह 'या' स्टॉक्सनी घेतली जोरदार झेप!
4
बायकोने मोबाईल मागितला, नवऱ्याने नाही दिला; संतापलेल्या पत्नीने मग घरातला चाकू घेतला अन्...
5
सरकारी नोकऱ्यांसाठी वयोमर्यादा शिथील करावी, काश्मिरी हिंदूंची मागणी; काय म्हणालं सर्वोच्च न्यायालय?
6
कंपनीचं एक स्पष्टीकरण आणि ₹३,४०० नं वाढली शेअरची किंमत; रचला इतिहास, भाव विक्रमी उच्चांकावर
7
'तो' वाद जीवावर बेतला! अवघ्या २० रुपयांसाठी काँग्रेस नेत्याच्या भावाची गोळ्या झाडून हत्या
8
Solapur: 'भैय्याला आधी काढा.. तो आत अडकला आहे'; भावाचा मृत्यू, बहिणीचा आक्रोश; मृतदेहच सापडला
9
सुनेत्रा अजित पवार यांचे NCP कार्यकर्त्यांना आवाहन; म्हणाल्या, “अतिवृष्टी हातात नाही, पण...”
10
Video: माजी मंत्री तानाजी सावंत यांचा बंगला पाण्याखाली; दोन-दोन टोयोटा फॉर्च्युनर पुरात बुडाल्या...
11
रस्त्यांवरील खड्ड्यांबाबत प्रश्न विचारताच कर्नाटकचे उपमुख्यमंत्री संतापले, म्हणाले पंतप्रधानांच्यां निवासस्थानाबाहेरही...  
12
पोस्ट ऑफिसच्या 'या' योजनेत फक्त व्याजातूनच ४.५ लाखांची कमाई; सोबत टॅक्समध्येही मिळतेय सूट
13
अभूतपूर्व परिस्थितीत तातडीच्या मदतीसह कायमस्वरुपी मदतीची गरज; अन्यथा शेती मोठ्या समस्येत - शरद पवार
14
Food: भरपूर गर असलेले सीताफळ कसे निवडावे? कच्चे फळ निवडल्यास काय असतो धोका?
15
सरकारी कर्मचारी आणि पेन्शधारकांना मोठी दिवाळी भेट! पगारात होणारी इतकी वाढ
16
'आपलं अफेअर विसरून जा'; फॉर्महाऊसवर नेऊन अत्याचार केल्याचा तरुणीची आरोप, पोलीस निरीक्षकावर गुन्हा
17
पुणे विमानतळावर पंढरपुरातील नेत्याच्या बॅगेत बंदुकीसह सापडली काडतुसे; तो नेता कोण?
18
PM मेलोनींच्या इटलीमध्ये हजारो आंदोलक रस्त्यावर, बस-रेल्वे गाड्यांची तोडफोड; 60 पोलीस जखमी
19
पेनी स्टॉक बनला मल्टीबॅगर, एका वर्षात केलं मालामाल; १ लाखांचे झाले ६८ लाखांपेक्षा अधिक
20
Accident Video: दोन बाईकचा थरकाप उडवणारा अपघात; हवेत उडाले, नंतर फूट दूर जाऊन पडले

स्वपक्षीय सरकारवर भाजपा खासदार नाराज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2018 00:51 IST

नाशिक : गेल्या चार वर्षांपासून रखडलेल्या संजय गांधी निराधार अनुदान योजना समितीवरील अशासकीय सदस्यांच्या नेमणुकीत भारतीय जनता पक्षाच्या सदस्यांना डावलून ४० वर्र्षे ज्या मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाशी संघर्ष करावा लागला त्यांच्याच कार्यकर्त्यांची वर्णी लावल्याच्या कारणावरून भारतीय जनता पक्षाचे दिंडोरीचे खासदार हरिश्चंद्र चव्हाण चांगलेच नाराज झाले असून, या समितीवर अशासकीय सदस्य म्हणून ...

नाशिक : गेल्या चार वर्षांपासून रखडलेल्या संजय गांधी निराधार अनुदान योजना समितीवरील अशासकीय सदस्यांच्या नेमणुकीत भारतीय जनता पक्षाच्या सदस्यांना डावलून ४० वर्र्षे ज्या मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाशी संघर्ष करावा लागला त्यांच्याच कार्यकर्त्यांची वर्णी लावल्याच्या कारणावरून भारतीय जनता पक्षाचे दिंडोरीचे खासदार हरिश्चंद्र चव्हाण चांगलेच नाराज झाले असून, या समितीवर अशासकीय सदस्य म्हणून नेमणूक झालेल्या पत्नी कलावती यांचा राजीनामा त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना सादर करून संजय गांधी निराधार समितीच बरखास्त करावी, असे साकडे थेट मुख्यमंत्र्यांना घातले आहे.खासदार चव्हाण यांनी या नेमणुकीबाबत उचललेले पाऊल पाहता भाजपांतर्गत सारे काही आलबेल नसल्याचे द्योतक मानले जात असून, स्वत:च्या सरकारवरच त्यांनी व्यक्त केलेल्या नाराजीमुळे विविध शासकीय समित्यांवरील अशासकीय सदस्यांच्या नेमणुकीबाबत भाजपा कार्यकर्त्यांना डावलण्यात आल्याची भावना वाढीस लागली आहे. गेल्या आठवड्यात पालकमंत्री गिरीश महाजन यांनी नाशिक जिल्ह्णातील प्रत्येक तालुकानिहाय संजय गांधी निराधार अनुदान योजना समितीचे अध्यक्ष व अशासकीय सदस्यांच्या नेमणुकांची शिफारस जिल्हाधिकाºयांकडे पाठविली होती. त्यात सुरगाणा तालुक्याच्या समितीच्या अध्यक्षपदी आमदार जे. पी. गावित यांची, तर अशासकीय सदस्य म्हणून नबू खानू गोरी, महंमद झिपा बेलीफ, श्रीमती कलावती हरिश्चंद्र चव्हाण, धर्मेंद्र पारसमल पगारिया, भिका हरी राठोड यांची नेमणूक करण्यात आली आहे. यातील कलावती चव्हाण या दिंडोरी लोकसभा मतदारसंघाचे खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांच्या पत्नी आहेत. खासदार चव्हाण यांच्या लोकसभा मतदारसंघात सुरगाणा विधानसभा मतदारसंघाचा समावेश आहे. संजय गांधी निराधार अनुदान समितीवर अशासकीय सदस्यांच्या नेमणुका करताना खासदार चव्हाण यांना विश्वासात घेतले गेले नसल्याची त्यांची भावना झाली असून, कलावती चव्हाण वगळता अन्य अशासकीय सदस्य मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाशी संबंधित असल्याचे पाहून चव्हाण नाराज झाले आहेत. सुरगाणा तालुक्यात वर्षानुवर्षे वर्चस्व असलेल्या मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाशी राजकीय व वैचारिक पातळीवर भाजपाने गेल्या अनेक वर्षांपासून संघर्ष करत, पक्षासाठी प्रसंगी लाठ्याकाठ्या खाल्ल्या असतानाही त्यांना या समितीत डावलल्याची भावना खासदार चव्हाण यांच्या समर्थकांनी व्यक्त केल्याचे पाहून पत्नी कलावती चव्हाण यांच्या नेमणुकीचे पत्र हाती मिळताच चव्हाण यांनी त्यांचा राजीनामा जिल्हाधिकाºयांकडे सुपूर्द केला आहे.थेट मुख्यमंत्र्यांकडे व्यक्त केली नाराजीयासंदर्भात खासदार चव्हाण यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठविले असून, त्यात म्हटले आहे की, कलावती हरिश्चंद्र चव्हाण यांची मागणी नसतानाही त्यांची सदस्य म्हणून या समितीवर नियुक्ती केलेली आहे, तरी सदरची नेमणूक रद्द करण्यात यावी कारण भारतीय कम्युनिस्ट पार्टीतील सदस्यांबरोबर काम करणे अत्यंत अवघड असून, सदरहू कम्युनिस्टांबरोबर मी गेल्या ४० वर्षांपासून लढत असून, सदरहू पक्ष आपल्या पक्षास कोणतेही सहकार्य करीत नसून मोठ्या प्रमाणावर नुकसान करीत आहे. अनेक कार्यकर्त्यांचा व जनतेचा बळी देऊन मालमत्तेचे नुकसान करीत असल्याने सदरची कमिटीच रद्द करण्यात यावी, अशी मागणीही करण्यात आली आहे.

टॅग्स :BJPभाजपा