अल्पसंख्याक सदस्यांकडून भाजपला घरचा आहेर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2020 12:07 AM2020-01-19T00:07:57+5:302020-01-19T00:58:11+5:30

नागरिकत्व सुधारणा कायदा व राष्ट्रीय नागरिकता नोंदणीच्या (सीएए, एनआरसी) निषेधार्थ भाजप अल्पसंख्यात मोर्चाच्या २२ पदाधिकाऱ्यांनी शनिवारी (दि.१८) सदस्यपदाचे सामूहिक राजीनामे देत असल्याची घोषणा प्रदेश महासचिव इमरान चौधरी यांनी पत्रकार परिषदेत के ली. यावेळी सर्व सदस्यांनी सीएए, एनआरसीचा निषेध व्यक्त केला.

BJP is home to minority members | अल्पसंख्याक सदस्यांकडून भाजपला घरचा आहेर

सीएए, एनआरसीच्या निषेधार्थ राजीनामे झळकविताना भाजप अल्पसंख्याक मोर्चाचे पदाधिकारी.

Next
ठळक मुद्देसीएए, एनआरसीचा निषेध । २२ पदाधिकाऱ्यांनी दिले राजीनामे

नाशिक : नागरिकत्व सुधारणा कायदा व राष्ट्रीय नागरिकता नोंदणीच्या (सीएए, एनआरसी) निषेधार्थ भाजप अल्पसंख्यात मोर्चाच्या २२ पदाधिकाऱ्यांनी शनिवारी (दि.१८) सदस्यपदाचे सामूहिक राजीनामे देत असल्याची घोषणा प्रदेश महासचिव इमरान चौधरी यांनी पत्रकार परिषदेत के ली. यावेळी सर्व सदस्यांनी सीएए, एनआरसीचा निषेध व्यक्त केला.
सीएए कायदा लागू होण्याअगोदरपासूनच नंतर जनसामान्यांत पसरलेल्या रोषाची माहिती पक्षश्रेष्ठींपर्यंत पोहोचविली होती, असे चौधरी यावेळी म्हणाले. भाजप सरकार बहुमताने सत्तेत आल्यानंतर अल्पसंख्याक समाजाला लक्ष्य करत ट्रिपल तलाक, मुस्लीम आरक्षण न देणे, सीएए, एनआरसी असे निर्णय घेतले गेले, असेही चौधरी म्हणाले. यामुळे एका विशिष्ट समाजाच्या विरोधात पक्षाची विचारधारा असल्याचे दिसून येते. ‘सीएए’, ‘एनआरसी’ हे कायदे भारतीय राज्यघटनेच्या विरोधात असून, आम्ही भारतीय नागरिक म्हणून त्याचा निषेध करतो, असेही ते यावेळी म्हणाले. हे सामूहिक राजीनामे अल्पसंख्याक आघाडी प्रदेशाध्यक्षांसह भाजपचे शहराध्यक्ष गिरीश पालवे यांच्याकडे पाठविण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. मोर्चाचे माजी शहराध्यक्ष अहेमद काझी, शहर उपाध्यक्ष वसीउल्लाह चौधरी, शहर सचिव दानिश वार्सी, अब्दुल खान, राजेश सोनार, नंदू इंगळे आदिंनी राजीनामे देत भाजपचा जाहीर निषेध केला.

Web Title: BJP is home to minority members

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Strikeसंप