शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

नाशिकमध्ये भाजपा विस्तारक करणार आता दुचाकीवरून पक्षाचा विस्तार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2018 21:41 IST

राज्यात पक्षाचे संघटन बळकट करण्यासाठी भाजपाने विस्तारकांकडे जबाबदारी दिली आहेत. पक्षात अनेक वर्षांपासून निष्ठेने कार्य करणा-या कार्यकर्त्यांची त्याकरिता निवड करण्यात आली आहे.

ठळक मुद्देपक्षासाठी सहा महिने ते वर्षभर पूर्णवेळ देणा-या कार्यकर्त्यांची निवड कार्यकर्त्यांना अ‍ॅँड्रॉइड मोबाइल देण्यात आले

नाशिक : भाजपाची सर्वच विधानसभा विधानक्षेत्रात पाळेमुळे घट्ट करण्यासाठी आखण्यात आलेल्या योजनेअंर्तगत राज्यात २८८ विधानसभा मतदारसंघात विस्तारक नियुक्त करण्यात आले असून, त्यात नाशिक जिल्ह्यात पंधरा पूर्णवेळ कार्यकर्ते नियुक्त करण्यात आले आहेत, एक वर्षे घरदार सोडून फक्त पक्ष संघटनावर भर देण्यासाठी या कार्यकर्त्यांना दुचाकी देण्यात आल्या आहेत.दीनदयाळ उपाध्याय यांनी पक्ष विस्तारासाठी घरादाराचा त्याग केला होता. त्यांच्याप्रमाणेच अनेक ज्येष्ठ नेत्यांनी योगदान दिले आहे. त्याच धर्तीवर राज्यात पक्षाचे संघटन बळकट करण्यासाठी भाजपाने विस्तारकांकडे जबाबदारी दिली आहेत. पक्षात अनेक वर्षांपासून निष्ठेने कार्य करणा-या कार्यकर्त्यांची त्याकरिता निवड करण्यात आली आहे. नाशिक जिल्ह्यातही पक्षासाठी सहा महिने ते वर्षभर पूर्णवेळ देणा-या कार्यकर्त्यांची निवड करण्यात आली आहे. गेल्या तीन महिन्यांपासून जिल्ह्यातील विविध मतदारसंघासाठी प्रचारक कार्य करीत असून, पक्षाने बुथरचना करताना तो पक्षातील कार्यकर्ता आहे काय, खरोखरीच कोणाची नियुक्ती आहे काय? अशा अनेक बाबींची पडताळणी करताना स्थानिक राजकारण, पक्षाची स्थिती, सामजिक समस्या, अशा मुद्द्यांचा अभ्यास करून अहवाल तयार करण्याचे काम देण्यात आले आहे. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या उपस्थितीत महिनाभरापूर्वी झालेल्या बैठकीत विस्तरकांना दुचाकी देण्याचे जाहीर करण्यात आले होते. त्यानुसार दुचाकीचे वाटप करण्यात आले आहे.मोबाइलवर कंट्रोलविस्तारक म्हणून काम करणा-या कार्यकर्त्यांना अ‍ॅँड्रॉइड मोबाइल देण्यात आले असून, त्या माध्यमांतून त्यांचा कंट्रोल मुख्यमंत्र्यांच्या वॉर रूममध्ये आहे. भाजपा  महाराष्ट्र  हे अ‍ॅप प्रचारकांच्या मोबाइलमध्ये असून, त्यात असलेल्या बुथ प्रमुख आणि अन्य बुथ कार्यकर्त्यांची यादी, त्यांचे ओटीपी अशी सर्व माहिती देण्यात आली आहे.

टॅग्स :BJPभाजपाNashikनाशिकPoliticsराजकारण