नाशिकला दररोज २ हजार रेमडेसिविर व १०० मेट्रिक टन ऑक्सिजन देण्याचे आश्वासन अन्न व औषधी प्रशासनाचे सचिव विजय सौरभ यांनी दिल्याने हे आंदोलन मागे घेण्यात आले. नाशिक नाशिक जिल्ह्यासाठी १२५ मेट्रिक टन ऑक्सिजनची गरज असताना फक्त सरासरी ७० मेट्रिक टनच मिळत असल्याने अनेक रुग्ण हे ऑक्सिजनअभावी दगावत आहे. या सर्व गोष्टींचा विचार करून महाराष्ट्राचे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीणजी दरेकर, माजी पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या नेतृत्वाखाली नाशिकचे महापौर सतीश कुलकर्णी, खासदार डॉ. भारती पवार, आमदार सीमा हिरे, राहुल ढिकले, स्थायी समिती सभापती गणेश गीते, गिरीश पालवे, प्रशांत जाधव, सतीश सोनवणे, जगदीश पाटील यांनी मुंबईत अन्न व औषधी प्रशासनाचे सचिव विजय सौरभ यांच्या कार्यालयाला धडक देऊन त्यांच्याशी चर्चा केली व तोपर्यंत साठा मिळणार नाही तोपर्यंत येथून हलणार नसल्याची भूमिका घेतली, अखेर नाशिकसाठी १०० मेट्रिक टन ऑक्सिजन आणि सुमारे २००० रेमडेसिविर इंजेक्शन नाशिक जिल्ह्यास देण्याचे लिखित स्वरूपात आश्वासन दिल्याने आंदोलन मागे घेण्यात आले.
(फोटो २९ भाजप)
तसेच ही बैठक चालू असताना एफडीएचे आयुक्त परिमल सिंग, एफडीए महाराष्ट्र उपायुक्त विजयजी वाघमारे, नाशिकचे जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांच्यासह सर्व शिष्टमंडळाची तातडीने व्हिडिओ काॅन्फरन्स घेणात आली व नाशिक जिल्ह्यातील रुग्णांसाठी वाढीव रेमडेसिविर व ऑक्सिजन उपलब्ध करून घेण्याचे लेखी आश्वासन घेतले यामुळे नाशिक जिल्ह्यातील अनेक रुग्णांची हेळसांड थांबणार असून त्यांना पुरेशा प्रमाणात उपचारासाठी रेमडेसिविर व ऑक्सिजन मिळण्यास मदत होणार आहे.