शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

भाजपा शहराध्यक्ष बदल  निश्चित; अनेक नावे चर्चेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2019 01:13 IST

एक व्यक्ती एक पद या भाजपा पक्षाच्या धोरणानुसार आमदार बाळासाहेब सानप यांच्याकडे असलेले शहराध्यक्षपद काढण्याचा निर्णय जवळपास निश्चित झाल्याचे वृत्त आहे. रविवारी दिवसभर यासंदर्भात पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत खलबते झाली असून, शहराध्यक्ष पदासाठी अनेक नावांची चर्चा झाल्याचेही समजते.

नाशिक : एक व्यक्ती एक पद या भाजपा पक्षाच्या धोरणानुसार आमदार बाळासाहेब सानप यांच्याकडे असलेले शहराध्यक्षपद काढण्याचा निर्णय जवळपास निश्चित झाल्याचे वृत्त आहे. रविवारी दिवसभर यासंदर्भात पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत खलबते झाली असून, शहराध्यक्ष पदासाठी अनेक नावांची चर्चा झाल्याचेही समजते. दरम्यान, विधानसभेसाठी इच्छुकांचा शहराध्यक्ष पदासाठी विचार होणार नसल्याने यासंदर्भात अहवाल प्रदेशाध्यक्षांकडे पाठविला जाणार असल्याचे समजते.नाशिक शहराध्यक्ष बदलाबाबत ज्यांना विधानसभा निवडणुका लढवायचे आहे त्यांना इतर जबाबदारी देऊ नये, असा पक्षाचा निर्णय असून एक व्यक्ती एक पद असे धोरण पक्षाचे आहे. त्यामुळे नाशिकसाठी वेगळा निर्णय होणार नसल्याचे गिरीश महाजन यांनी यावेळी स्पष्ट केले. आगामी विधानसभा निवडणुकीच्या  पार्श्वभूमीवर पक्षाकडून सर्वेक्षण करण्यात येत आहे. यात संबंधितांची जनमानसात असलेली प्रतिमा, त्यांचे काम विचारात घेऊन उमेदवारीबाबत निर्णय घेतला जाणार असल्याचे महाजन यांनी स्पष्ट केले.शहरातील भाजपा शहराध्यक्ष बदलण्याचा चर्चेने इच्छुकांची भाऊगर्दी सुरू झाली असून, प्रत्येक जण आपापल्या परीने लॉबिंग करीत असताना माजी शहराध्यक्ष विजय साने यांना पुन्हा संधी मिळण्याची शक्यता आहे. भाजपाने विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने रणनीती आखण्यास सुरुवात केली असून, त्यादृष्टीने शहराध्यक्षपदाविषयी पालकमंत्री गिरीश महाजन यांनी शहरातील पदाधिकाऱ्यांचे मत जाणून घेतले असता बहुतांश पदाधिकाऱ्यांनी नवीन चेहºयांना संधी देण्याची मागणी केल्याचे वृत्त असून, यात विजय साने यांच्या नावाची सर्वाधिक चर्चा असल्याचे सूत्रांनी सांगितले.निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाने नाशिकचा शहराध्यक्ष बदलण्याचा निर्णय घेतला असून, त्यामुळे इच्छुकांनी पक्षश्रेष्ठींपर्यंत आपली नावे पोहोचविण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत.मात्र अर्धा डझनहून अधिक नेत्यांनी शहराध्यक्ष पदाची धुरा पेलण्याची इच्छा दर्शविली असून, त्यांची नावे प्रदेश कार्यकारिणीकडे पाठविण्यात आली असून, येत्या दोन-तीन दिवसांत त्यावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. यात प्रामुख्याने सुनील केदार, नगरसेवक मुन्ना हिरे, उद्योग आघाडीचे प्रदेशाध्यक्ष प्रदीप पेशकार, माजी शहराध्यक्ष तथा प्रदेश सरचिटणीस लक्ष्मण सावजी उत्तम उगले आदी नावे चर्चेत आहेत.

महानगरपालिकेत पक्षाचे जबाबदार पदाधिकारी असताना दिनकर पाटील यांनी पक्षविरोधी भूमिका घेत महापालिकेत ठिय्या ठोकण्याचे केलेले वर्तन निश्चितच चुकीचे असून, त्यांच्या भूमिकेचे कोणत्याही परिस्थितीत समर्थन होऊ शकत नाही. त्यामुळेच त्यांच्यावर कारवाई करण्यात आल्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी सांगितले.

टॅग्स :BJPभाजपाNashikनाशिक