शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदी आणि नेपाळच्या हंगामी PM सुशीला कार्की यांचा फोनवरून संवाद, काय झाली चर्चा?
2
डोनाल्ड ट्रम्प पिच्छा सोडेना! आता भारताला टाकले ड्रग्ज उत्पादक, पुरवठा करणाऱ्या देशांच्या यादीत 
3
निवडणूक आयोगाने आधारहीन म्हणत राहुल गांधींचे आरोप फेटाळले, स्पष्टीकरणासह त्या दाव्यातील हवाच काढली
4
५० लाखांचा फ्लॅट घ्यायचा की गावी त्याच पैशांची जमीन? सोशल मीडियावर वाद सुरु झाला...
5
VIRAL : एकमेकांना पाडलं, केस धरून हाणलं; भर बाजारात नवरा-बायकोमध्ये जुंपली!
6
मी रमी खेळत होतो कशावरून? मंत्री माणिकराव कोकाटेंनी रोहित पवारांना कोर्टात खेचलं, अब्रुनुकसानीचा दावा दाखल
7
दीपिका पादुकोणची 'कल्की 2898 एडी' सिनेमातून एक्झिट, कारण आलं समोर
8
राहुल गांधींना निवडणूक आयोगातून कोण मदत करतेय? दाव्याने खळबळ
9
Shukra Pradosh 2025: पती-पत्नीचे बिघडलेले नातेही सुधारेल; शुक्र प्रदोषावर करा 'हे' उपाय!
10
प्रसिद्ध अभिनेत्रीचा मुलगा; ३६ व्या वर्षीही बॉलिवूडमध्ये करतोय संघर्ष; आता मिळाली मोठी संधी
11
राहुल गांधी यांचा सर्वात मोठा आरोप; मतचोरीचा पुरावा देत 'त्या' लोकांना थेट स्टेजवर बोलावले अन्...
12
सरकारी कर्मचारी-पेन्शनधारकांची दिवाळी होणार गोड! किती वाढणार पगार? मोठी अपडेट समोर
13
बेपत्ता महिला कॉन्स्टेबलची हत्या, कारमध्ये मृतदेह लपवला; आरोपी पोलिसाने सत्य सांगताच अधिकारी हैराण
14
Pune Firing: दुचाकीला साईड न दिल्याचे किरकोळ कारण; कोथरूड परिसरात निलेश घायवळ टोळीकडून गोळीबार, एक गंभीर जखमी
15
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचं 'मत'चोरीला संरक्षण; राहुल गांधी यांचा गंभीर आरोप
16
'ऑपरेशन ३१३'चा भांडाफोड! ३००हून अधिक मदरसा कॅम्प बांधण्याची तयारी होती सुरू, जैशचा मोठा कट उघडकीस
17
सासऱ्याच्या मृत्यूनंतर सून ढसाढसा रडली, संशय येताच पोलखोल झाली; 'ते' सत्य लपवण्यासाठी...
18
महाराष्ट्रातील या मतदारसंघात झाली मतचोरी, हजारो मतदार वाढले, राहुल गांधींचा पुराव्यानिशी सनसनाटी आरोप 
19
सेफ्टीमध्ये 'TATA'च एक नंबर, सलग नवव्या गाडीला मिळालं 5 स्टार रेटिंग; कोणती आहे कार?
20
जगातील सर्वात महान कर्णधार कोण? किरॉन पोलार्डनं 'या' दिग्गजाचं घेतलं नाव!

विधान परिषदेत  भाजपा उमेदवार देणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 27, 2017 00:58 IST

नाशिक : भाजपाच्या मंत्रिपदाच्या आश्वासनानंतर काँग्रेसची साथ सोडून स्वतंत्र पक्षाची स्थापना केल्यानंतर भाजपात अधिकृतरीत्या प्रवेश केलेल्या नारायण राणेंना विधान परिषदेची उमेदवारी देण्याबाबत पक्षाने अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नाही़ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी रविवारी (दि़२६) चर्चा केल्यानंतर सोमवारी (दि़२७) सकाळी अधिकृत उमेदवार घोषित करणार असल्याचे प्रदेशाध्यक्ष खासदाररावसाहेब दानवे यांनी सांगून राणेंविषयी ...

ठळक मुद्देराणेंविषयी योग्यवेळी निर्णय घेणार उमेदवारीबाबत अनिश्चितता अधिकृत उमेदवारालाच उमेदवारी दिली जाणार

नाशिक : भाजपाच्या मंत्रिपदाच्या आश्वासनानंतर काँग्रेसची साथ सोडून स्वतंत्र पक्षाची स्थापना केल्यानंतर भाजपात अधिकृतरीत्या प्रवेश केलेल्या नारायण राणेंना विधान परिषदेची उमेदवारी देण्याबाबत पक्षाने अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नाही़ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी रविवारी (दि़२६) चर्चा केल्यानंतर सोमवारी (दि़२७) सकाळी अधिकृत उमेदवार घोषित करणार असल्याचे प्रदेशाध्यक्ष खासदाररावसाहेब दानवे यांनी सांगून राणेंविषयी योग्यवेळी निर्णय घेणार असल्याचे सांगितल्याने राणे  यांना भाजपाकडून मिळणाºया उमेदवारीबाबत अनिश्चितता निर्माण झाली आहे़  विधान परिषद निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची सोमवारी (दि़२७) अंतिम मुदत आहे़ त्यामुळे काँग्रेसला सोडचिठ्ठी दिल्यानंतर स्वाभिमान पक्षाची स्थापना करून भाजपात प्रवेश करणारे नारायण राणे यांना भाजपा उमेदवारी देणार का? याबाबतच्या चर्चेला उधाण आले आहे़ पक्षाच्या उत्तर महाराष्ट्र बैठकीसाठी नाशिकमध्ये आलेले खासदार रावसाहेब दानवे यांना पत्रकारांनी उमेदवारीबाबत विचारले असता त्यांनी भाजपा ही निवडणूक स्वतंत्ररीत्या लढवित असून, त्यामध्ये पक्षाच्या अधिकृत उमेदवारालाच उमेदवारी दिली जाणार आहे़ राणे यांनी स्वतंत्र पक्षाची स्थापना केल्यामुळे त्यांना पक्षाकडून अधिकृत उमेदवारी देण्याचा अद्याप निर्णय झालेला नाही़  भारतीय जनता पक्षाकडून विधान परिषदेसाठी शायना एऩ सी़, माधव भंडारी, केशव उपाध्ये यांच्यासह अन्य चार जणांनी उमेदवारीची मागणी केली आहे़ या उमेदवारीबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी रात्री चर्चा करून त्यांची यादी केंद्रीय प्रदेश कार्यकारिणीला कळविण्यात येईल़ यानंतर केंद्राने मान्यता दिलेल्या उमेदवाराची अधिकृत घोषणा सोमवारी (दि़२७) केली जाणार असल्याचे दानवे यांनी सांगितले़ यावेळी खासदार हरिश्चंद्र चव्हाण, आमदार बाळासाहेब सानप, महापौर रंजना भानसी, केशव उपाध्ये, सुनील बागुल, सुहास फरांदे आदींसह पदाधिकारी उपस्थित होते़मंत्रिमंडळाचा लवकरच विस्तार व कर्जमाफीची रक्कमसरकार आपला कार्यकाळ पूर्ण करणार असून, मंत्रिमंडळाचा लवकरच विस्तार केला जाणार आहे़ त्याची तारीख अजून निश्चित झालेली नाही. लवकरच ती सर्वांना कळविण्यात येईल़ या मंत्रिमंडळात नाशिकला स्थान असेल का? या प्रश्नावर हास्य करीत उत्तर देण्याचे दानवे यांनी टाळले़ शेतकºयांच्या कर्जमाफीस उशीर झाल्याचे मान्य करून गतवेळच्या कर्जमाफीत बँकांनी केलेल्या घोटाळ्याची पुनरावृत्ती होऊ नये यामुळे हा उशीर झाला आहे़ सरकार ३४ हजार २०० कोटींची कर्जमाफी देण्यास बांधील असून, येत्या दोन-तीन दिवसांत २५ लाख शेतकºयांच्या खात्यावर पैसे जमा केले जाणार आहेत़ तसेच उशीर झाल्याने बँकेचे व्याजही सरकार भरणार असल्याचे दानवे यांनी सांगितले़टीकेबाबत दानवेंचा ठाकरेंना टोमणामी लाभार्थीच्या खोट्या जाहिराती करून सरकार जनतेला बधिर करीत आहे़ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व चंद्रकांतदादा पाटील हेच खरे सरकारचे लाभार्थी झाल्याची टीका सांगली जिल्ह्णातील कार्वे (विटा) येथील शेतकरी संवाद मेळाव्यात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली़ या टीकेबाबत दानवे यांना विचारले असता शिवसेना व भाजपा या दोघांचे प्रेम जगजाहीर असून, सरकार स्थापन झाल्यापासून ते व्यक्त होत आहे, यामध्ये नवीन काही नाही, असा टोमणा ठाकरे यांना मारला़ 

टॅग्स :ElectionनिवडणूकBJPभाजपा